॥ हरि ॐ ॥
अधिवेशनमध्ये बोलताना एक declaration करायचे राहून गेले होते.
ह्यापुढे जो badge असेल त्यांच्या बॅचवर तारीख असेल. त्याची validity १ वर्षाची असेल. Volunteers च्या performance वर badge continue राहील अथवा काढला जाईल.
सर्वत्र, सर्वकाळी, सर्व स्तरावर ह्यापुढे हा नियम चालू राहील. इथे सत्ता फक्त तिचीच. इथे कुणीही आरोप करण्याची आवश्यकता नाही. अत्यंत मोकळेपणाने ह्याचा प्रत्येकाने स्वीकार केलेला चांगला. त्या आईने जे setting केले आहे. ते स्वीकारणे चांगले.
आता "ॐ रामवरदायिनी श्री महिषासुरमर्दिन्यै नम:" आपण गोपद्म बघितले. अनेकांनी गोपद्म काढायला सुरुवात केली. मला खूप आनंद झाला. पावित्र्याच्या जगात छोट्या छोट्या गोष्टींचादेखील परिणाम खूप मोठा आणि खूप चांगला असतो. आपल्याला आज एका अतिशय सुंदर गोष्टीकडे प्रवास करायचा आहे.
जे आज बघायचे ते अतिशय सुंदर, algorithm असा जो प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक आहे.
दुनियेमध्ये मानवाच्या सृष्टीमध्ये हसतो, खेळतो, बोलतो अशा अनेक क्रिया सतत करत असतो. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. या सृष्टीत एवढी माणसं आहेत, अशा अनेक गोष्टी चालतच असतात. एक आनंदी असेल तर त्याच्या बाजूचाच दु:खी असेल. एकाच ठिकाणी जमिनीला शांत करणारा, थंडावा देणारा पाऊस पडतो त्याच क्षणाला संहार करणारी, रूद्रावतार असलेली वीज चमकते किंवा ढगफुटी होते आणि महापूर येतो म्हणजे एकाच क्षणाला विरुध्द किंवा विविध गोष्टी घडतच असतात.
प्रत्येक घर वेगळे आहे. प्रत्येकाचे status, त्यांच्या difficulties वेगळ्या आहेत. प्रत्येकाचं भावविश्व वेगळं, राहणं वेगळं, वागणं वेगळं, परिस्थिती वेगळी. आपण साध्या रानात गेलो तर किती विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. अनेक प्रकारची झाडे बघायला मिळतात.
कुत्र्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. किती प्रकार? प्रत्येकाच्या रुपरंगात किती फरक/ विविधता तरीही त्यांना आपण कुत्राच म्हणतो. एकाच जातीचे चार-पाच कुत्रे घेतले तरीही किती वेगळेपण असते? दिसण्या वागण्यात काहीच साम्य नसले तरीही तो कुत्राच. का? कारण त्यांच्या ध्वनीमुळे. प्रत्येकाच्या भुंकण्याचा आवाज सारखाच. आणि कुत्र्याची शेपूट वाकडीच.
हा कुत्रा जेव्हा आपण घरात पाळतो तेव्हा तो प्रत्येकाशी वेगळा वागत असतो. प्राणी पाळणं म्हणजे त्याचं पालकत्व स्वीकारणं. तो आपल्या घराचा सदस्य बनला पाहिजे. गुड्डू आणि ढब्बूचं doctor कडे नाव गुड्डू अनिरुध्द जोशी व ढब्बू अनिरुध्द जोशी असंच आहे.
आमच्या घरात ढब्बू एकदम मवाली, उस्ताद तर गुड्डू एकदम शालीन/ loyal होता. पण जाताना तो ढब्बूच्या कानात काहीतरी सांगून गेला असेल. हा ढब्बू घरातील सदस्याव्यतिरिक्त नवीन आलेल्या प्रत्येकावर तो धावून जाणार, भुंकणार पण तोच जेव्हा पौरसची कन्या घरात आली तेव्हा मात्र तिचा guard झाला. तो तिच्यावर जराही भुंकला नाही. हे कसं कळलं त्याला? हा तर प्राणी आहे.
आम्ही रात्री जेवल्यानंतर नेहमी प्रार्थनेला बसतो. तेव्हा त्याला ice-cream हवे असते. पण जर बाळ मांडीवर असेल, तर मात्र तो तिरका जाऊन बाजूच्या खुर्चीवर हात ठेवतो.
जर हे प्राण्याला कळतं तर आम्हाला का कळत नाही? तो बदलू शकतो तर आम्ही का बदलू शकत नाही? हा ढब्बू एका क्षणात सुधारू शकतो तर आपण माणसं का सुधारू शकत नाहीत?
हे सौंदर्य मी अनुभवले आमच्या गुड्डू आणि ढब्बूच्या बाबतीत. गुड्डू एकदम overdisciplined, अतिशय प्रेमळ तर ढब्बू एकदम उपद्व्यापी, कायम उत्पात करणारा. ह्याची नेहमी काळजी वाटायची पण हा आता अगदी 180 डिग्री ने बदलला. अवघ्या 2-3 महिन्यात हा बदलला अगदी पूर्णपणे. जर पशुयोनी बदलू शकते तर मानव बदललाच पाहिजे.
आम्ही आज किती वयाचे आहोत, त्यातली पहिली १४ वर्षे काढून टाका, डब्बू १०० टक्के बदलला आम्ही किती बदललो? डब्बू बापुंच्या घराचा कुत्रा म्हणून कौतुक नाही. ही एक divine beauty आहे. असं काय आहे ज्यामुळे आम्ही बदलू शकत नाही. आपण जे आहोत त्यापेक्षा अधिक चांगले व्हायचंय आपल्याला. माझं जीवन सुखी, भरभराटीला आणायचं आहे. मी पाहिजे ते बनू शकतो हा विश्वास हवा.
तुम्ही म्हणाल हे होत नाही ह्याचं कारण आमचा आळस. पण खरं सांगतो डब्बू महाआळशी आहे, त्याचासारखा आळशी कोणी नाही. इथे असलेल्या सगळ्यात आळशी माणसापेक्षा ढब्बू २००० पट आळशी आहे. ७ इंच दूरवरचे ice cream पण स्वत:हून खाणार नाही. एवढॆ तरी तुम्ही नक्कीच आळशी नाही. म्हणजे आळस हा मुद्दा असूच शकत नाही.
या प्राण्यामध्ये काय विशेष आहे? श्वान ह्या योनीचा प्रमुख गुणधर्म काय? Very Loyal To His Master. अत्यंत प्रामाणिक. त्यांचा इमानीपणा. दुसर्याने कितीही खायला देवो तो त्याला बधणार नाही.
एकदा Discovery वर दाखवलं होते. एका छोट्या कुत्र्याने त्याच्या मालकाला मगरीपासून वाचवले होते. पाण्यातून मगर आली आणि तिने तेथे बसलेल्या साठ पासष्ट वर्षाच्या त्याच्या मालकाचा पाय खेचून त्याला पाण्यात घेऊन गेली. त्यावेळी त्याच्या बाजूला बसलेल्या छोट्याशा कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता त्याच क्षणाला वेगाने मगरीच्या तोंडावर झेप घेतली आणि तोंडाला चावून चावून त्या मगरीचे डोळे फोडले.
म्हणजेच इथे नुसती Loyalty नव्हे तर खरंखुरं प्रेम आहे. कबीराचा एक दोहा आहे.
प्रेम गली अति संकरी,
तामें दाऊ न समाई
जब में होये तब तू नहीं,
अब तू है में नहीं.।
कुत्र्यासाठी त्याचा मालक म्हणजे त्याचा बाप एके बाप. कुत्रा घरात पाळताना त्याला आपला मुलगा म्हणून पाळा त्याला जनावर म्हणून ठेवू नका.
प्रेम कसं असावं unconditional. प्रेम असंच असावं. प्रेम हे आंधळंच असावं. प्रेम बसेपर्यंत प्रेम डोळस असलं पाहिजे, पण एकदा प्रेम बसले की ते आंधळेच असले पाहिजे. "मी"पणा विसरावा लागतो. श्वानाचा "मी"पणा हा पूर्णपणे त्याच्या मालकाशीच बांधलेला असतो. मी त्याचा, बस्स! आम्ही पण बदलू शकू, पण केव्हा जेव्हा भगवंताशी संवाद साधताना आपल्यामध्ये एकच भाव हवा, की "मी" "त्याचा", फक्त त्याचा. त्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही.
त्या श्वानाऐवजी माणूस असता तर मगरीला बघून पळून गेला असता पण तो कुत्रा पळून गेला नाही. हा पळाला नाही तर जीवाची पर्वा न करता तो मालकाच्या मदतीसाठी धावून गेला.
ह्या श्वानामध्ये असे काय आहे ज्यांनी दत्तगुरुंच्या बाजूला स्थान पटकावले. गाईला व श्वानालाच का स्थान दिले दत्तगुरुंनी तर त्यांच्या qualities मुळे. दत्तगुरूंच्या पाठी उभी आहे ती कामधेनू, जी सूत्रधार आहे जगाची. चण्डिकाकुल व त्यातील प्रत्येक सदस्य त्यांच्याआड काहीही येता कामा नये. काहीही आड येत नाही तेव्हा ते खरं प्रेम. आपल्याला ह्यातून बाहेर पडायचे आहे.
मीना वैनी सवयीवरून काय बोलतात, तुझीच सवय जात नाही, अमुची कशी जाणार?
आपल्याला आता काही सवयी लावून घेतल्या पाहिजेत :
ह्यासाठी पहिली सवय आपण लावून घ्यायची आहे, ती म्हणजे त्या चण्डिकाकुलाची पूजा करताना कसलीही तडजोड करायची नाही. करता कामा नये.
जीवनाच्या प्रत्येक क्षणी कुठलीही गोष्ट करताना मी जे काही करतोय त्यामुळे माझे जे चण्डिकाकुलाशी नाते आहे त्यामध्ये problem होणार नाही ना? म्हणून स्वत:ला तुच्छ लेखू नका, फालतू लेखू नका. माणसाची ताकद किती? Limited आहे अगदी मर्यादित. जी ताकद आहे ती ताकद वापरायची ताकदही आपल्याकडे नाही. म्हणून आधी accept करायचे. १) पाप दुरुस्त, नष्ट करण्याची ताकदही माझ्यामध्ये नाही. २) चुका दुरुस्त करण्याचीही/ बदलण्याची ताकद माझी नाही.
मग आम्हाला आठवले पाहिजे मातृवात्सल्यविन्दानम् व मातृवात्सल्यउपनिषद. ह्याचा अर्थ माझ्यामध्ये पाप करायची व चुका करायची पण ताकद नाही आहे. हे जो जाणतो तो एकमेव सद्गुरु असतो म्हणून तो कुणाचा कधीच तिरस्कार करत नाही.
ही ताकद कोण घडवतो, मनुष्याला पाप करायला कोण भाग पाडतो तो वृत्रासुर. जेव्हा आमच्या मनाविरुध्द पापं घडतात तेव्हा तो वृत्रासुर घडवत असतो. ते काम वृत्रासुराचं.
वृत्रासुराशी लढण्याची माझी ताकद नाही. त्यासाठी मग तो किरातरुद्र, ती शिवगंगागौरी, तो देवीसिंह यांपॆकी कुणाला तरी एकाला धाव घ्यावी लागते. तेव्हा देव धाव घ्यायचे मग आज धावणार नाहीत का?
कलियुगात देव दुबळे झाले का? म्हणून गुणसंकीर्तन का करावे? तर आम्हालाच आमच्या मनाला वारंवार पटवून देता आलं पाहिजे की देव कसे माझ्यासाठी धावून येतात. तो त्याला पाहिजे त्या रूपात येईल व तुम्हाला जी मदत करायची ती करेल, विश्वास हाच असला पाहिजे की मी कितीही पापी, दु:खी असलो तरी मी चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असेन तर मी चण्डिकाकुलाच्या राज्यात आहे. ही माझ्या देवाची ताकद आहे. माझा देव किती मोठा आहे. माझा देव मदतीला धावून येतोच.
उपनिषदातील घंटाक्षेत्रात धूप महाविष्णू लावतो, अग्निशिखा किरातरूद्र लावतो तर दत्तात्रेय घंटा वाजवतो. उपनिषदामधला प्रत्येक अध्याय जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तिने स्थापन केलेल्या प्रत्येक केन्द्रानुसार तशीच्या तशी गोष्ट तुमच्या देहात सर्वांगात घडत असते.
तुम्हाला पापं करायला लावणार्या वृत्रासुराचा नाश करायचा असेल तर रोज उपनिषदाचा एक अध्याय वाचलाच पाहिजे. त्या नियतीचा बंदोबस्त कोण करू शकतो तर तिचे तीन पुत्र व ती माता चण्डिका म्हणून त्या उपनिषदाच्या कथा आमच्या जीवनात भरभरून वाहिल्या पाहिजेत. एकदा वाचले आणि पुस्तक ठेवून दिलं असं करू नका. त्या वृत्रासुराचा रोजच्यारोज नाश झालाच पाहिजे. त्याने अंडी घातली की ती अंडी फोडली गेलीच पाहिजे.
डोळ्यांचा नंबर वाढतो तेव्हा आम्ही चष्मा लावतो. काही जणांना चष्मा लावायची लाज वाटते. भूक लागल्यावर भूक लागली असं म्हणणे हा कमीपणा आहे का ? काही पाप आहे का ? जिथे आपण काही करू शकत नाही तिथे जे उचित आहे त्याचा आधार घेतलाच पाहिजे. म्हणून आम्हाला अत्यंत प्रेमाने उपनिषद आतमध्ये उतरवायला हवे. जीवन सुंदर करायचे असेल तर मातृवात्सल्य, उपनिषद, ग्रंथराज जीवनात उतरवा. झोपेतून जागे झालो तरीही सांगता आले पाहिजे.
आनंद हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे की एवढी मोठी दोन साधने आम्हाला बापूंनी दिली आहेत मग त्याचा आम्ही वापर करायचा नाही का? जी नियती आम्हाला त्रास देऊ पाहते त्या पासून वाचण्यासाठी आम्हांला फक्त उपनिषद सहाय्य करू शकते.
मग श्वान आणि उपनिषद ह्याचा संबध काय? आपण आज unconditional love बघितले, Loyal to Master पाहिले. श्वानाला नीट माहीत असते की हा जो स्वामी आहे तोच आपला एकमेव खराखुरा रक्षणकर्ता आहे. (धनीच करतो श्वानाचे रक्षण) विपुलता, विपुल अमर्याद सामर्थ्य, त्याचा सतत पुरवठा हे केवळ तिच्याकडेच आहे. श्वान ज्याप्रमाणे जाणतो माझा मालकच माझा रक्षणकर्ता आहे, मला सर्व पुरवता आहे त्यामुळे त्याच्यावर त्याचा पूर्णपणे विश्वास असतो He will fulfill all my needs म्हणून त्याचं सर्वकाही बांधलं जातं त्याच्या मालकाच्या शब्दाशी, ध्वनीशी. तो भाव त्यांना कळतो.
Its called as worldless thought प्रत्येक माणसामध्ये असा अशब्द भाव असतो. ह्या श्वानाकडे शब्दाशिवाय भाव असतो. पण त्याचा संबंध केवळ मालकाच्या ध्वनीशीच असतो. त्याची बांधीलकी फक्त मालकाच्या ध्वनीशी असते. ध्वनी फक्त मालकाचाच. त्याचीच order final. ढब्बू hand-shake फक्त आईला व बाबांनाच देणार.
उपनिषद म्हणजे साक्षात त्या आदिमातेचा ध्वनी तर मातृवात्सल्यविन्दानम् म्हणजे त्या आदिमातेच्या पुत्राचा ध्वनी. त्या ध्वनीशी श्वानाप्रमाणे स्वत:ला बांधून घ्या. जो अशब्द भाव आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा अशब्द भाव म्हणजे उपनिषद आहे तर ध्वनीयुक्त भाव म्हणजे मातृवात्सल्यविन्दानम्. आम्ही दत्तगुरुंचे श्वान आहोत हा भाव ठेवा. आम्ही भक्तीत कमी पडतो. आम्हाला positive गोष्ट करायची तर मातृवात्सल्यविन्दानम् व उपनिषद regular वाचायलाच हवं. Tremendous बदल अनुभवाल.
ध्वनीयुक्त भाव म्हणजे जो कुठला ध्वनी निघेल त्यातून निर्माण झालेला अर्थ. प्रत्येकाचा भाव वेगळा, अभिव्यक्ती वेगळी, प्रत्येकाचं हसणं वेगळं, रडणं वेगळं. १०० माणसे हसताना वेगवेगळ्या प्रकारे हसतात तसेच रडताना प्रत्येकाचा ध्वनी वेगळा असेल. एखादा अजिबात रडणार नाही पण त्याचे दु:ख सगळ्यात जास्त असेल/ अधिक तीव्र असेल. उच्चारातून भाव कळतो. ध्वनीयुक्त भाव. ओह, आई गं, बाप रे हे सारे ध्वनीयुक्त भाव.
लहान बाळ जन्माला येते रडते हा ध्वनीयुक्त भाव आहे. माणासाचे नाते जन्मत:च ध्वनीयुक्त भावाशी जोडले आहे. मातृवात्सल्यविन्दानम् म्हणजे आईचे चरित्र (Biography) तर उपनिषद म्हणजे आईची लीला, तिचा प्रभाव, तिने आपल्या बालकांना दिलेले आश्वासन आहे.
मातृवात्सल्यविन्दानम् व मातृवात्सल्य उपनिषद हे दोन प्रचंड मोठे algorithms आहेत तुमच्या जीवनातले प्रत्येक problem, समीकरण सोडवणारे. मग ह्यांची चित्रं/ आकॄती कशी काढायची?
ह्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या गुरुवारी शुभचिन्ह म्हणून हे कसं काढायचे.
॥ हरि ॐ ॥