॥ हरि ॐ॥
आपण रामानामाचा अकाऊंट बघितला. आता आपण अॅडिशनल बेनिफिटस् पाहूया :
१) ज्यांच्या ५०० रामनामाच्या वह्या पूर्ण होतील, त्यांना श्रीगुरुक्षेत्रम् येथे श्रीकिरातरुद्र व शिवगंगागौरी पूजन एकदा करण्याची संधी मिळेल.
२) ज्यांच्या ७५० रामनामाच्या वह्या पूर्ण होतील, त्यांना मंदिरातील गाभार्यातील देवतांचे दररोज होणारे प्रात: पूजन एकदा करण्याची संधी मिळेल.
३) ज्यांच्या १००० रामनामाच्या वह्या पूर्ण होतील, त्यांना दर महिन्याच्या १७ तारखेला होणारे आदिमातेच्या घण्टेचे पूजन एकदा करण्याची संधी मिळेल.
४) ज्यांच्या १२५० रामनामाच्या वह्या पूर्ण होतील, त्यांना दर महिन्याच्या शिवरात्रीला होणारे महादुर्गेश्वराचे पूजन एकदा करण्याची संधी मिळेल.
५) ज्यांच्या १५०० रामनामाच्या वह्या पूर्ण होतील, त्यांना दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला होणारे संपूर्ण चण्डिकाकुलाचे पूजन एकदा करण्याची संधी मिळेल.
एकूण रामनाम जप : ४७ अब्ज ३१ कोटी २३ लाख
एकूण अंजनामाता जप : १९ कोटी ९४ लाख
बघा महादुर्गेश्वर, गाभार्यातील देवतेचे पूजन, चण्डिकाकुलाचे पूजन करायला मिळणार आहे. सर्वांना खुले केले आहे, विनामूल्य आहे. लाभ घेणे तुमच्या हातात आहे.
पूर्वी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची पुस्तके असायची त्याची सुरुवात असायची - "एक आटपाट नगर होते" गोष्ट कुठलीही असू देत, हे आटपाट नगर असायचंच. देवदेवतांच्या व्रताच्या कथा असायच्या त्यात एक ओळ असायची - "साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरा सफळ संपूर्ण " आणखी एक वाक्य असायचं - "उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही." हे वाक्य व्रत करणार्या व्यक्तीला व्रताच्या आधी व नंतर म्हणणं कम्पल्सरी असायचं. वैभवलक्ष्मी, सोळा सोमवार ही व्रतं आम्हाला माहीत असतात. व्रत म्हणजे जे आहे ते जसंच्या तसं मेकॅनिकली करणं म्हणजे व्रत असं आम्हाला वाटतं. आमचं एकादशीचं व्रत म्हणजे खिचडी खायची, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी खायची, श्रीखंड, फळं, उपवासाचे सगळे पदार्थ खायचे. पण विठ्ठलाचं नाव किती घेतलं? ज्या विठ्ठलासाठी व्रत घेतलं जातं, आपण व्रती होतो, त्याची आठवण ठेवतो का? अनेक मंडळी शिरडीला, पंढरपूरला चालत जातात पण मनात त्या साईचं, विठ्ठलाचं नाव असतं का?
प्रत्येक मनुष्याचं जीवन म्हणजे एक व्रतच असतं. ह्या जन्माला आल्यापासून मूळ स्थानापर्यंत जाईपर्यंत व्रत असतं. हे जीवन प्रत्येकाला मिळालेलं असतं ते व्रतासारखं जगायचं असतं. आम्ही व्रताधिराज करतो, हे व्रत ह्या शद्बाचा अर्थ सुंदर आहे. हा व्रत शद्ब कुठल्या व्याकरणातून बनलेला नाही.
जेव्हा ब्रह्मदेवाचे दहा मानस पुत्र आपल्या कार्याला लागले. तेव्हा वेगवेगळ्या ऋचा प्रकट होताना अत्रि ऋषी सहाय्याला आलेत. वेदरचना सुरू असताना मनुष्याला मार्ग दाखविण्यासाठी अत्रि-अनसूया मानवी रूपात राहत होते. त्यावेळी इतर सर्व मानव मानवी रूपातील अत्रि-अनसूयेचे आचरण पाहत होते, त्यांचं सुंदर आचरण बघून प्रत्येक ऋषी-ऋषी पत्नी, स्त्री-पुरुष ह्यांना वाटायचे की, प्रपंच कसा हवा? तर अत्रि-अनसूयेसारखा, आपले जीवनही ह्यांच्या सारखे व्ह्यायला हवे, असं प्रत्येक मानवाला वाटू लागले. जे-जे सगळे चांगले, सुंदर होते ते सगळे त्यांच्याकडे होते. सामान्य माणसांची इच्छा होती की आपला प्रपंचही ह्या अत्रि-अनसूयेसारखा व्ह्यायला हवा. लोकं त्यांना बघायची, त्यांची गोष्ट न्याहाळायची, आणि जे-जे दिसायचं ते घरी येऊन करण्याचा प्रयत्न करायची. प्रत्येक जण एक गोष्टच पहायचा आणि ती घरी येऊन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा. कोणाला अत्रिचं ज्ञानार्जन आवडायचं, कोणाला अत्रि लाकूड तोडताना आवडायचे, कोणाला अत्रिचं सुंदर अक्षर तर कोणाला त्यांचं काव्य आवडायचं, कोणाला अनसूयेचं स्वयंपाक करणं आवडतं, कोणाला अनसूयेचं सुंदर गायन तर काहींना अनसूयेचं वात्सल्य, अपत्यपालन आवडलं, काहींना तिचं पतीप्रेम भावलं. प्रत्येक जण अत्रि-अनसूयेची एकेक गोष्ट उचलून आपल्या जीवनांत उतरवण्याचा प्रयत्न करते होते. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या आणि त्यांनी त्या आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी याज्ञवल्क्य ऋषींची मदत घेतली. त्यावेळी याज्ञवल्क्यांनी त्यांना सांगितले की त्यांच्या सगळ्या गोष्टी आचरणात आणता येणार नाही, त्यांची कुठलीही एक गोष्ट बघा आणि ती आचरणात आणा. एक एक गोष्ट जरी जीवनात उतरवली तरी जीवन सफल होईल. भारतवर्षातील प्रत्येक घरात त्यांच्यासारखी एक एक गोष्ट घडू लागली. त्या एका चांगल्या गोष्टीमुळे जीवनात दहा चांगल्या गोष्टी घडू लागल्या.
हळूहळू चांगल्या व्यक्तींचा संघ तयार होऊ लागला, त्यांच्या विचारांचे आदान-प्रदान सुरु झाले. मग त्यांच्या लक्षात आले की आपले जीवन एवढे सुंदर का झाले? तर आपण अत्रि-अनसूयेची एक गोष्ट स्विकारली त्यामुळे. मग हे सगळं आपल्या पुढच्या पिढीला कसं मिळणार? ते सगळे परत याज्ञवल्क ऋषींना शरण गेलेत. त्यांनी याज्ञ्वल्क्यांना प्रार्थना केली की, आता अत्रि-अनसूया आपल्या मूळ स्थानी परत जाणार, मग आमच्या पुढच्या पिढीनेदेखील हे असं वागावं हे त्यांना कसं कळणार? त्यांनी अत्रि-अनसूयेचे अनुकरण करावं म्हणून आम्ही काय करावं?
त्यावर याज्ञवल्क्य म्हणतात, आपण अनसूयेलाच ह्यावर उपाय विचारू. म्हणून सगळे जण अनसूयेकडे जातात. तो हजारो लोकांचा समुदाय अनसूयेकडे येऊन तिला प्रार्थना करतात - " आम्ही तुमच्या आचरणातील एकेक गोष्ट अनुकरण केली त्यामुळे आमचं जीवन सुंदर झालं. आम्हांला ही गोष्ट आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. कुठल्या गोष्टीमुळे तुमचे आचरण आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल ह्याचे मार्गदर्शन करा." ह्यावर अनसूया मातेने नेहमीप्रमाणे एक स्मितहास्य केलं. ती कधीच कोणावरही रागवत नाही. ती म्हणाली, "तुम्ही जे जे केलं, ज्याच्यामुळे तुमचं जीवन सुधारलं ते सारं मला द्या. फक्त मनाने म्हणा -‘आई ही गोष्ट, आम्ही तुझ अनुकरण करून केली ती तू परत घे आणि आमच्या पुढच्या पिढीला दे ज्यामुळे ती पिढी तुमचं अनुकरण करू शकेल.’"
एवढ्यात तिथे नारद येतो. नारद म्हणतो - "आई, जी गोष्ट तू मुलांना दिलीस तीच तू परत मागतेस?" अनसूया म्हणते, "नारदा ह्या बाळांना त्यांच्या पुढच्या पिढीला द्यायची आहे पण त्यांचा हात पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचला पाहिजे. मग मी काय करू तूच सांग." त्यावर नारद म्हणाला, "आदिमाते , सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त तुझ्याकडेच असतात. त्यामुळे तू जर प्रश्न विचारलास तर कसं होणार? आणि उत्तर देणारा मी कोण?" अनसूया म्हणाली, "तू प्रश्न विचारलास ‘मी कोण?’ नारदा, तू कोण तू म्हणजे नारायण, नारायण ह्या नामाचा उच्चार. त्याचप्रमाणे ह्यांनी जे जे काही केलंय ते करताना त्यांनी काय म्हटलं - ‘ही अत्रिची गोष्ट आम्ही करतोय, ही अनसूयेची गोष्ट आम्ही करतोय’ हा उच्चार महत्त्वाचा आहे. ही गोष्ट पुढे जाणं आवश्यक आहे. त्यामुळे हे काम तुला करावे लागेल. आता जोपर्यंत ह्या मानवांच्या पुढच्या पिढ्या होत राहणार तोपर्यंत तुला निरंतर न थांबता माझी आणि अत्रिची भक्ती सर्वत्र पसरवत राहणे आवश्यक आहे. हे दैवी कर्ज फेडल्याशिवाय तुला देवाची भेट होणार नाही."
नारद म्हणतो, "मी निश्चिंतपणे जाणतो की हे कर्ज नाहीये. आईने बालकाला व बालकाने आईला दिलेली कुठलीही गोष्ट कर्ज नसते. म्हटलं तर तू काही दिलं नाहीस आणि म्हटलं तर काहीही दिलं नाहीस. म्हटलं तर कर्ज आहे, आणि म्हटलं तर कर्ज नाहिये. ही काय अवस्था आहे? ह्याला काय नावं द्यायचं?" त्यावर अनसूया माता म्हणते, "ह्या अवस्थेला असा शद्ब स्वीकार जो संस्कृतमध्ये बनलेला नाही. ज्या शद्बातून कुठलाही अर्थ निघणार नाही." त्यावेळी नारद आणि ते दहा ब्रह्मर्षी त्यांच्या शद्बकोशातून संवाद साधतात हा संवाद अकरा वर्ष चालतो आणि त्यातून ‘व्रत’ शद्ब तयार होतो. हा एकच शद्ब आहे जो कोणीही बनवू शकत नाही.
व्रत म्हणजे परमेश्वराच्या चण्डिकाकुलाच्या शद्बाचे पालन. व्रताधिराजाच्या वेळी आपण ग्रंथामधून घेतलेलं पुष्प म्हणजे चण्डिकाकुलाचा शद्ब आणि त्याचं वर्धमान रितीने पालन म्हणजे व्रत.
आदिमातेने तिच्या तिन्हीं पुत्रांना जो आदेश दिला तो आदेश म्हणजे व्रत. ऋत आणि व्रत. सत्य पालन म्हणजे ऋत आणि ऋताचं पालन म्हणजे व्रत. आमच्या जीवनात आम्ही सत्य, ऋत पाळत नाही. आम्ही बर्याचदा खोटे बोलतो, खोटे वागतो, नियम पालन करत नाही म्हणून आम्हांला व्रत करणं आवश्यक आहे.
व्रत करताना आम्ही ज्याचे व्रती आहोत त्यांना विसरून चालणार नाही. नाहीतर उपवासाला खिचडी खाल्ली आणि मंदिरातल्या विठ्ठलालाच विसरलो. व्रत करताना चण्डिकाकुलाला विसरून चालणार नाही. व्रत शद्बाचा मूळ अर्थ आहे - सत्य, सत्याच्या पालनासाठी ऋत नियम. ती आदिमाताच आपल्या तीनही पुत्रांना आदेश देते, तिनेच व्रताचा सोपा मार्ग दिलाय. आणि व्रतामध्ये सगळ्यात सोपं व्रत म्हणजे व्रताधिराज. राज म्हणजे Best सगळ्यात सोपी गोष्ट. शंभर लोकांनी तुमचा वशिला लावणं आणि राजानेच वशिला लावला तर? - "विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी"
हा स्वतिक्षेम संवाद हा माझ्या व्रताचा भाग आहे. ह्याचा फायदा तुम्हाला आहे, हे व्रत मी करतोय. साठ प्रश्न माझे आहेत. माझं काम मला करू द्या. तुमचं काम तुम्ही करा. माझं काम करायला मी कधीच चुकलेलो नाही. हे माझ्या आईचं ऐश्वर्य आहे, प्रेमाचा साठा आहे जो ती मला सतत पुरवत असते.
बापू आमच्यावर उपकार करत नाही, आमचा बापू असेल तर तो उपकार करणार नाही. साठा उत्तराची जबाबदारी माझी आहे पाच मिनिटांची जबाबदरी तुमची आहे. बाकीची साठ मिनिटं म्हणजे प्रत्येक तास बघायला मी समर्थ आहे.
॥ हरि ॐ॥