॥ हरि ॐ॥
आता आपण श्रीस्वस्तिक्षेम संवाद साधणार आहोत. ह्या पाच मिनिटांत बोललं जाणार, तेवढंच ऐकलं जाईल असं नाही. ह्या पाच मिनिटांत जे बोललं जाईल ते direct ऐकलं जाईल. आजकाल आपल्याकडे मोबाईल असतो. मोबाईल वर आपण बोलत असतो, गेम खेळत असतो, पण बॅटरी चार्ज करायला किती वेळ लागतो? पाच मिनिटं आपण जे काही बोलतो, शांत बसतो ह्यामुळे तुमचा भूतकाळ आणि भविष्यकाळ, वर्तमानकाळासकट चार्ज होतो. जिथे माझे प्रयत्न थकलेत, ही असहायतेची भावना यायच्या आतच देवाचा हात पुढे झालेला असतो. तेव्हा एक तर अशी वेळ येतच नाही. हात पुढे करायची वेळ येतच नाही, हात पकडला जातो. गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येक गुरुवारी महाकाली प्रत्येकाच्या मागे bodygaurd म्हणून उभी असणार आहे. ती The Ultimate Bodyguard आहे. त्रिविध देहाचा हा संवाद साधताना अख्खं चण्डिकाकुल प्रत्येक संवादात तुमच्या मनात उतरेल. असं दिसलं, तसं दिसलं, काय दिसलं ह्यात अडकू नका. अनुभव घ्या.
॥ हरि ॐ ॥
‘ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम:’ हनुमंत - महाप्राण. महाप्राण म्हणजे काय? साधी गोष्ट लक्षात घ्या. शाळेत आपल्याला science असते. प्रत्येक पदार्थात अणू असतात. सोने, चांदी, तांबे, दगड प्रत्येकामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स असतात. नंबर वेगवेगळे असले तरी प्रोटॉनभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत राहतात.
एक जुना उंच पर्वत आहे त्यावर दगड आहे. तो ४० कोटी वर्षे तिथे आहे. त्याच्यातील इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन भोवती एकाच वेगाने एकच अंतर कायम ठेवून इतकी ४० वर्षे सतत तसेच फिरत आहेत. ही ताकद आली कुठून? इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्सचं हे नातं टिकवून ठेवण्याची शक्ती, ही जी ताकद आहे ती मूळ ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं ऊर्जत्व, निर्मिती ह्या सगळ्यासाठी जे लागतं ते बल. इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन ह्यामध्ये नातं कायम ठेवायचं, त्यांना त्याच परिघात ठेवण्याचं काम आहे ते बल आहे. सगळी बलं एकत्रितपणे ज्या पॉईंटमधून निघतात ते मूळस्वरूप म्हणजे महाप्राण. जे आपण पाहतो, जे आपण पाहू शकत नाही त्या प्रत्येक गोष्टीमधली हालचाल, त्या मागील कार्यशक्ती, जी प्रेरणा आहे तो महाप्राण हनुमंत.
आज आपण Quantum Physics बघतो, म्हणजे काय? अणूतील इलेक्ट्रॉन्सचे विभाजन केले, पुन्हा पुन्हा विभाजन केले की शेवटी अशी अवस्था येते, जे उरतं ते कण आहेत, आणि कण नाहीत पण. उर्जा आहे पण आणि नाही पण. एकाच वेळेस तो matter / practical / waves/ engery सगळं आहे. या basic level ला quanta म्हणतात. सूक्ष्म = quanta. ह्याला न्यूटनचे नियम लागू पडत नाहीत. भौतिक दुनियेचे नियम आणि quantum physics चे नियम ह्यात मोठा फरक आहे. भौतिक दुनियेत आपण ज्या भावनेवर, विचारावर, वस्तूवर लक्ष केंद्रित करतो, ते ध्येय आपलं होतं आणि quantum physics मध्ये ज्या गोष्टीवर फोकस करतो ती गोष्ट अदृश्य होते. स्थूलामध्ये आपण ज्या गोष्टीवर फोकस करतो ती मिळते, तर सूक्ष्मामध्ये ज्यागोष्टीवर फोकस करतो ती त्या जागेवरून नाहीशी होते, नष्ट होत नाही. ती आपल्याला दुसरीकडे शोधावी लागते. ती वस्तू एक सेकंदाचा, एक हजारावा सेकंद, त्याचा एक हजारावा सेकंद आणि त्याचा १०० वा हिस्सा एवढ्या काळात ती निघून जाते. सारं विश्व क्षणभंगूर आहे, कळलं? इथे टाईमचे, फोकस करण्याचे परिमाण वेगवेगळे आहेत. प्रत्येक जण इलेक्ट्रॉन-प्रोट्रॉन ने बनलेले असतात. तुमच्यामध्ये आणि दगडामध्ये इलेक्ट्रॉन व प्रोट्रॉन आहेत म्हणजे तुम्ही दगड आहात का? quantum physics आणि स्थूल भौतिकाचे नियम वेगवेगळे असले तरी दोन्हीकडे महाप्राण आहे.
हनुमंत स्वत:ला ‘रामाचा दास’ म्हणवून घेतो आणि रामसीता त्याला ‘तात’ म्हणतात. जानकी माता म्हणते - "कहेहु तात अस मोर प्रणामा । सब प्रकार प्रभु पुरनकामा । दीनदयाल बिरुदु संभारी । हरहु नाथ मम संकट भारी।’
वाल्मिकी रामायणात, एकनाथ रामायणात असाच उल्लेख आहे. स्थूलामध्ये हनुमंत रामाचा दास आहे, आणि quantum physics मध्ये सूक्ष्मामध्ये हनुमंत रामाचा तात आहे. आम्ही स्थूलात वावरतो म्हणून आम्हाला सगुण भक्ती करावी लागते आम्ही डोळे बंद करुन निराकारावर फोकस करू शकत नाही.
न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना ।
आणि सप्रेम जंव भक्ती घडेना । कळी उघडेना मनाची ॥
आम्ही स्थूलात जगतो म्हणून स्थूलात भक्ती करण्यासाठी इष्ट देवतेच्या प्रतिमेची गरज असते. स्थूलात भक्ती: चित्र, नाम, मूर्ती. focus करायला सगुण रूप हवं. स्थूलात आम्ही भक्ती करत असताना हा महाप्राण आमच्या प्राणाला आणि सूक्ष्म असणार्या मनाला चित्ताकडे नेत असतो. बाकी सगळ्या गोष्टींवरचा फोकस, attraction नाहीसं करून भगवंताच्या आणि आईच्या चरणी लावतो. तोच महाकुंडलिनीचा पुत्र असणारा हनुमंत आम्ही दत्तगुरुचा फोटो बघतो, त्यांच्याशी बोलतो, हे सगळं स्थूलात घडत असताना, तो महाप्राण आमच्या मनाच्या सूक्ष्म पातळीवर जे बदल घडणे आवश्यक असतात ते बदल घडवत असतो, तिथे तो रामाचा तात असतो.
परीक्षा आहे एक वेळ देवाला नमस्कार केला, काही हरकत नाही. संकट आलं की देवाला आठवायचे, दिवसभर आठवायचे नाही. असे घडले तरी काही हरकत नाही.
आम्ही उपनिषदामध्ये देवीक्षमामापन स्तोत्र वाचतो. त्यात ते सांगतात, "माते, पृथ्वीवरचे सगळे लोक सरळ मार्गाने तुझी भक्ती करणारे आहेत. त्यात मी एकटाच असा आहे की, मी तुझी कधीच भक्ती केली नाही, मी काहीही करत नाही पण मला माहीत आहे, मी जाणतो कुपुत्र होऊ शकतो, पण कुमाता कधीच होऊ शकत नाही’ That is The Trust.
हे आई, मी बाळ आहे तुझं, मी हाक मारतोय आई. मी मूर्ख आहे म्हणून माझ्या हातून चुकीच्या गोष्टी घडताहेत. भूक, तहान लागली तर आपण आईलाच हाक मारतो नं. आई रागावली की असं गणित मांडत नाही की दिवसभरात किती वेळा मला हाक मारली आणि भूक लागल्यावर मला हाक मारतो, १०० उठाबशा काढ मग जेवायला देते. अशावेळी ती तराजू घेऊन मोजत बसत नाही. हा विश्वास ठेवा. म्हणून जरी आमच्या हातून भक्ती घडत नसली तरी प्रयास करायचा. हा सद्गुरु माझा आहे, ही चण्डिका माझी आहे मी त्यांचा आहे. हाक मारताना मान खाली घालायची नाही.
राम म्हणजे पुरुषार्थ. तुम्ही जेवढे कर्तृत्व (पुरुषार्थ) करता त्याप्रमाणात तो महाप्राण कार्य करतो. You are not judged by your performance, but you are judged by your faith.
ह्या स्थूल जगात जेव्हा तुमचे performance judge केले जात असतात तेव्हा महाप्राण मदत करत असतो. सूक्ष्मात हनुमंत आधी (विश्वास) मग पुरुषार्थ. तुमच्या मनात पुरुषार्थ तयार होतो मग तुमच्या प्राणातून कृतीतून तो उतरतो.
स्थूलात हनुमंत रामाचा दास आहे. तर सूक्ष्मात रामाचा मोठा भाऊ आहे. राम आधी की हनुमंत आधी, महाकाली आधी की महालक्ष्मी आधी, साईबाबा आधी की स्वामी समर्थ आधी हा आमचा प्रश्न नाहीए. हे सगळे एकमेकांशी निगडीत आहेत, यांची कोणचीही एकमेकांमध्ये भांडणं नाहीत. शांतपणे अतिशय प्रेमाने जशी जमेल तशी भक्ती करायची. तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारा तुमच्यासाठी ज्याची आवश्यकता आहे त्याला तुमचा सद्गुरु पाठवणार. आपण आपलं काम करायचं आणि विश्वास ठेवायचा, हा विश्वास कधीच खोटा ठरत नाही.
साईनाथ स्पष्ट सांगतात -
"शरण मजसी आला आणि वाया गेला ।
दाखवा दाखवा ऐसा कोणी ।"
आणि बाबा सांगतात,
"आई ती आई अति मायाळू । लेंकरालागीं अति कनवाळू ।
परी लेंकरेंच निघतां टवाळू । कैसा सांभाळू करी ती ॥"
अशी आहे माझी आई. आज आपण हनुमंत रामाचा दास कसा व बॉस कसा हे बघितलं. समजलं तेवढं आपलं आणि नाही समजलं असेल ते भगवंताचं ह्याच प्रेमाने स्वीकारा.
दहावीची परीक्षा काय, किंवा जीवनाची परीक्षा काय, परीक्षा तुमचे परीक्षक घेत नसतात, ते फक्त objectives आहेत. तुम्हाला मार्कस् किती कमी द्यायचे, किती जास्त द्यायचे, तुम्हाला यश देणारे गुरुतत्त्व असते.
‘एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ।’
परीक्षेला जाताना ही तुमची दहा हातांची माय, ही साक्षात महाकाली तुमची bodyguard बनून तुमच्या पाठीशी ऊभी असेल.
॥ हरि ॐ ॥