॥ हरि ॐ॥
साडेतीन मुहूर्तामधील एक पवित्र दिवस, सर्वात श्रेष्ठ दिवस ह्या दिवसातला क्षण न क्षण पवित्र, सुंदर, शांती समाधान देणारा मानला जातो. अतिशय सुंदरपणे पवित्र भावाने आज स्वस्तिक्षेम संवाद साधायचा आहे. जे तिच्याशी बोलायचं आहे ते तिला अतिशय सौम्यपणे सांगा. ह्या सुंदर दिवसाचं पावित्र्य जपत संवाद साधुया.
आज आपल्याला सुरुवात करायची आहे ह्या सुंदर पदाला -
ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’.
तशी सगळीच सुंदर आहेत आपण ह्या मोठ्या आईचं पद पाहायचं आहे. ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। ‘रामवरदायिनी’ ह्या एका शद्बामध्ये काय आहे हे लक्षात येतं. ह्याचा मूळ अर्थ रामाला वर देणारी हा आहे. ह्यात सात अक्षरे आहेत. हे नाव खूपच वेगळे आहे. कारण हा तिचा अवतार पण वेगळा आहे. हा सहावा अवतार आहे.
तिचं मूळ नाव काय आहे - महिषासुरमर्दिनी. हे नाव कसं आहे जो महिषासुर आहे, त्याचा नाश करणारी म्हणजे तिचं मूळ नाव नाहीच. तिचं अस्तित्व म्हणजेच महिषासुराचं अनस्तित्व. अशीच ती रामासाठी युद्धभूमीवर प्रकटली कारण रावण मरत नव्हता म्हणून आणि काकासुर आलेला आहे. हा काकासुर कोण आहे, आपण मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये बघतो, हा शुंभाचा पुत्र आहे. प्रेमप्रवासमध्ये आपण पाहिलंय रावण म्हणजे काय? इथे लक्षात घ्यायचं आहे हे असं स्वरूप आहे ज्या रूपात तिने एक मोठं समीकरण घातलेलं आहे आणि सोडवलेलंही आहे. राम वर आधी ‘रा’ आणि नंतर पुन्हा ‘र’ आणि मग ‘दायिनी’ ‘श्री’ बाजूला काढून आपण ‘रामवरदायिनी’ कसं फोड करून लिहिणार - र + आ + म + व + र + द + आ + य + इ + न + ई. ‘न’ चा ‘ण’ कसा होतो तर ‘र’ च्या सान्निध्यात ‘राम’ नाम तसंच आहे पण ‘रावण’ नावाचा तिने चोळागोळा केलाय, त्याला उलटंपालटं केलयं. म्हणजेच तिच्या ह्या नामात ज्याच्या हातून शत्रूचा नाश करायचा आहे आणि ज्याचा नाश करायचा आहे, ज्या शत्रूचा नाश करायचा त्यांची नाव आहेत. जो शत्रू आहे, त्याचं नावसुद्धा तुकडे तुकडे करून आपल्या गर्भात तिने ठेवलेलं आहे. ही रामवरदायिनी रामाला वर देणारी आहेच आणि ती प्रत्येक मनुष्यालासुद्धा बेसिक सांगते की ‘रामनाम’ हेच नाव रावणाचा नाश करण्याचं महत्वाचं शस्त्र आहे. सर्व श्रद्धावानांना दिलेला वर आहे. ह्या नामात रावणाला मारणारा ‘राम’ आहे, तुकडे तुकडे झालेला, खंडित झालेला ‘रावण’ पण आहे आणि ‘ईकार’ ही आहे ‘ईकार’ म्हणजे ‘शक्ती’. रामानामात तिची स्वशक्ती आहे, ती धारण करून तिने अवतार घेतलेला आहे आणि रामाकडून तिने रावणाला मारविले आहे. तुमच्या जीवनात रावण आला तर घाबरायचे कारण नाही.
ही रामवरदायिनी ह्या मन्त्रामध्ये तिच्या नामासकट रावणाचा वध होऊन बसलेली आहे. म्हणून आरतीत काय आहे? आरतीत आपण काय म्हणतो - ‘षष्ठीते श्रीरामवरदायिनी । अशुभनाशिनी रक्ष चण्डिके ।’ सध्या शुभंकरा नवरात्र सुरू आहे. ह्या नवरात्रीला ‘शुभ’ का म्हणतात. रामाचा जन्म झाला त्यावेळी ही नवरात्र संपते म्हणून. अश्विन नवरात्रीला रावणाचा मृत्यू झाला म्हणून ती अशुभनाशिनी नवरात्र आहे. ही आदिमाता शुभंकरा असताना, अशुभनाशिनीही आहे. त्यासाठी तिने दोन टोकाची नामं धारण केली आहेत. तो जो कोणी शत्रू आहे, त्याचं नाव तिने मूळनाव म्हणून धारण केलं आहे. जो शत्रूचा नाश करणारा आहे त्याला वर देणारी आहे. तिने तिच्या मूळ धर्माला अनुसरून नाश केलेल्या शत्रूचं नाम धारण केलं आहे. हे नाव ह्या मन्त्रात आलं त्याचं हे background आहे. हेच इथे फिट आहे. ह्या मन्त्राचा (गुरुक्षेत्रम् मन्त्राचा) प्रत्येक शद्ब प्रचंड मोठी समीकरणं सोडवणार आहे तुमच्या नकळत.
आपलं शरीर असंख्य अणूंनी बनलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असंख्य पेशी आहेत, केमिकल्स आहेत, असंख्य अणू आहेत. अणू प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन च्या पुंजक्यांनी बनलेला असतो. म्हणजेच आपलं अख्ख शरीर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन ह्यांचे पुंजके आहेत. हे नातं महाप्राण maintain करतो, त्याला प्रेरणा अंजनामाता म्हणजे आदिमाता देत असते. प्रत्येक अणूला टिकवून हनुमन्त धरतो. त्याला चालना चण्डिका देते. एका अणूचं रूपांतर दुसर्या अणूत होतं ते ती करते. सगळी रचना तिचीच आहे. म्हणजे आम्ही पापं करतो ते आदिमाता करते का? वस्तूचे कण आहेत तसेच विचारांचे कणही आहेत. ह्या कणांना इच्छा शक्तीची मोकळीक तिने दिलेली असते, त्यात ती ढवळाढवळ करत नाही, आणि तिच्या मुलांनांही ती ढवळाढवळ करू देत नाही. माझ्या इच्छा, विचार, निवड चुकली तरी त्या विचारकणांवर माझीच सत्ता चालत असली, त्यांना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे असलं तरी, त्याचात बदल करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. चुका करण्याचं स्वातंत्र्य तुमच्यात आहे, आणि चुका दुरूस्त करण्याचं सामर्थ्य चण्डिकाकुलात आहे. तुमच्या चुका लक्षात आल्या तर जसे जमेल तसे नामस्मरण करायला सुरुवात करायची, चुका दुरुस्त करण्याच्या मागे लागायचं त्यांना आवरण्याची सत्ता तिला आहे.
लहानपणी भोवरा फिरवलात त्याला नुसती दोरी बांधून चालेलं का? नाही. त्यासाठी skill यावं लागतं. सुरुवातीला ते येत नाही पण नंतर प्रॅक्टिसने ते येतं. मग तो भोवरा कसा फिरवायचा ते स्वातंत्र्य आहे. पण त्याच वजनाचा ठोकळा दिला तर तो फिरेल काय? नाही कारण तो भोवरा नाही. जेवढी तुमची इच्छाशक्ती, क्रियाशक्ती महत्त्वाची आहे, तेवढचं वस्तुमानही महत्त्वाचं आहे. आम्ही चुकत असू, भोवरा चुकीच्या ठिकाणी आपटत असू तरीही त्या आदिमातेने आमच्या हातात भोवरा तर दिला आहे. विचार करणार्या मेंदूच्या पेशी तिने दिलेल्या आहेत. त्यांना चालना देण्यासाठी ती अंजनामातारूपाने सुप्तावस्थेत असते, आणि तिचा पुत्र महाप्राण शरीरात असतो. देवीसिंह युद्ध कसं करतो हे आपल्याला माहीती आहे, माझ्या विचारांना तुझ्या चरणांवर सोपवलं आहे, हे त्या देवीसिंहाला सांगावं लागतं. ज्या क्षणाला तुम्ही त्याला हे सांगता, तेव्हा तो मेंदूतल्या योग्य पेशींना प्रेरित करतो. तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे, पण तुमच्यासाठी ती उचित नसेल तर तो अशी परिस्थिती निर्माण करतो की तुमचे चुकीचे विचार लगेच थांबतात. तुमच्या रस्त्यात तो आडवा येतो, त्यामुळे तुम्हाला हवीशी वाटणारी गोष्ट तो प्रेमाने दूर करतो आणि तुम्ही म्हणता देव माझ्याशी किती कठोर वागतो.
अनिरुद्धावरचा विश्वास, गुरुक्षेत्रम् मन्त्रावरचा विश्वास, आणि त्याच्या आईवर तुमचं प्रेम असेल, तर आम्हाला घाबरायचं कारण नाही. ती स्वत: गुरुक्षेत्रम् मन्त्रात आमच्यासाठी एकाच वेळी शुभंकरा आणि अशुभनाशिनी बनून आलेली आहे, ती श्रद्धावानांसाठी आधी शुभंकरा नंतर अशुभनाशिनी किंवा आधी अशुभनाशिनी आणि नंतर शुभंकरा नसते. ती एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडवून आणते.
हा देवीसिंह जो आईच्या समोर तोंड करून उभा आहे तो कसा आहे? सगळीकडे देवाचं वाहन देवाकडे तोंड करून बघत असतं. पण हा एकच असा आहे जो त्या आदिमातेसमोर जो कोणी उभा आहे त्याच्याकडे तोंड करून नेहमी attenation position मध्ये तो असतो. हा तिच्याकडे जो कोणी बघताहेत त्यांच्याकडे बघतोय. तिच्यासमोर कोण येतो त्यांच्याकडे हा बघतो. महिषासुरासारखा आदिमातेचा शत्रू असेल त्याचा नाश करण्यासाठी हा झेप घ्यायला तयार आहे आणि प्रेमळ भक्त असेल तर त्यांच्यावरही हा झेप घ्यायला तयार आहे पण कशासाठी त्यांच्यामागून येणारा शत्रू, संकट ह्यांचा नाश करण्यासाठी. मनुष्य देवाकडे धावत केव्हा येतो, जेव्हा तो संकटात येतो. हे एकमेव दैवत असं आहे, श्रद्धावानांकडे तोंड करून attention मध्ये उभा आहे. ‘युगे अठ्ठावीस उभा’ कुठल्याही क्षणी झेप घेण्यासाठी तो तयार आहे. आदिमातेचा शत्रू असेल तर त्याचा नाश करण्यासाठी झेप घेतो, आणि श्रद्धावान भक्तावर त्याच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी झेप घेतो. उपनिषद् मध्ये शेवटचा अध्याय परशुराम आणि त्रिविक्रमाचं नातं सांगतो.
ह्या गुरुक्षेत्रम् मन्त्राचा प्रत्येक शद्ब फार वेगळी वेगळी समीकरणं सोडवत राहतो. ह्या पदातली सगळी प्रमुख समीकरणं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या मन्त्रातील सगळी समीकरणं तुमच्या जीवनातील सगळ्या problems ची समीकरणं सोडवतील. चुकीच्या गोष्टीचं निराकरण, पापाचा नाश, अयोग्य ते नाश करणं, कमी आहे ते भरून करण्याची ताकद तुमच्या जीवनासाठी प्रत्येक गोष्ट देणारा आहे. गुरुक्षेत्रम् मन्त्र समीकरण नाही तर तुमच्या जीवनात जे problem आहेत, समीकरणं आहेत त्याचं प्रत्येक solution ह्या मन्त्रात आहेच.
पुढच्या वेळेस आपण ह्या सात अक्षरांबद्दल शिकणार आहोत. आजच्या शुभंकरा नवरात्रीपासून आपण सुरुवात केली आहे. आपल्याला आनंद करायचाय, हया गंगेत डुबक्या मारायच्या आहेत. तुम्ही ह्यात बुडणार नाहीत हे लक्षात ठेवा. ह्या मन्त्राने अवगाहन करायचं आहे. आता आपल्याला हा गुरुक्षेत्रम् मन्त्र कसा समीकरण सोडवत जातो ते पहायचं आहे. हे बरेच दिवस चालणार आहे. काळोखात चालत असताना माणसाचा हात धरलाय ज्याला पाऊल वाट माहितेय, तरी भीती वाटतेच की पायाखालून साप किंवा आणखी काय गेलं तर, पण जर प्रकाश असेल आणि bodygaurd पण बरोबर असेल तर भीती कसली? ह्या गुरुक्षेत्रम् मन्त्रावर खूप प्रेम करा, प्रेमाने हा मन्त्र म्हणा. ह मंत्र तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार आहे. हा गुरुक्षेत्रम् मन्त्र कसा निर्माण झाला व कोणी प्रथम म्हटला, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या आयुष्यात नाही तर, प्रत्येक आयुष्यात अनुभवायचं आहे.
॥ हरि ॐ ॥