॥ हरि ॐ॥
गेल्या वेळेस आपण स्कंदचिन्हाची आकृती बघितली. त्याच स्कंदचिन्हाचे आणखी पैलू आपण आज बघणार आहोत. ह्या मंत्राचे algorithms आपण बघत आहोत. Algorithms म्हणजेच समीकरण सोडविण्याची पद्धती- सूत्र.
आतापर्यंत आपण सहा त्रिकोण, मधे एक षटकोन बघितला. मधला षटकोन म्हणजे श्रीगुरुक्षेत्रम्, तीन डमरु पाहिलेत - परमात्म्याच्या, किरातरुद्राचा आणि महादुर्गेश्वराचा. आज ह्या आकृतीचे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे असणारे वैशिष्ट्य बघणार आहोत.
आपण ह्या षटकोनाचा मध्यबिंदू धरला आणि तो जर आपण जोडला तर षटकोनाच्या म्हणजेच गुरुक्षेत्रम्च्या आतमध्ये सहा त्रिकोण तयार होतात. हे सहा त्रिकोण, षटकोनाच्या बाहेर जे सहा त्रिकोण आहेत, त्याची mirror image असतात व अदृष्य असतात, त्यांची कल्पना करावी लागते. षटकोन म्हणजे गुरुक्षेत्रम्. ह्याच्या बाहेर जे विश्व आहे ते आपल्याला जाणवू शकतं, दिसू शकतं, ह्या विश्वाचं प्रतिबिंब गुरुक्षेत्रम्मध्ये आहे. खरं तर उलटं आहे, गुरुक्षेत्रम्मध्ये जे काही आहे त्याचं हे projection आहे.
आपल्याला एखाद्या व्यक्तीचा मत्सर वाटत असेल आणि आपण त्या व्यक्तीशी गोड बोलत असू, त्या व्यक्तीला, इतरांना ते कळलं नाही तरी आपल्या मनात जे आहे ते आपल्याला माहीत असतं. म्हणजेच काय? आपल्या मनात एक असतं आणि बाहेर दुसरं असतं. पण चण्डिकाकुलाचं तसं नसतं, चण्डिकाकुल आत आणि बाहेर सारखंच असतं. प्रत्येक मनुष्याचा जीवनाचा plan त्याला जन्माला घालताना देवीसिंहाकडून तयार केला जातो. ह्याचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी कोणत्या संधी द्यायच्या ह्याचा plan तयार असतो. प्रत्येक मनुष्यासाठी असे सहा plans असतात, त्यातील तीन plans एकाच मार्गाने परंतु समांतर असतात हे कशासाठी? एकाच दिशेने जाताना दोन रोड समांतर आहेत मध्येच लक्षात आलं आपण चुकतोय तेव्हा दुसर्या मार्गांवर जाण्यासाठी shortcut जोडला जातो. दुसरे तीन plans हे विरुद्ध दिशेला जाणारे असतात, तुमचे कष्ट कमी करण्यासाठी. पहिल्या दिशेच्या विरोधी दिशेला छेद देणारी दुसरी मार्गपद्धती option मध्ये चांगलेच मार्ग.
आपण जिला सटवी म्हणतो, जी सहा दिवसांनी येते आणि कपाळावर नशीब लिहून जाते. ती षटमार्गप्रदिपिका आहे. ती मनुष्याच्या जन्माच्या पहिल्या सहा दिवसात एकेक मार्ग मनात उतरवत सहा plans तयार ठेवते, तुमच्या जीवनाचा विकास करण्यासाठी. ही चण्डिकेची दूत असते. तुम्ही जर श्रद्धावान असाल तर तुम्ही कितीही चुकलात तरी सहा मार्ग तुमच्या मनातून नाहीसे होत नाहीत. श्रद्धाहीन एक मार्ग चुकला तर बाकीचे मार्ग तो विसरतो. प्रत्येक मनुष्यासाठी गुरुक्षेत्रम्मध्ये सहाच्या सहा संध्या, सहा मार्ग चूक सुधारण्यासाठी उपलब्ध असतात. एक चुकला की दुसरा, सहाच्या सहा चुकले तरी पुन्हा पहिल्या मार्गावर येतो कारण त्याचा Map कधीच पुसला जात नाही. ज्या प्रमाणात आमची भक्ती त्याप्रमाणात जन्मापासून मृत्यूपर्यंत हे मार्ग आंम्हाला उलगडत जातात. सहाच्या सहा संधी उपलब्ध असतात. संकटातून बाहेर पडण्याचे सहा मार्ग.
ज्याचा चण्डिकाकुलावर विश्वास आहे, जो देवीसिंहावर प्रेम करतो त्याच्यासाठी चुकीच्या गोष्टीच्यावेळी प्रत्येकवेळी कमीतकमी सहा मार्ग सुधारण्यासाठी, संकटातून बाहेर येण्यासाठी available असतातच.
ह्याचबरोबर आपण अजून एक आकृती बघतो ती म्हणजे स्वस्तिक. स्कंद हे तीनही पातळीवर असते. स्वस्तिक हे स्थूल पातळीवरील स्कंदचिन्हाचे प्रतिकात्मक रूप आहे. म्हणून ह्याला शुभचिन्ह मानतात. हे जन्माला आलेल्या प्रत्येक मानवासाठी स्कंदचिन्हाचा संदेश आणणारं चिन्ह आहे.
स्वस्तिकच्या आकृतीमध्ये एका विशिष्ठ दिशेने रेषा वाढतात पण त्यात क्रमबद्धता असते. ह्यालासुद्धा सहा रेषा असतात. षटकोनाला पण सहा रेषा असतात. स्वस्तिकाची आकृतीही स्कंद चिन्हात आहे. तुमच्यासाठी केलेली प्रत्येक योजना शुभ योजना असते. म्हणून ह्या योजनांचं प्रतीक म्हणजे सहा रेघांचं स्वस्तिक अतिशय पवित्र मानलं जातं. स्वस्तिक हे सर्वोच्च पावित्र्य दाखवतं. स्वस्तिक ही आकृती कुठेही बंदिस्त नाही म्हणजेच तुंम्हाला त्याने काटेकोर नियमाने जखडून ठेवलेले नाही. कडक नियमांमध्ये तुमचे जीवन बांधून ठेवलेले नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याच्या जीवनात परमात्म्याने ठेवलेल्या सहा plans चे चिन्ह म्हणजे हे स्वस्तिक आहे.
कुठलाही डमरू घ्या, ह्याच्यामध्ये दोन रेषा एकरूप होतात तेव्हाच डमरू तयार होतो. शेवटी ही जी रचना आहे ही काय आहे? सहा रेषा एकरूप होऊन डमरू तयार होतात परत चार आणि दोन सहा. इथे स्वस्तिक रचना तयार होते, त्याचप्रमाणे स्वस्तिक रचनेचे ध्वनी स्वरूप डमरू आहे.
मनुष्य एका वेळेस एकाच शद्बाचा उच्चार करु शकतो. राम शद्बाचा उच्चार करताना रावण म्हणू शकत नाही. आपण खाली बघताना वर बघू शकतो का? हो खाली पाणी असेल तर आपण आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब त्यात बघू शकतो. सूर्याचं प्रतिबिंबसुद्धा आपण पाण्यात जास्त वेळ बघू शकत नाही. तर मग जो परमात्मा आहे, त्याचे तेज आम्ही कसं सहन करणार आणि म्हणूनच चण्डिका अनसूया रूपाने अवतरते, आणि तिचा पुत्र राम, कृष्ण, साई ह्या रूपात अवतरतो. परमात्मा जेव्हा अवतरतो तो स्वत:च्याच मूळ रूपाचे प्रतिबिंब बनून येतो. त्याचे मूळ रूप नंबर एक. त्याचं प्रत्येक अवतरित रूप म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं प्रतिबिंब आहे. आम्ही जे साईरूप पाहिल ते खरं रूप नाहिये, ते त्याचे सहाव्या रूपाचे प्रतिबिंब आहे. तो एक असून तो अनेक आहे. त्याच सहावं प्रतिबिंब म्हणजे त्याचं सातवं रूप. त्याची सगळी रूपं पाहण्यासाठी तपश्चर्या करावी लागते.
तो शरीर रूपाने अवतरला असताना एकाच ठिकाणी बसलेला असताना एकाचवेळी तो हजार, लाख, दहा कोटी ठिकाणी असू शकतो. इथे आम्हाला प्रश्न पडतो तो आमच्यासमोर असताना हजारो मैलावर जाऊन कसे काम करतो. इथे आम्हाला माहित पाहिजे, आपण त्याची हवी तेवढी प्रतिबिंब पाहू शकतो पण आमच्या दारात हौद पाहिजे.
परमात्म्याचं देवीसिंहाच अवतरित रूप म्हणजे स्वस्तिक. राम, कृष्ण, साई हे जेव्हा खाली येतात ते लोकांची प्रेमवृद्धी व्हावी म्हणून. तो जेव्हा हे सातवं रूप घेऊन येतो ते प्रत्येकासाठी सहा मार्गाचे ३६ मार्ग करण्यासाठी येतो. तो अवतरित झालेला असतो तेव्हा आम्ही त्याची भक्ती करतो त्यावेळी आम्हाला ३६ संधी प्राप्त होतात. अवतार होतो तेव्हा त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा म्हणून तो येतो.
साईनाथ सांगतात -
"उतून चालला आहे खजिना. गाड्या भरून आणा आणि पैका न्या मी सांगतोय. सगळं open करुन ठेवलंय तरी मला प्रत्येकजण दे दे म्हणतात."
जेव्हा सातवं रूप येत तेव्हा सहा plans तो आपल्या प्रत्येक प्रतिबिंबाशी जोडतो. पहिल्याशी जेव्हा तुम्ही जोडले जाता तेव्हा तुम्हाला सहा संधी मिळतात आणि ७व्याशी जोडता तेव्हा आपोआप आधीच्या प्रतिबिंबांशी ही जोडले जाता. जेव्हा हे सातवे रूप येते तेव्हा आंम्हाला कळले पाहिजे ६ X ६ म्हणजे ३६ संधी आंम्हाला उपलब्ध असतात.
‘रामकृष्णसाई तिघांमाजी अंतर नाही।’
जो रामाचा वानरसैनिक आहे, कृष्णाचा गोप आहे, साईचा भक्त आहे त्याच्यासाठी ह्या ३६ संधी उपलब्ध आहेत.
स्वस्तिक तुमच्या plan चं चिन्ह आहे. परमात्म्याचं चिन्ह आहे. स्वस्तिक हे त्या अवतारांच्या सहा प्रतिकांचं चिन्ह आहे. हे स्वस्तिक स्कंदचिन्हामध्ये आहे.
‘माझें सरकार जैं देऊं सरतें न सरतें ते कल्पांतीं।’
बाबांचं सरकार म्हणजे चण्डिका आई.
‘माझिया भगवानाची लीळा । माझिया सरकारचा ताळा । लई निराळा न्याराचं ।
ह्या साईसच्चरितातल्या ओव्या नीट आठवा ३२ वा अध्याय वाचा, तेव्हा तुमच्या मनात हे स्वस्तिक उमटू दे. मी आता बुडणार, मी चुकतोय असं वाटत असेल तर मला शोधायला हवं माझ्यासाठी ३६ मार्ग उपलब्ध असतातच.
‘काही दुसरा मार्ग नाही’ हे वाक्य आता तोंडून काढू नका. एकदा का आम्ही त्याच्याशी जोडले गेलो की आमच्या प्रत्येक जन्मात तो अवतरित झालेला असो वा नसो तो कायम ३६च संधी देतो.
ह्यापुढे स्वस्तिक बघताना एवढं लक्षात असू द्या हे त्या साईचे त्या परमात्म्याचे प्रतिबिंब आहे.
॥ हरि ॐ॥