॥ हरि ॐ ॥
आज दत्तजयंती आहे. आजपासून चण्डिका currency सुरु होणार आहे. Volunteers ना रजिस्ट्रेशन compulsory आहे. भक्तासांठी त्यांची इच्छा असेल तर ते रजिस्ट्रेशन करू शकतात. www.chandikacurrency.com ह्यावर online रजिस्ट्रेशन करू शकता.
आज पासून Chandika Currency म्हणजे चण्डिका चलन सुरु होणार आहे, ह्याचा उच्चार मी पहिल्यांदा २०१२ च्या अधिवेशनात केला होता. आम्हाला अमेरिकेच्या डॉलर्सचं आकर्षण असतं. डॉलर्सची आवश्यकता लागते मुलांना तिथे पाठविण्यासाठी. तिथून परत येणारे अगदी कमी असतात. आमचा मुलगा अमेरिकेला जाईल मग आम्हाला पण घेऊन जाईल अशी आशा असते. आईबापच नालायक असतात. आम्ही बघतो आजूबाजूला उदाहरणं, मुलगा अमेरिकेला जातो तो काही परत येत नाही थोड्या दिवसाने तो तिथला स्वत:चा address ही बदलतो. तरीही आम्हाला तेच हवं असतं, पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण खोटी आहे. अमेरिकेला गेलेले ही दहा ते पंधरा वर्षे मजेत असतात. मग त्यांची मुलं पंधरा-सोळा वर्षांची झालीत की, त्यांना ही भारतात परत यावसं वाटतं specially मुली असतात त्यांना. कारण तिथे मुलं मोठी झाली की एकटी राहतात, ते इथून गेलेल्यांना पटत नाही. पण तिथे ते काहीही करू शकत नाही. कारण तिथे मुलांना मारलं तरी शिक्षा होते. ५०% मध्ये हीच कथा असते.
मग बापू डॉलर्स, रूपये आहेत, एवढी चलनं असताना आणखी चलन कशाला? हे युग Computer Technology चं आहे. विशेषांक वाचता कि नाही? विशेषांक कोणीही वाचत नाही. विशेषांक आमच्यासाठी आहे. प्रत्येकाला कळलं पाहिजे मी कुठे आहे? मी माझ्या General Knowledge मध्ये, भक्तिपथात, कामात बरोबर आहे का? Currency मुळे सगळ्या जगाचा balance-imbalance चा अंदाज राहतो.
Chandika Currency हे असं चलन आहे जे चलन पुढच्या प्रत्येक जन्मात कलियुग समाप्तीपर्यंत उपयोगात येणार आहे. हा मार्ग सुंदर आहे, उपयोगी आहे. इथे सगळं computer वरून ऑपरेट केलं जाणार आहे, पूर्णपणे मशिनरी आहे म्हणजे ह्याला जास्त दिलं-मला कमी दिलं असं होणार नाही.
Chandika Currency ही आपल्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे, सुंदर आहे. त्याच्या बरोबरीने आणखी एक गोष्ट आहे. बँक ऑफ रामनाम संबंधित. ज्यांचं वय ७५ च्या पुढे आहे, त्यांनी जर ३६ वह्या लिहिलेल्या असतील तरी त्यांना चरणस्पर्श मिळेल. ही गोष्ट त्यांच्या गतीविधीला, हालचालीला बघून दिलेली मुभा आहे.
आणखी एक गोष्ट आहे. गुरुवारी येणार्या वृद्धांनी चिठ्ठीत लिहून दिलं आहे की, “आमचे गुडघे दुखतात त्यामुळे आम्हाला प्रदक्षिणा घालता येत नाही, स्वत:भोवती देखील घालता येत नाही. मग आम्ही प्रदक्षिणा कशी घालायची?” कोणाला पॅरॅलिसिस झालेला असतो, कोणाला आजारपणामुळे weakness आलेला असतो, अशा व्यक्तीही प्रदक्षिणा घालू शकत नाहीत. अशांसाठी शांतपणे त्या व्यक्तीने मधलं बोट घ्यायचं ते पहिल्यांदा विशुद्ध चक्राला लावायचं, मग बंद असलेल्या डाव्या डोळ्याला लावायचं, मग आज्ञाचक्राला लावायचं, मग उजव्या बंद डोळ्याला लावायचं आणि पुन्हा विशुद्ध चक्राला लावायचं की मग एक प्रदक्षिणा पूर्ण होईल.
आपण लहानपणी एक गाण ऐकायचो -
दत्त दत्त दत्ताची गाय । गायीचं दूध । दूधाची साय । सायीचं दही । दह्याचं ताक । ताकाचं लोणी । लोण्याचं तूप । तुपाचा डेरा । डेर्याची माती । मातीचा गणपती । गणपतीची घण्टा । घण-घण-घण ।
ह्याच्यावर मी एकदा प्रवचन केलं होतं. हे गाणं साधं नाही. हे गाणं म्हणजे दत्तात्रेयांच्या उपनिषदाचं सार आहे. दत्तगुरु - चण्डिका आई - तिचे तीन पुत्र - त्यांच्यामध्ये परमात्मा परमशिव आणि त्याची पत्नी पार्वती - त्यांचा पुत्र गणपती ह्यांचा प्रवास ह्या गीतात आहे. अशी अनेक गीतं असतात. जी ह्या भारताच्या लोकगीतांमध्ये आहेत. आम्ही उपनिषदामध्ये पाहिलंय, त्यामध्ये आदिमाता, लोकांनी म्हटलेल्या साध्यासुध्या गाण्यांना मंत्र मानते.
आपण मागे आरती पाहिली. दत्तजयंती ही दत्तात्रेय आणि अनसूया ह्या दोघांचीही जयंती आहे. आजच्या दिवसाला आपण अनेक गोष्टी करतो. वर्धमान व्रताधिराज करतो. वर्धमान व्रताधिराजाची सुरुवात दत्तजयंतीपासून - दत्तपौर्णिमेपासून होते. काही लोकं प्रेमाने वर्षभरसुद्धा करतात.
हे सगळे मंत्र, गीतं, स्तोत्र important आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं विश्वास. श्रद्धापूर्ण विश्वास म्हणजे प्रेम. हा श्रद्धापूर्ण विश्वास असावाच लागतो.
एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ॥
ह्या आईवर विश्वास ठेवावा लागतो. हे तिचं स्वत:चं क्षेत्र आहे. प्रत्येक भक्त अत्यंत प्रेमाने स्वत:च्या देवाशी एक मिनिटापुरतं जे प्रामाणिकपणे बोलतो तोही विश्वास आहे, श्रद्धापूर्ण प्रेम आहे - ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।’
आम्हाला ध्यान जमत नाही, म्हणून मी गेल्या गुरुवारी सांगितलं होतं, देवाशी कसं बोलायचं विसरालात काय. लहान मुलाशी तुम्ही बोलता ते तुम्हाला response देतं का? ती सगुण साकार मूर्ती समोर असताना बोललं पाहिजे. ती मूर्ती तुम्हाला प्रतिसाद देत नसली तरी, लहान मुलाशी बोलता नं? मग देवाशी का बोलत नाही? हे अतिशय महत्त्वाचं आहे.
मला एका दापंत्याने चिठ्ठीत एक प्रश्न विचारालाय, अत्यंत प्रेमाने विचारलायं, "बापू, आम्ही I Love You My Dad म्हणतो. पण आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला विचारतात की, तुझा आणि तुझ्या बायकोचा बाप एकच असेल तर तुम्ही दोघं बहीण-भाऊ झालात. बापू आम्ही त्यांना काय सांगायचं?" तुम्ही जेव्हा “I Love You My Dad” म्हणता. त्यांना सांगायचं आमचा Dad हा मेगा Dad आहे. तो माझा, माझ्या मुलांचा, बापाचा, पणजोबांचा, जे गेलेत आणि जे येणार आहेत त्यांचा पण Dad आहे. नवर्याने आणि बायकोने ही Dad म्हटलं तरी ते भाऊ-बहिण होत नाहीत. आमचा बाप एवढा जबरदस्त आहे. जेव्हा तुम्ही “I Love You Dad” म्हणता तेव्हा आमचा बाप म्हणत असतो - “I Love My Child Always Forever” हे वाक्य English मध्ये असलं तरी हे वाक्य खूप मोठ्या मंत्राची ताकद घेऊन आहे. हा मंत्र कुठल्याही शौच-अशौच मानत नाही.
॥ हरि ॐ ॥