॥ हरि ॐ ॥
ॐ मंत्राय नम: त्यामध्ये आपण “ॐ श्रीरामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।” ह्या पदाचा अभ्यास करत आहोत. तिच्या तत्त्वापासून, तिला समजण्यासाठी ऋषींनी निरनिराळे algorithms बनविलेत. गणित म्हणजे प्रश्न सोडविणे काही वेळा उत्तर बरोबर असते तर, पद्धत चुकीची असते. कधी पद्धत बरोबर असली तर उत्तर चुकीचे असते.
तीस वर्षापूर्वी घडलेली घटना आपल्याला त्रास देऊन जाते. दोन मैत्रिणींच तीस वर्षापूर्वी भांडण झालं होत. दोघींनी आपापलं वैर पुरेपूर काढलं. त्यानंतर तीस वर्षांनी त्यांच्या मुलांनी एकमेकांशी लग्न जमवलं. त्यांची तिसरी मैत्रिण भेटली मग हा उलगडा झाला. तेव्हाही त्यांनी ह्या चांगल्या गोष्टीमध्ये तीस वर्षापूर्वीचं भांडण आणून विघ्न आणलं. तीस वर्षापूर्वी घडलेली गोष्ट दु:ख देऊन गेली.
त्याचप्रमाणे आधी केलेली गोष्टही कामाला येते. एक पेशंट हॉस्पिटलमध्ये खितपत पडला होता. त्याच्या जखमांवर कोणी ड्रेसिंगही करण्यास तयार नव्हते. अशावेळी तिथल्याच एका नर्सने त्याच्या जखमांना ड्रेसिंग केले त्याला बरे वाटेपर्यंत त्याची काळजी घेतली. तीस वर्षांनी ती बाई प्रवासाला निघाली. तिला नात झाली होती, त्यासाठी ती तिच्या मुलीकडे जायला निघाली होती. प्रवासाला निघताना तिने एका बॅगेमध्ये नातीसाठी, मुलीसाठी काही दागिने बरोबर घेतले होते, पैसे होते. तिची ती बॅग मारली गेली. ती रडायला लागली, तिने मुलीला, जावयाला बोलावून घेतले. मुलगी आली आणि तिला घरी घेऊन गेली. काही दिवसांनी एक म्हातारा माणूस तिच्या घरी आला आणि त्याने तिची बॅग तिला परत दिली, आणि तिची माफी मागितली, “माफ करा ताई तुमची बॅग माझ्या मुलाने चोरली होती. त्याला माहीत नाही तुम्ही माझ्या आजारपणात मला किती मदत केली होती.” त्या बॅगमध्ये ती नर्स होती तेव्हाचं तिचं आयकार्ड होतं. त्या कार्डवरच्या फोटोवरून तीस वर्षांनी तिला ओळखले. तीस वर्षापूर्वी तिच्या हातून घडलेली गोष्ट तिला आनंद देऊन गेली.
हा कुठला संबंध कुठे येतो? जीवनात घडलेल्या गोष्टी निखळ योगायोग नसतो. ह्याला योगायोग म्हणत नाही. ह्या जगात योगायोगाने काही घडत नाही. हे सगळे punishment किंवा rewards नाहीत. हे सगळे परिणाम आहेत, कधी चांगले तर कधी वाईट. पण कुठल्या गोष्टीचं connection कुठे जोडायचं हे कळत नाही. तुमच्या चांगल्या वाईट कर्माचं connection कुठे जोडायचं हे तो जाणतो. कुठल्या गोष्टीचं connection कुठे जोडायचं हे जो जाणतो तो एकमेव आहे. तो लयकर्ता आहे. कुठल्या गोष्टीचा लय कशात करायचा हे तो जाणतो. पापाचा लय झाला की मुक्ती मिळते, फळाचा लय झाला की झाड तयार होतं. हा लयकर्ता शिव आहे. ह्या परमशिवाच्या कपाळावरती त्रिपुंड्र असतो. त्रिपुंड्र हा काय आहे हे बघायचं आहे. आपण नामाचा आणि पॅराबोलाचा संबंध काय हे पाहिलं, त्याचा वैश्विक गणित आणि जीवनाचं गणित कसं जुळवलं जात. पॅराबोलाचे गुणधर्म नामात कसे अवतरतात हे आपण पाहिलं.
Geometry मधले Side Splitting Therom! ज्यात तीन parallel लाईन्स असतात. समांतर रेषा एकमेकांपासून समान अंतरावर राहतात पण एकमेकांना मिळत नाही. पण जर Parallel लाईन्स एकावर एक ठेवल्या तर त्या एकरूप होतात. बाकी कोणत्याही लाईन्स नाहीत. Side Splitting Therom means out of these 3 लाईन्सनां कोणत्या पण दोन लाईन्सने intersect केल्या, तरी X/Y is always equal to R/S हा ratio (गुणोत्तर) sameच राहते. Mech. Engg., Civil Engg. मध्ये ह्या अँगलचा उपयोग होतो, हा Therom आवश्यक आहे. आपल्या जीवनात किती गोष्टींचे अँगल बदलावे लागतात, काही गोष्टी नवीन कराव्या लागतात. ह्या तिन्ही लाईन्स तारा आहेत. अशा plain wires मधून जर electro magnetic waves पास केल्या तर, एका तारेचा दुसर्या तारेवर प्रभाव होतो.
अशाच एकमेकांना कधीही न भेटणार्या पण एकमेकींवर प्रभाव टाकणार्या तीन parallel लाईन्स, वायर्स आपल्या जीवनातही आहेत. ज्या आपल्या भौतिक, प्राणमय, मनोमय शरीराला जोडतात. तुम्हाला तुमच्या यशाशी, प्रेमाच्या व्यक्तीशी जोडतात, चुकलात तर अपयशाशी जोडतात. अशा ह्या तीन नाड्या आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात. त्या कोणत्या? सद्गुरु गायत्री मंत्राची सुरुवात कशी करतो? - ‘ॐ मन: प्राण: प्रज्ञा........’ ह्या आपल्या जीवनभर व्यापून उरणार्या तारा आहेत. आपल्या पूर्व जन्माच्या ह्या वायर्स आहेत, ह्या जन्मातून पुढच्या जन्मात जोडणार्या तारा ह्याच आहेत.
प्रज्ञा म्हणजे परमेश्वराकडून मिळालेली पवित्र बुद्धी ज्याला आपण ‘प्रतिभा’ म्हणतो. ह्या तीन्ही एकमेकींवर प्रभाव टाकतात पण त्या एकरूप नसल्यामुळे result येत नाही. Best गोष्ट घडण्यासाठी ह्या तीन रेषा एकत्र याव्या लागतात. लगोरीत अचूक चेंडू बसायला पाहिजे, तरच चकत्या दूरवर उडतात. अर्जुनाने पण जिंकला कसला तर खाली पाण्यात पाहून वर फिरणार्या माशाच्या डोळ्यात नेम मारायचा. अर्जुन प्रतिमा बघतोय. जेव्हा तुम्ही पाण्यापासून दोन फूट अंतरावर असता -तुमचं नाकं असत तेव्हा तुमच्या श्वासोच्छवासामुळे पाण्यात तरंग उठतात. मासा फिरताना पुढे सरकरणार्या माशाच्या डोळ्यात exact बाण मारणं हे exact calculation प्रज्ञेने केलं. त्याचे मन, प्राण, प्रज्ञा एकाच ठिकाणी एकटवले गेले म्हणून सुंदर कार्य घडलं गेलं.
नुकतीच बाळंत झालेली आई बाळं जरा रडलं की तिला लगेच जाग येते कारण बाळात तिचे मन, प्राण, प्रज्ञा एकटवलेले असतात.
मन हे प्राणापेक्षा जास्त धावलं, प्रज्ञा कमी पडली मनाला रोखण्यासाठी, मनाला आणि प्राणाला प्रज्ञेच्या सहाय्याने चालता आले नाही की चांगल्या कार्याचा मृत्यू होतो. आपली प्रज्ञा आपल्याला सांगत असते, पण मन ऐकत नाही. काही वेळा मन सांगत असलं, तर बुध्दिवादी तत्त्वावर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.
मन, प्राण, प्रज्ञा एकत्र ठेवणारा तो एकच आहे. ‘त्रिगुणाच्या तीन पाती । चराचरा खेळवती ।’ ह्या तिघांना समांतर ठेवणं, तिघांचा प्रवाह एकाच दिशेने ठेवणं हे त्याच कार्य आहे. ह्या तिन्हीं रेषांचे प्रवाह उचित दिशेने जायला हवेत. ह्यासाठी ह्या तीन रेषा एकमेकांना कायम समांतर रहाव्या लागतात. तरच त्याला तुमच्या जीवनाला उचित दिशा देता येते, प्रारब्ध कितीही कठीण असलं तरीसुद्धा.
ह्या तिन्हीं रेषांच्या मधला ratio constant असतो. ह्या समांतर अंतरावर असतात तेव्हा त्यांचे गुणोत्तर सारखेच असते. इथे साईसच्चरितातील ओवी आठवली पाहिजे -
‘इतर देव सारे मायिक । गुरुची शाश्वत देव एक । चरणी ठेविता विश्वास देख । रेखेवर मेख मारी तो ॥’
ही मेख मारायची असेल तर ह्या तीन लाईन्स समांतर असाव्या लागतात. प्रारब्धाची एक रेख देवाने दिलेल्या ह्या तीन रेषांनी बदलू शकते. एका रेषेचा दुसर्या रेषेच्या प्रत्येक अंगावर पडणारा force same असला पाहिजे. ही रेषा म्हणजे मी केलेलं कर्म. जर ह्या रेषा समांतर असतील तर कुठूनही छेद दिलेला असला तरी तो मेख मारू शकतो. पहिल्या ह्या लाईन समांतर करा मग तो समांतर गुणोत्तरवर रेख मारतो. तुमच्या रेषा समांतर नसतात, वाकड्या असतात. त्या समांतर करायला वेळ लागतो.
व्हिटामिन ‘डी’ किती जणांनी केल्यात? नॉर्मल आल्यात का? ३० च्या वर असेल तर चांगलं आहे. व्हिटामिन ‘डी’ bones साठी, किडनीसाठी, हृदयासाठी आवश्यक आहे. व्हिटामिन ‘डी’ चं प्रमाण कमी असले तर, प्राणाच्या रेषा वेड्या वाकड्या होतात.
प्रज्ञेची वाढ परमेश्वरच करतो. ज्या क्षणाला ‘एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ।’ हा जो विश्वास आहे - जेवढ्या प्रमाणात विश्वास तेवढ्या प्रमाणात प्रज्ञा जागृत. विश्वास नाही प्रज्ञा inactive. देवांनी मी दिलेली दिशा आम्ही वेडीवाकडी करतो. भितीपोटी प्रज्ञा वेडीवाकडी होते.
तुम्ही जीवनात असंख्य रेषा मारलेल्या असतात. त्या तो सोडवत असतो, त्याला प्रत्येकाचे किती algorithms सोडवावे लागतात. जेव्हा साई तुमच्याकडे बघतो, तेव्हा त्याला तुमचा प्रत्येक जन्म दिसत असतो. त्याला तुमचे प्रत्येक algorithm सोडवायचे असतात. म्हणून राम-कृष्ण-साई असे algorithms घेऊन येतात.
आज्ञाचक्र जिथे सुरू होते तिथे प्रज्ञारेषा येते. दोन्हींकडे ‘ज्ञ’ आहे म्हणजे जाणतेपण आहे. दोन्हीं ‘स्त्रिलिंगी’आहेत. दोन्हीं अकारान्त आहेत. ‘प्र’ म्हणजे सातत्य - ‘दत्तगुरुंची आज्ञा हेचि तुझे मूळ रूप ।’
‘गुरुची आज्ञा’ हीच प्रज्ञा सरळ करणारी रेषा आहे. जिथे आज्ञाचक्र तिथे प्रज्ञा रेषा असते त्यावरती प्राणाची रेषा, त्याच्यावर मनरेषा येते. ह्या कुकुंमतिलक किंवा भस्माने काढतात. शिवाचा त्रिपुंड्र भस्माने काढला जातो. शिवाचा तृतीय नेत्र ह्या तीन रेषांना, तीन तारांना, तीन वायर्सनां जोडणारा आहे. शिवाचा तिसरा डोळा उघडला गेला की समोरच्याला जाळतो. भक्तांसाठी त्याच्या संकटांना, चुकांना जाळतो. शिवशंकर क्षमा करतो, म्हणून तो भोळा आहे, भोलेनाथ आहे. त्याने स्वत: त्रिपुंड्र धारण केला आहे. त्रिपुंड्र जेव्हा आपण अतिशय श्रद्धेने धारण करतो. त्याला आवाहन करतो, ‘हे मित्रा, माझ्याकडे सदैव ह्याच डोळ्याने बघ.’ हिम्मत लागते हे सांगायला. त्याने कामदेवाला नाही तर त्याच्या विकृत वृत्तीला जाळलं. तो असुरांना, राक्षसांना जाळतो. शिव म्हणजे निर्णयशक्ती. ‘शिवा, तू माझ्या प्रत्येक निर्णयाकडे बघ.’ जेव्हा हे सांगू तेव्हा तो interfere करणारच. जो श्रद्धेने, मन:पूर्वक त्रिपुंड्रकडे काढतो तेव्हा शिवाच्या त्रिपुंड्राच्या तीन रेषा आणि अक्ष ह्यांचे connection आपल्या त्रिपुंड्राच्या तीन रेषांशी जोडलं जातं. त्याला सांगा ‘ये, माझ्या शरीरात शिर आणि जे चुकीचं असेल ते जाळं’ हे चिन्ह अत्यंत प्रेमाने काढलं पाहिजे. नाम फक्त २० टक्के लोक काढताहेत. देवाला नमस्कार करायच्या आधी नाम आणि त्रिपुंड्र पाण्याने काढा आणि त्याच्यासमोर डोक टेकवा. पण त्या क्षणापुरतं तरी आपण त्या शिवाचं, त्या महाविष्णुचं असलंच पाहिजे. त्याच्या दारात उभ राहिल पाहिजे.
त्रिपुंड्र काढताना रेषा वेडीवाकडी आली तर ह्याचा विचार करू नका. तुमची चित्र परफेक्ट नसतात हे त्याला माहीत आहे. तिचा पुत्र तुमची चित्र correct करणार नाही का? शांतपणे त्रिपुंड्र काढा. बापू, काढलेलं त्रिपुंड्र पुसलं गेलं तर? तुम्ही कोण पुसणारे? पुंडलिकांच्या गोष्टीत बाबा सांगतात - ‘पुण्याचाच काय अभिमान । पापाचाही अभिमान ।’ त्यांच्याकडून नारळ चुकून चिवड्यात घातला जातो. बाबा सांगतात -‘घाबरू नकोस’ आपल्या प्रेमळ भक्ताच्या चुका पोटात घालण्यासाठी तो तयार असतोच. पुंडलिकरावांनी बाबांसमोर काहीही कारण न देता चूक कबूल केली - ‘बाबा, मी चुकलो’ म्हणून त्यांच्या पापांची जबाबदारी बाबांनी घेतली. त्यांनी बाबांच्या चेहर्यावरचा त्रिपुंड्र बघितला आणि त्यांचं connection आपोआप जोडलं गेलं.
शिव आणि विष्णु एकत्र म्हणजे त्रिविक्रम आलाच. हा ratio एकत्र राहणं आवश्यक आहे. तरच आपल्याला त्वरित मदत मिळते. रेषा समांतर असतील तर त्याला छेदक रेषा हलवण्याचं स्वातंत्र्य मिळतं.
त्रिपुंड्र काढा आणि शिवाला सांगा, ‘शिवा माझ्याकडे बघ’ त्याचे तीनही डोळे एकच आहेत. प्रेमाने करा मग बघा तुमच्या जीवनात सुंदर बदल होणारच. जीवनातली गुंतागुंत सोडविण्याचा सोपा मार्ग म्हणजे हा algorithm आहे. हा प्रेमाने स्वीकारून जीवनाची गुंतागुंत दूर करू या.
अध्याय ४ था मधली २० वी ओवी आपल्याला नमस्काराबद्दल सांगते. नमस्कार कसा करायचा हे आपल्याला चण्डिकाकुलातील हनुमन्त आपल्याला शिकवतो. देव आपल्याला शिकवतो की नमस्कार कसा करायचा.
गजर :
काय गोड गुरुची शाळा । सुटला जनक जननीचा लळा....................
साईसच्चरितातील ह्या ओव्या म्हणजे सगळ्याचं मर्म आहे. ह्या ओवीमधील शब्दन् शब्द संपूर्ण सत्य आहे. सत्य, प्रेम, आनंद ह्या ओव्यांमध्ये भरलेले आहेत. मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो की, गुरुच्या प्रेमाची तुलना कशानेही करता येणार नाही. ते फक्त स्वीकारायचं असतं.
॥ हरि ॐ ॥