॥ हरि ॐ ॥
प्रत्येक माणसाचं एक नाव असतं. आपण पण त्याला नावं ठेवतोच. ज्याने-त्याने अमक्या-अमक्याला किंवा अमक्या-अमकीला नाव ठेवलं. नाव बारशाच्या दिवशी रीतसर ठेवलं जातं. नाव ठेवण्याची एवढी चांगली प्रक्रिया आहे. नाव ठेवण्याच्या प्रक्रियेत प्रत्येकाला एक नाव असण्याला एक वेगळया प्रकारचं महत्त्व असतं.
दक्षिण भारतात काही ठिकाणी नाव लिहिताना पहिल्यांदा गावाचं नाव नंतर स्वत:चं नाव नंतर वडिलांच नाव असतं. तर गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी पहिलं स्वत:चं नाव, नंतर वडिलांचं नाव नंतर आडनाव लावतात. आपण ‘खन्ना’ आडनाव बघतो, ते ‘खन्ना’ हे जागेचं नाव आहे. ‘आजगांवकर’ म्हणजे ‘आजगाव’ नावाच्या गावात राहणारे. बर्याचवेळा व्यवसाय किंवा original native place म्हणजेच मूळ राहण्याचे गाव ह्यांची नावं आडनावं म्हणून लावली जातात.
आपण समान नावं असणारी बरीच माणसं बघतो. काही नावं रेअर असतात तर काही नावं अतिशय common असतात. अमित, सुनिल, सचिन. लाट असते एकेका नावाची. अमिताभ, सचिन ही नावं त्या-त्या वेळची त्या-त्या व्यक्तिमत्त्वाच्या नावावरून ठेवली गेली आहेत. वडिलांचं नाव ‘राम’ असणारी ‘नितीन’ नावाची अनेक माणसं असतील तर मग कुळाच्या, जातीच्या नावावरून आडनावं आली.
जन्माला आल्यावर नाव ठेवणं ही प्रमुख आध्यात्मिक, scientific भूमिका आहे. प्राणी जन्माला येतात त्यांना स्वातंत्र्य नाही. ज्या प्रेरणा भगवंताने त्यांना दिलेल्या आहेत तसेच ते वागतात. मांजरीची पिल्लं उंदरावर झडप घालून त्याला मारून खातातच ही त्यांची प्रेरणा आहे.
माणूस अन्न खातो पण साप, झुरळी ह्यांना ‘शी’ म्हणतो पण चिकन आवडीने खातो. ही सवय आहे. चीनमधल्या मुलाला चीनमधलंच जेवण आवडणार. माणसाची सहज प्रेरणा खूप कमी आणि वेगवेगळ्या आहेत. कारण त्याच्या बुद्धीचा विकास व्हायला लागलेला असतो. आम्हाला वाटतं लहान मुलांना काही कळत नाही, मुलं जाणती व्हायला लागली की त्याला समजतं. एक वर्षाच्या मुलांना कळत असतं, ही medical fact आहे. आई मुलाला पाजते तेव्हा तिच्या मनातल्या भावना मुलामधे पास होत असतात. ही मुलं पण विचार करत असतात. विचार शब्दांतून प्रकटतात. विचार करण्यासाठी मनामध्ये शब्द लागतात. शाळेत न गेलेला मनुष्यही विचार करतो. बेसिकली विचार हा शब्दांच्या आधी आहे. विचार बेसिकली wordless thought आहे. लहान मुलांचे विचार अशब्द असतात. भाव आणि विचार ह्यांच्यामध्ये अशब्द विचार असतात. म्हणून बाळ रडत असताना त्याला आईचा स्पर्श सुखावह असतो. अनाथाश्रमात वाढलेल्या मुलांना प्रेमाने सांभाळणार्या व्यक्तीचा स्पर्श समजतो.
मानवाच्या जाणिवा जन्मापासून तीव्र असतात. गर्भात असणारं बाळसुद्धा आईच्या आणि पित्याच्या आणि आसपासच्या व्यक्तींच्या भावनांना प्रतिसाद देत असतं.
शाळेत शिकलेलं विसरून जातो आणि जे रूढ आहे ते शिकत जातो. शास्त्रापेक्षा रूढी बनतात. रूढ गोष्टच मनुष्याच्या मनाचा ताबा घेत असते. त्याच गोष्टी संस्कार उत्पन्न करतात.
प्रत्येक बाळाची रांग त्या परमात्म्याकडे वेगळी आहे हे जाणून त्याला त्याचा वैयक्तिकपणा, व्यक्तिगतपणा separate आहे. त्याचं अस्तित्व separate आहे. त्याचबरोबर तो समाजाचाही घटक आहे ह्या दोन गोष्टी कळण्यासाठी भारतीय ऋषींनी चांगल्या गोष्टी तयार केल्यात. त्या मागच्या भावना जाऊन आता फक्त technical क्रियांना प्राधान्य मिळू लागले आहे.
रूढी बदलत जातात, कधी कधी त्या शास्त्राच्या विरुद्ध असतात. त्यातून काही तरी चांगलं मिळतं हे जाणून त्यातून जाणत्या वृद्ध मंडळींनी न्यास तयार केले त्याला रुढी म्हणतात.
नाव ठेवण्याच्या आधी बर्याच घरातून एक नाव घेतल जातं. बाळं झालं की सटवीची पूजा करतात आणि एखाद्या बाईला ‘ए सटवे’ असं नावही ठेवतो. म्हणजेच जीला तुम्ही शिवी मानता तिची बाळाच्या जन्माच्यावेळी पूजा करता? हा विरोधाभास कोणी क लक्षात घेत नाही?
सटवी येणार आणि बाळाच्या कपाळावर लिहून जाणार. म्हणून बाळाच्या बाजूला कागद/पेन्सिल ठेवतात. ती लिहिणार कपाळावर मग कागद/पेन्सिल ठेवायची काय गरज आहे?
ह्यामागे भाव असतो माझ्या बाळाचं संरक्षण झालं पाहिजे. मूळ देवता षष्ठी देवता आहे. काही शब्दांचा नीट उच्चार करता येत नाही त्यामुळे असा षष्ठीचा सटवी उच्चार होतो.
सटवी म्हणजे सतावणारी आणि षष्ठी ही देवता आहे. ह्या प्रकारच्या उच्चारामुळे त्या एकरूप झाल्या. ह्यासाठी आपल्याला नाव जपलं पाहिजे.
षष्ठी देवता ह्या सात होत्या. सप्त षष्ठी - त्यांच सटवी होणं किती सोपं आहे बघा. सटवी नाव पडलं सहाव्या दिवशी पूजन होतं म्हणून. त्या कुठे दोन, कुठे एक तर कुठे सहा असतात. ह्यामागचं रहस्य नीट कळलं पाहिजे.
ब्रह्मर्षींमध्ये पहिल्यांदा आई झालेल्या लोपामुद्रा आणि अरुंधती हया एकाच वेळेस प्रसूत झाल्या. लोपामुद्रा, अरुंधती, अगस्त्य आणि वसिष्ठ ह्या चौघांनी आपल्या बाळांचे जे पहिलं पूजन केलं ते हे सप्तषष्ठी पूजन आहे.
महासरस्वतीच्या मदतीसाठी सगळे देव आपापल्या शक्ती पाठवतात. तिच्याकडच्या सात सेनापती म्हणजेच ह्या सप्तमातृका आहेत. शुंभ-निशुंभ आणि रक्तबीजाशी लढणार्या सप्तमातृकांचे हे चित्र आहे. प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस वैदिक घरांमध्ये ह्या चित्राची पूजा केली जाते.
महासरस्वती, तिची सेनापती काली सिंहावर आरूढ झालेली आहे.
माहेश्वरी - पंचमुखी आहे, ही वृषभावर आरूढ झालेली आहे.
वैष्णवी - ही गरुडावर आरूढ झालेली आहे, हिच्या हातात चक्र, गदा, पद्म आहे.
ब्रम्हाणी - ही हंसावर आरूढ झालेली आहे. हिच्या हातात कमंडलू, अक्षमाळा आहे.
ऐन्द्री - ही इंद्राची शक्ती आहे ही ऐरावतावर आरूढ झालेली आहे, हिच्या हातात वज्र आहे.
कौमारी - ही मोरावर बसलेली आहे.
नारसिंही - हिच्या हातात गदा, खडग् आहे. हिचे मुख सिंहीणीचे आहे.
वाराही - हिचे मुख वराहाचे आहे. हिच्या हातात चक्र, खडग्, ढाल आहे. ही पांढर्या रंगाच्या रेड्यावर बसलेली आहे.
ह्यांच्या पायाखाली असुर पडलेले आहेत. ह्या फक्त सातच आहेत आणि असुर बघा किती आहेत. शुंभ-निशुंभ ह्यांच्या पूजनविधीमध्ये एक भाग म्हणून रोज एका मुलाचा बळी देत असत. त्यांचं रक्त त्यांचे सैनिकही पीत असत. ज्यांनी ज्यांनी बाळांचं रक्त-मांस खाल्ल होतं त्या प्रत्येकाचं रक्त ह्या सात जणींनी सांडलं. महासरस्वती, काली आणि ह्या सात जणींनी बालकांच्या हत्या करणार्या प्रत्येकाची हत्या केली.
शुंभाचा मुलगा मात्र त्यातून वाचला. त्याला कावळ्याचं रूप दिलं म्हणून तो वाचला नाही, तर ह्या सात जणी मातृका आहेत त्यांचा मातृभाव जागृत झाला. म्हणून त्यांनी शत्रूच्या बालकावरही प्रेम केलं. त्यामुळे ह्यांना महासरस्वतीने आशीर्वाद दिला की, ‘जो मानव त्याच्या बाळाच्या जन्मानंतर तुमचं पूजन करेल त्याच्या बाळाचं रक्षण तुम्ही करा.’
शुंभ-निशुंभ ह्यांच्या बरोबर रक्तबीज आहे. जेवढ्या बाळांचे बळी दिलेत तेवढे रक्तबीज तयार झालेत. प्रत्येक रोगाचं बीज रक्तात असतं.
काली ही महासरस्वतीची कन्या आहे आणि महासरस्वती जगदम्बा आहे. ह्या सातजणी एकच आहेत. त्या त्यांच्यामधूनच निर्माण झाल्या आहेत.
आता हे सप्त मातृकांचं पूजन कसं करायचं ते आपण पाहू.
पूजनाची मांडणी
एक पाट घ्यायचा. ‘स्वस्तिक’ किंवा ‘श्री’ रांगोळीने काढावे. पाटावर शाल/ सोवळं /चादर अंथरावे. भोवती रंगोळी काढली तरी चालेल.
एका ताम्हणात सपाट काठोकाठ गहू भरावेत.
त्यात मध्यभागी एक व सहा बाजूला सहा सुपार्या ठेवाव्यात.
ताम्हणाच्या दोन बाजूला दोन नारळ ठेवावेत. नारळास हळद कुंकू लावावे.
नारळाच्या आतल्या बाजूस ताम्हणाच्या समोरच्या बाजूला कुंकू लावलेल्या अक्षतांच्या राशी ठेवाव्यात. या म्हणजे अश्विनीकुमारांच्या पत्नी आहेत. ह्या सख्या जुळ्या बहिणी आहेत. जरा व जिवंतिका.
पाटावर चार दिशांना चार विडे ठेवावेत.
ताम्हणात मागच्या बाजूला ताम्हणाला टेकून सप्तमातृकांचा फोटो ठेवावा.
पूजनाचे साहित्य : सुगंधी फुले, गंध, अक्षता, गुळ -खोबरे, कमलपुष्पे मिळाली तर सात असतील तर उत्तम, वरणा-पुरणाचा नैवेद्य.
पूजनाचे Points :
१) हे पूजन बाळ जन्मल्यानंतर तीन दिवसांनंतर कधीही करता येतं.
२) पहिल्यांदा पूजन वडिलांनी करायला हवं. पूजन करताना वडिलांनी बाळाला मांडीवर घेऊन बसायचं. आईने पण थोडा वेळ बाजूला बसून अर्पण करायला हवं.
३) पूजन करताना पाटाखाली ‘स्वस्तिक’ किंवा ‘श्री’ लिहावे कारण हे मंगलचिन्ह आहे.
४) पूजनाला सुरुवात करायच्या आधी वक्रतुण्ड महाकाय........, गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणा त्यानंतर सद्गुरुचं नावं घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मातृवात्सल्यविन्दानम् मधील ‘नवमंत्रमालास्तोत्र’ म्हणून पूजन करायचे.
५) सुगंधी फुलं अर्पण करताना ते पहिल्यांदा गंधामध्ये बुडवून मग अक्षता लावल्या की अक्षता त्या फुलाला चिकटतील मग ते फूल अर्पण केलं की ते फूल-गंध-अक्षतांसहित अर्पण केलं जाईल. पहिल्या स्तोत्रपठणाच्या वेळेसच फुले अर्पण करायची. सुपार्या व तसबीर दोहोंना फुले वहायची. नंतर पुष्पं वाहू नयेत.
६) दीप व धूप करावा
६) नैवेद्य वरण, भात आणि पुरणाचा असावा. (पुरणाच्या पोळ्या केल्या तरी चालतील आणि नुसतं पुरण अर्पण केलं तरी चालेल) सात तबकं मांडावीत.
७) पूजनात अक्षतांच्या दोन राशी ठेवलेल्या आहेत. ह्या अक्षतांच्या दोन राशी म्हणजे देवांचे वैद्य असणार्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत. हे दोघे अश्विनी कुमार नेहमी एकमेकांबरोबरच असतात. त्याचप्रमाणे ह्या दोघीही जुळ्या बहिणी आहेत. हया दोघीही अश्विनी कुमारांप्रमाणे एकमेकांशिवाय राहत नाही आणि त्याही एकमेकींसारख्याच दिसतात. ह्या दोघी बाळांशी खेळत असतात. त्यांचं लालन-पालन करत असतात. तीन महिन्यापर्यंत बाळ हसत असतं ते बाळाचं reflex असतं. देवाने reflex हसण्याचं दिलेलं असतं.
ह्या दोघींची पूजा आपण श्रावणातही करतो. त्यांना ‘जिवत्या’ असे म्हणतात. दोन सारख्याच दिसणार्या, बाळाला मांडीवर घेऊन बसणार्या देवींची आपण पूजा करतो. ह्यांची नावं खूप भयावह आहेत पण त्यांचा अर्थ खूपच सुंदर आहे :
अ) जरा : म्हणजे म्हातारपण देणारी. तुमच्या मुलाला म्हातारा होईपर्यंत आयुष्य देते. त्याचा अंत तो म्हातारा होईल तेव्हा व्हावा हा आशीर्वाद. हे बाळ खूप-खूप म्हातारं होईपर्यंत जगो. असा ह्या नावाचा अर्थ आहे.
ब) जिवांतिका : म्हणजे जिवाचा अंत करणारी. जीवनाच्या अंतापर्यंत तू खूप म्हातारा होईपर्यंत तुझं आरोग्य मी सांभाळेन हा आशिर्वाद.
८) सगळ्यात शेवटी पूजन झाल्यावर ‘कमळ’ मिळालं तर कमळ वहा. एक, सात, नऊ वहा. कारण ‘कमळ हे ह्या देवतांचं आवडतं पुष्प आहे.’
९) हे पूजन आई आपल्या मोठ्या बाळांसाठीही करू शकते. वयाचं बंधन नाही. पण बाळाचं पहिल पूजन वडिलांनीच केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाचं कितीही वेळा हे पूजन करू शकता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, बाळ आजार पणातून बर झालं की करा. एकदा केलं की परत केलंच पाहिजे असं नाही.
१०) हे पूजन सूर्योदय ते सूर्यास्त ह्या वेळेतच करावं. ह्याच्यानंतर करू नये. कुठल्याही दिवशी हे पूजन केलं तरी चालेल. अमवास्येच्या दिवशी केलं तरी चालेल, लक्ष्मीपूजन आपण अमवास्येच्या दिवशीच करतो.
११) नैवेद्यासाठी सात ताटं अर्पण करता येत नसली तर, गूळ आणि खोबर्याची वाटी अर्पण केली तरी चालेल.
१२) हे पूजन पाटावरच मांडायचं. पूजनाची मांडणी चौरंगावर करू नये. कारण ही बेसिक सुरुवात आहे. बाळं पहिलं पाऊल पाटावर टाकणार. आपण पूजनात पाट वापरतो कारण मोठ्या आईसमोर आपण सगळे तिची बाळंच असतो.
१३) पूजनात विडे ठेवणं म्हणजे देवाला ‘आवाहन’ करणं. विडा-सुपारीने केलेले आवाहन हे कुठल्याही मंत्राशिवाय केलेलं आवाहन असतं. हे कात्यायनीने सांगितलेलं आहे. विडे ठेवले की आमंत्रण देवाला पोहचतच कारण हा कात्यायनीचा संकल्प आहे.
तान्ह बाळ असताना शक्यतो पूजन पित्याने करावं. हे पूजन करताना एकदातरी पित्याने बाळास मांडीवर घ्यावे. हे पूजन माता-पिता एकेकटे, एकाच वेळी दोघेही करू शकतात.
आपल्या कितीही मोठया बाळासाठीदेखील आई वडिल हे पूजन करू शकतात.
ज्यांना आई वडिल नाहीत त्यांच्यासाठी हे पूजन त्यांची ही आई करेल.
धनलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सप्तमातृकांची तसबीर सर्वांना मिळेल. ह्या पूजनाचे सर्व डिटेल्स लवकरच पूज्य समीरदादांच्या Blog वर उपलब्ध होईल.
॥ हरि ॐ ॥