॥ हरि ॐ ॥
ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम: ह्या आदिमातेची सूत्रं आपण पाहिली, मंगलचिन्हं पाहिली, मंगलचिन्हाच्या खुणा बघत चाललो आहोत. स्वस्तिक, सूर्य-चंद्र, दीप. आज आपल्याला अनोखं शुभचिन्ह पहायचं आहे ते आपण सगळीकडे पाहतो. हे सॄष्टीतही आपण बघतो. हे चिन्ह आपल्याला स्पष्टपणे दाखवतं तुम्ही कुठे आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे. आदिमाता चण्डिका, महाविष्णु, लक्ष्मी, शिवगंगागौरी, किरातरुद्र, सगळ्यांना संपूर्ण चण्डिकाकुलाला कमळ प्रिय आहे.
कमळ हे एकमेव शुभचिन्ह असं आहे जे प्रत्येक देवतेचं आवडतं आहे. अध्यात्मामध्ये पावित्र्याचं आणि शुभ गोष्टीचं चिन्ह आहे. चिखलातून उगवतं आणि पाण्यातून वर येतं. कमळाचा वेल आहे. सृष्टीत चिखलात खाली मूळं असतात त्यातून देठ लांबसडक होऊन चिखलातून पाण्यावर येतो. हे फूल कसं असतं दोन पानांतून देठ वर येतो आणि कळी हळुच विकसित होते आणि मग सूर्याकडे बघत राहते.
कमळ हे मानवी जीवनाचे प्रतीक आहे. जन्म चिखलात असला तरी पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत येणारा देठ तुम्हाला असतोच (मिळणारच असतो). तळाशी जाऊन वर येणं माणसालाही लाजवतं, थकवतं. माणसाची ताकद ही कमळाच्या देठाची ताकद असते. देठ किती नाजूक असतो? हा देठ स्पॉंजी असतो तरीही तो चिखलातून पाण्यातून वर येतो. खाली चिखलातून, पाण्यातून बाहेर आल्यानंतर वार्याबरोबर डुलतो पण वादळी वारा असला तरी कोसळत नाही.
पाणी कितीही गढूळ असलं, कितीही चिखल असो तरी कमळ सुंदरच असतं. कमळाचे किती रंग असतात? लाल, गुलाबी, जांभळं, निळं, पांढरं आणि शिवगंगागौरी आईच्या हातामध्ये असणारं पिवळं कमळ. सूर्याकडे, परमेश्वराच्या प्रतीकाकडे बघणारं, सूर्याची किरणं (कृपा) प्राप्त करून घेण्यासाठी चिखलातून झगडून बाहेर येणारं हे शुभत्वाचं चिन्ह आहे. एक कमळ उगवलं की पसरत जातं. एकाची अनेक कमळं होतात.
हे शुभचिन्ह आहे का? हे शुभत्व देतं का? ह्या शुभचिन्हांची स्वत:ची ताकद आहे. तशी ह्या कमळाची ताकद काय आहे?
शिवाचं पूजन बिल्वपत्र वाहिल्याने पूर्ण होतं पण त्याला कमळ खूप आवडतं. खरं कमळ म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. खरं कमळ हे चण्डिकाकुलाच्या प्रत्येक सदस्याला आवडतं. खरं कमळ आपल्याला पहायचंय, शिकायचंय आणि वहायचं आहे.
कमळ मग ते कुठल्याही आकाराचं, रंगाचं असेल, तळ्यातलं, मंदिरातलं असेल ह्याने काही फरक पडत नाही. आज आपल्याला कमळ नीट समजून घ्यायचं आहे. आणि चण्डिका आईच्या चरणांवर अर्पण करायचं आहे.
कमळाच्या मुळापासून, देठापासून, कमळाच्या पाकळीपर्यंत प्रत्येक गोष्ट एकाच ध्येयाने झपाटलेली असते ती म्हणजे सौंदर्य. चहुदिशांनी बहरणं. आकर्षक, सुंदर दिसण्यासाठी. साधंसुधं मोहक सौंदर्य निर्माण करायचं हेच कमाळाच्या देठाचं, रोपाचं इप्सित आहे. हे सर्व बेस्ट का? कमळाच्या फुलण्यामुळे.
आपल्या जीवनात बहरणं मुळापासून असतं. मूळ आत असू शकेल पण फुलणं आकर्षक असायला हवं. देठ फुलाचा आहे तो पाण्यापासून वर येतो. पानं - दोन पानं पाण्यालगत असतात. त्याच्याखाली पाण्यात देठ असतो. त्याखाली कमळाची वेल असते ती खाली खाली चिखलात जात असते. सगळं अस्तित्व बेस्ट का बनलं त्याच्या फुलण्यामुळे सुरुवात कुठेना कुठे असते अशी ती सुरुवात चिखलापासून झाली. मूळ अस्तित्व म्हणजे आपण जिथून सुरुवात करतो. बीज रोवतं तेथेच मूळ येतं.
कमळाला हे सौंदर्य प्राप्त होण्यासाठी मुळाचं contribution असतं, वेल आजूबाजूला तरंगत असते तिचंही तेवढंच contribution असतं. आपण समजतो फक्त कमळ सूर्यप्रकाशाने फुलतं.
आपण खरे श्रद्धावान असू तर आपला कुठलाही काळ फुकट गेलेला नसतो. पापात, आळसात फुकट गेलेला काळ हे चण्डिकाकुल पाण्यापर्यंत येण्याच्या प्रवासासाठी वापरतं. तुमची श्रद्धा खरी असेल तर, पाण्याची पातळी कमी करून तुमचं जीवन फुलवेल. जीवनातला हा आळसाचा, चुकांचा प्रवास थांबवणारच व तुमचं कमळ फुलणारच. कमळाचं फुलणं म्हणजे जीवन सुंदरच होणार. त्यासाठी कमळाला देठ असावा लागतो. हा देठ आणायचा कसा? जीवनाचं कमळ उगवण्याचं बीज कुठलं? आपल्या आयुष्याचं कमळ कसं होणार?
आयुष्याचं कमळ होऊन ते कमळ भगवंताच्या चरणी वाहिलं म्हणजेच भगवंतचरणी लीन झालो तर ते जीवन किती सुंदर असेल? त्या जीवनासारखं सुंदर अधिक काय असू शकेल? संपूर्ण जीवन जरी चिखलात गेलं असलं तरी ते पाण्याच्यावर येऊन फुलवून आपल्याला चण्डिका आईच्या चरणी अर्पण करायचंय.
आदिमातेचं काय नाव आहे? - महिषासुरमर्दिनी. ही स्वत:च्या नावाने फेमस नाहीये. हिने जिचा वध केला त्याच्या नावाने ही प्रसिद्ध आहे. कुठलीही एक कथा शोधून दाखवा की जिथे हिने कुठल्याही असुराला वर दिलाय. साधं वरदान दिलेलं आहे. परमशिव भोळा आहे तो वर देतो, प्रजापतीब्रह्मा चाकोरीबद्ध आहे तो नियमानुसार वरदान देतो. पण महाविष्णू कधी वर देत नाही कारण सगळे असुर त्याला शत्रू मानतात. त्याचे कधीही पूजन करत नाही. पण त्याच महाविष्णूचे नाव घेणारा नारद मात्र कुठेही जाऊ शकतो. कारण त्याच्या मुखातला जप त्याच्या श्वासापर्यंत अधिक जोराने चालतो. असुरही त्याचे स्वागत करतात.
जो महाविष्णूची पूजा करतो तो असुरच उरत नाही. आपण बघतो बिभीषण, प्रल्हाद. तसंच महिषासुरमर्दिनीचही पूजन असुर करत नाहीत, ते तिच्याशी लढतच असतात.
मग आपण म्हणतो ह्या वृत्रासुराचा, महिषासुराचा देव कोण? हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. देव म्हणजे जो प्रकाशदाता आहे, ज्याचं नातं प्रकाशाशी असतं. असुर निशाचर असतात. अंधाराचे उपासक. आपण म्हणायला हवं ह्यांचा आराध्य कोण? हे कोणाची उपासना करतात? हे महिषासुर, वृत्रासुराच्या यंत्राची, त्यांच्या प्रतिमांची पूजा करतात. ते ज्याला पूजतात त्यांच्याकडून त्यांना वरदान मिळणार. त्यांना जो महिषासुर, वृत्रासुर वरदान देणार त्यालाच आदिमाता केवळ पायाच्या अंगठ्याने चिरडते, तो स्वत: वारंवार चिरडला गेलाय, मारला गेलाय.
आमची ही खरीखुरी आई आहे, हिचं आमच्यावर प्रचंड प्रेम आहे. ती आणि तिचे पुत्र ह्या असुरांना क्षणार्धात लोळवणारे आहेत.
आम्ही कुठे महिषासुराची उपासना करतो? आम्ही कुठे महिषासुराची, वृत्रासुराची उपासना करतो? जेव्हा आपण दुसर्या कोणावरही अन्याय करतो, दुसर्या कोणाला दु:ख देतो तेव्हा आपण महिषासुराची, वृत्रासुराची उपासना करत असतो. ह्याचे मूळ पाच उपचार आहेत.
१) परपीडन : ‘परोपकाय पुण्याय । पापाय परपीडनम्।’ जेव्हा आपण दुसर्याला विनाकारण त्रास देतो, दु:ख देतो, एखाद्यावर विनाकारण अन्याय करतो की आपण महिषासुराच्या पूजनाला बसलोत हे लक्षात घ्यायचं.
२) देवसंभाषण : देवाशी खोट बोलणं. महिषासुराचं ब्रीद आहे की मनुष्याला देवाशी खोटं बोलायला लावणं. कारण महिषासुराची, वृत्रासुराची एन्ट्री कशी होते खोट्यातून. आपण देवाशी खोटं बोलतो तेव्हा त्याची गिधाडं अंडी घालायला मोकळी. देवाच्या संदर्भात असत्य वागणं.
३) स्वस्तुती : स्वत:ची स्तुती स्वत: करणं किंवा स्वत:ची स्तुती दुसर्याने करावी अशी इच्छा बाळगणं. स्वत:ची स्तुती कधीही करायची नसते. ज्याक्षणी तुम्ही स्वत:ची स्तुती करता तेव्हा मधु आणि कैटभ तुमच्यावर आक्रमण करतात. दुसर्याने केलेली निंदा तुमच्यावर attack करते आणि तुमचा तोल जातो. स्वस्तुती शक्यतो टाळावी. कोणी केली तरी ‘श्रीराम’ म्हणून भगवंताच्या चरणी अर्पण करावी.
४) नास्तिकता (नकार) : परमेश्वर आहे ह्याला नकार देणं. हा महिषासुर व वृत्रासूराच्या पूजनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ही पूजा करताना ते तीन उच्चार करतात ; अ) मी परमेश्वरीला मानत नाही. ब) मी चण्डिकेच्या पुत्रांना मानत नाही. क) मी चण्डिकाकुलाला मानत नाही. महिषासुराच्या पूजनात हे उच्चार ‘आरती’ करतात तेव्हा हे शब्द वापरतात.
५) होकार : वृत्रासुर, महिषासुर ह्यांची पूजा करताना पूजन करणार्याने म्हणायचं असतं, "मला जे काही हवयं ते फक्त तू देणार, तूच दे, तुझ्याकडूनच येऊ दे."
बापू, तुम्ही हे सगळं कशाला सांगता? ती गोष्ट करायची नाही म्हणून सांगतो. ज्याने एकदा तरी गुरुक्षेत्रम् मन्त्र म्हटलाय, एकदा तरी बापूंवर प्रेम केलयं, एकदा तरी गुरुक्षेत्रम्मध्ये आलाय त्याने हे पूजन करायचं जरी म्हटल तरी त्यांच काय होईल त्याचा फक्त विचारच करा.
महिषासुराच्या पूजनात ‘नकार’ म्हणजे ‘आरती’ असते, आणि ‘होकार’ हा ‘प्रसाद’ असतो.
कमळ ही अशी गोष्ट आहे जी ह्या दोन गोष्टी अगदी exactly उलट करते. कमळ प्रकाशाला होकार देते आणि चिखलाला नकार देते. ‘मला माझी आई आणून दे’ हा होकार मी (परमपूज्य बापू) महिषासुराला दिला तर, तो आणून देईल काय? नाही देऊ शकणार. आणि मी (परमपूज्य बापू) आईला म्हटलं मला वृत्रासुराचं मुंडकं आणून दे तर ती नक्की देईल. वृत्रासुर सगळं काही देऊ शकतील माझी आई आणून देऊ शकणार नाही. मला माझी आई पाहिजे, महिषासुर नको. मग तुमच्या जीवनात वृत्रासुर प्रभाव माजवू शकणार नाही. ‘अंबज्ञ’ म्हणजे आई तू माझी आहेस, मी तुझ्या चरणांशी शरण आहे. वृत्रासुर तुमच्या जीवनात आला की त्याला सांगा आई पाहिजे, बापू पाहिजेत. कमळाप्रमाणे होकार द्या. नकार म्हणजे मला ह्या दोघांशिवाय बाकी कोणाकडून (महिषासुर, वृत्रासुर) काहीही नको. माझा बाप मला सगळं काही देईल.
कमळ जे आहे हे कमळ आपल्याला होकार आणि नकार शिकवतं. कितीही नाजूक स्थितीत तुम्ही असाल, वाईट परिस्थितीत असाल, काल आशा आज निराशा असली तरी जीवन देठाप्रमाणे वाढू द्या. जीवनात तडाखे खाताना कमळाप्रमाणे इच्छा पाहिजे. माझे जीवन सुंदर कमळ बनवून मी ते चण्डिकेच्या चरणी अर्पण करीन. हेच कमळ चण्डिकाकुलाला अतिशय प्रिय आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनाचं कमळ झालेलं त्यांना आवडेल. कमळ कसं असतं - चिखलातून अलिप्त राहणारं , पाण्याच्या लाटांत न बुडणारं ह्या सगळ्या qualities कमळात असतात. कमळातल्या मधाला ‘मकरंद’ म्हणतात. हे सर्वात श्रेष्ठ औषध आहे. हे त्या कमळात आहे. ह्याच्या बियाही अतिशय गुणकारी औषध आहे.
भुंगासुद्धा भोक पाडून आत शिरत नाही. आणि आत अडकला तरी तो भोक पाडून बाहेर पडू शकत नाही. जो भुंगा झाडाचा बुंधा, माणसाचे कान फोडतो तो कमळाच्या नाजूक पाकळ्या फोडू शकत नाही. माझं जीवन, जन्मोजन्मी मी चिखलात असेन, तरी माझ्या जीवनाचं कमळ बनव.त्यासाठी काय करायचं. होकार द्यायचा - मला चण्डिका आणि चण्डिकापुत्र हवा आहे आणि नकार म्हणजे मला वृत्रासुर आणि महिषासुर नको आहेत. म्हणजेच काय तर, ‘मी अंबज्ञ आहे’.
गुरुक्षेत्रम कधीही सोडू नका. निसर्गशक्तीसुद्धा आदिमातेच्या शक्तीपुढे क्षुल्लक आहे. हा हनुमन्त प्रभंजन आहे. असा हा हनुमन्त आणि त्याची आई आमच्याबरोबर असली की अख्खा पर्वत जरी आमच्यावर कोसळला तरी आम्हाला काहीही होणार नाही. प्रत्येकाला कर्मस्वातंत्र्य आहे त्याच्याआड चण्डिकाकुल कधीच येत नाही, त्याचे नियम पाळूनसुद्धा ते सगळं आमच्यासाठी करत असतातच.
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार।
जीवनाच्या चाकाची गती सतत चालतच असते, आम्ही चिखलाचा गोळा असतो. तो वेडा कुंभाराच्या पायाखाली तुडवला गेला, तो त्याच्या हाताने त्याच्या चाकावर फिरवला गेला की किती सुंदर आकृती तयार होईल? पूजा करताना म्हणायचं. -
१) हे परमशिवा मी तुला बिल्वपत्र अर्पण करतोय. बिल्वपत्र म्हणजे दोन हस्तक आणि एक मस्तक. म्हणजेच माझं प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार तुमच्या चरणी वाहतो.
२) महाविष्णूला तुलसीपत्र अर्पण करतो. नि:शंक भक्तीभाव. तुलसीपत्र हे राधेच्या आल्हादिनीच्या भक्तिभावाचं प्रतीक आहे. जे तोललं जात नाही. देवाने ह्याच्यावर जास्त कृपा केली, माझ्यावर कमी कृपा केली असं तोललं जात नाही. त्याचं प्रेम जसं आहे तसं स्वीकारायचं असतं. हा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो ह्या विश्वासाने.
३) कमळ अर्पण करायचं म्हणजे - ‘मी अंबज्ञ आहे’. मला आदिमाता, चण्डिकापुत्र हवाय. त्यांच्याकडून येईल तेच मला हवंय. वृत्रासुराकडे मी काहीही मागणार नाही. ह्यासाठी वृत्रासुराच्या पूजनाच्या पाच गोष्टी टाळायच्या आहेत.
वृत्रासुर कितीही वेळा अवतरला तरी त्याचा नाशच झाला आहे. तुमच्या जीवनात वृत्रासुराने प्रवेश केला असेल, तुमच्या हातून वाईट गोष्टी घडत आहेत. गुरुक्षेत्रम् मंत्राचा आश्रय घ्या. शांतपणे, निवांतपणे चण्डिकाकुलाचा हात धरून कमळाप्रमाणे चला.
मला (बापूंना) George Washington Carver यांचं एक वाक्य खूप आवडतं ...........
Start Where you are, With whatever you have,
Make something out of it, Never be satisfied
आपल्यावर वृत्रासुराचा अंमल झाला तरी घाबरायचे कारण नाही. कारण मातृवात्सल्यउपनिषदमध्ये आपण बघतो की उत्तम आणि मध्यम ह्या यात्रेत पहिल्यापासून आहेत, पण विगत अर्ध्यावरून सुरू होतो. ह्याचं कारण कोणाला माहीत होतं का? विगत एवढा प्रवास करू शकणार नाही हे जाणून त्याचा प्रवास चण्डिकेने कमी केलाय. तिला माहीत आहे हे बाळ वीक आहे, पापी आहे त्याला हा प्रवास जमणार नाही. म्हणून त्याला ती नंतर सामील करून घेते. आम्ही विगत असलो तरी आम्ही परमेश्वराबरोबर त्याच्या यात्रेत सामील होऊ शकतो.
॥ हरि ॐ ॥