॥ हरि ॐ ॥
पहिल्यांदा आपण रामनाम बँकेचा ३१/१२/१३ पर्यंतचा रेकॉर्ड पाहूया. आधीच्या काऊंन्टिगमध्ये मिस्टेक झाली होती. १५ लाख अकाऊंट ओपन झालेले नसून एक लाख, सत्तावन हजार अकाऊंट ओपन झालेले आहेत. रामनाम वह्यांची एकूण जपसंख्या पन्नास अब्ज, छ्पन्न कोटी, पाच लाख आहे आणि ह्याच बँकेच्या अंजनामाता वहीची एकूण जपसंख्या सत्तावीस कोटी, ब्याण्णव लाख, ऐक्यांऐंशी हजार आहे. ह्या नवीन वर्षात आपण ह्यात किती वह्या add करायच्या हे आपण ठरवायला हवं.
पावसाळा सुरु होतो तेव्हा शाळा सुरू होते. नवीन पुस्तकं-वह्यांना कव्हर घालायची. कव्हरं आम्ही मुलंच घालायचो. वह्या-पुस्तकांना कव्हरं घालायला मजा यायची. त्यावर सुंदर अक्ष्ररात नावं घालायची. किती आनंद होता ते सर्व करण्यात. वर्ष संपलं की त्याच्यापेक्षा मोठं काम असायचं, सगळ्या वह्यांमधून उरलेली चांगली पानं फाडून काढायची आणि त्याच्यापासून एक नवीन वही स्वत: बाइंडिंग करून बनवायची, नव्या वर्षासाठी रफ वही. मजा यायची. स्टॅम्प जमा करून वहीला चिकटवायला मजा यायची. सिगरेटची पाकिटं आम्ही गोळा करायचो त्याला नंबर असायचे. गोट्या खेळताना गोट्यांबरोबर पाकिटंही लावली जायची. शाळा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी कमावलेल्या गोट्या पुन्हा पुन्हा मोजायचो. हे छोटे-छोटे आनंद आम्ही उपभोगायचो. मे महिना आला की आम्ही बेचकी तयार करायचो. बेचकीने झाडावरचे पेरू, जाम तोडायचो. झाडांवर चढायचो. चढताना अनेकदा धडपडायचो. मुली बांगड्यांच्या काचांनी खेळायच्या, काच लागण्यात, इजा होण्यातही मजा असते. ती लागण्यातली मजा आम्ही हरवून बसलोत. सगळं कसं safe. आता मूल जरा पडलं की त्याच्याभोवती सगळं घर गोळा होतं. अरे, मुलगा आहे झाडावर चढणारच, पडणारच, पडला तर पडला. आता काय असतं सगळीकडे एकच बाब्या किंवा एकच बेबी असते. प्रेम आहे मान्य आहे, पण जरा लागू द्या नं. त्यांना खुलेपणाने जगू द्या. हल्लीच्या तरुण मुलांना टयूब बदलता येत नाही. आमच्या वेळेला मुलं आपोआपच वडिलांचं, काकाचं बघून-बघून शिकायचेत.
काचांऐवजी काड्या आल्या आणि सगळं safe झालं. स्कूटरलासुद्धा पत्र्याऐवजी plastic आलं. पत्रा लागला तर इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे, पण पत्रा लागेल ह्याची भीती बाळगून रहायचं नाही.
लागण्याची गोष्ट सुंदर असते. लागायलाच पाहिजे. त्याशिवाय मुलं वाढणार कशी? हल्ली सगळी कडे overprotected वातावरण आहे. लागून थोडीशी इजा होणं ह्यात मजा असते.
आम्ही करवंदाच्या झाडीत घुसायचो, काटे लागायचेच मजा यायची. Fish मध्येसुद्धा आम्ही जवळा खात नाही, आम्ही पॉपलेट, रावस खातो. जवळा, बांगडा हे सगळं खालची लोकं खातात. पॉपलेट काय आकाशातून पडलंय का? भाज्यांमध्ये, फळांमध्येसुद्धा स्ट्रॉबेरी, प्लमच का? तर ती पॉश दिसतात. आमचं स्टेटस वरचं आहे. खरं म्हणजे शरीर आणि मनाची हेल्थ चांगली असणं हे स्टेटस आहे. शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय चांगलं? समाजाच्या बदलानुसार आम्ही आमचं बोलणं, वागणं बदलू, पण आमच्या हेल्थशी असं करणार नाही. स्ट्रॉबेरी पेक्षा केळ्यामध्ये जीवनसत्त्व जास्त आहेत. हल्ली माणसं चिकू आणि सफरचंदसुद्धा सालं काढून खाताना दिसतात म्हणजे आपण आपलं जीवन निसर्गापासून दूर नेतो. कुठलंही फळ/भाजी वीस मिनिटं कोमट पाण्यात मीठ घालून भिजवून ठेवायची मग त्यातील विषारी द्रव्यं निघून जातात. आवडीने कुठलंही फळ खा. पण स्टाईल म्हणून फळं खाल्लं तर खरं स्टेटस खाली पडेल. व्हिटॅमिन ‘डी’ ची टेस्ट किती जणांनी केली? शरीरामध्ये 300 bio-chemical reactions व्हिटॅमिन ‘डी’ आणि त्याच्यामधून निघणारे compounds ह्यांच्यावर अवलंबून असतात. व्हिटॅमिन ‘सी’ फक्त फळांमध्येच आहे. आपल्याला झेपतील ती फळं खाल्लीच पाहिजेत. पण आपण फळं खात नाहीत.
आम्ही काय खातो, पितो ह्याच्यावर आमचं सगळं जीवन अवलंबून असतं. छांदोग्य उपनिषदात म्हटलयं-
प्राण जलमय: - प्राण जलावर अवलंबून असतात.
मन अन्नमय: - मन अन्नमय असते. अन्नातून मन बनतं.
वाक् तेजोमय: - वाक् म्हणजे बुद्धी, धृती, कामाची गती तेजावर अवलंबून असते.
Basic मन हे अन्नामुळेच बनतं म्हणून आपण काय अन्न खातो हे महत्वाचं आहे.
मूलाधार चक्र सगळ्यात महत्त्वाचं चक्र आहे. त्याला आचार-विचार-आहार-विहार ह्या चार पाकळ्या आहेत. लहानपणापासून मुलांवर भितीचे संस्कार केलेत तर त्यांचे आचार-विचार थांबणार, त्यांची प्रगती थांबणार.
एकदा दादांकडे आई-वडील आले होते. ते सांगत होते, ‘दादा, आमच्या मुलाचा खूप प्रॉब्लेम आहे हो, तो अजिबात अभ्यास करत नाही, ट्युशन लावू का?’ इथे मुलगा S.S.C/12 वीत नाहीए, मुलगा ज्युनिअर के.जी. मधून सिनियर के.जी. मध्ये जाणार होता. हे चुकीचे आहे.
एक मुलगा बारावीला होता. त्याचे आई-वडील त्याला घेऊन दादांकडे घेऊन आलेत. त्याला अकरावीला चांगले मार्कस् मिळाले होते. त्याचे आई-वडील सांगत होते, ‘‘दादा, हा अभ्यास नीट करत नाही.’’ दादा त्या मुलाला विचारतात, ‘‘काय झालं बाळा?’’ मुलगा म्हणाला, ‘‘काही नाही’’ मुलगा फुगुन बसला होता. पुन्हा वडील म्हणाले, ‘‘दादा, हा उपासनाही करत नाही.” मुलगा म्हणाला, “करतो उपासना पण तुम्हाला दाखवत नाही.” त्याने दादांना विचारले की, “दादा, मी बोलू का?” दादा म्हणाले, “बोल बाळा.” तो मुलगा म्हणाला, “दादा, मला अकरावीला दुसर्या मुलापेक्षा एक मार्क कमी पडला म्हणून ह्या दोघांनी एक तास लेक्चर दिलं. तेव्हा मी ठरवलं की मी अभ्यास करणार नाही.’’ एका मार्कासाठी एक तास प्रवचन !
येथे मुलाचंही चूक आणि आई-बाबांचंही वागणं चूकतंय.
आपण मुलांना ९०% झोडतच असतो. तुम्ही पण एक मूलच आहात. स्त्री असो की पुरुष. ते ८० वर्षाचे, ६० वर्षाचे असोत. प्रत्येकात एक लहान मूल असतंच. त्याला मोकळेपणाने जगू द्या, खेळू द्या. खोटया समजुतीखाली स्वत:च्या आणि स्वत: मधल्या लहान मुलाला तुरुंगात डांबून ठेवू नका.
नाक्यावर जायला बाईक पाहिजे, फिरायला जायला पॉश ठिकाणं पाहिजेत, का? तर स्टेटससाठी. रस्त्यावरसुद्धा चालत-चालत फिरता येतं. मोकळ्या मैदानात जाऊन खेळता येतं. पण आम्ही ते अजिबात करणार नाही.
हल्ली घरातल्या घरात मंगळागौरी बंद झाल्यात. बायका बसफुगडी घालायला गेल्यात तर त्यांना उठवणारीही खाली बसेल अशी परिस्थिती झाली आहे. हे सगळं का होतयं?
लागण्याची भीती (fear of getting injury). लोकांशी संबंध पण लांबूनच ठेवतो, संबंध जास्त वाढलेत तर कडूपणा येईल म्हणून. आम्हाला सतत भीती कसली वाटते तर, ईजा होण्याची, मनाला-शरीराला इजा होण्याची भीती असते. निरलसपणे करण्याची नाटकं करतो आणि आपणसगळं जपत-जपतच करत असतो. शिस्त पाळूनसुद्धा मोकळेपणाने जगता येतं. जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येक माणसाचा (intellectual growth) बुद्धीचा विकास, कार्यशक्तीचा विकास, त्याच्यातला बालक जेव्हा जिवंत राहतो, बालपण जेव्हा जपलं जातं तेव्हाच खर्या अर्थाने होतो.
कवी म्हणजे खरा ज्ञानी, जीवनाचा खरा अर्थ समजणारा.
Matuare पणे जगताना आपल्यातलं मूल मेलं नाही पाहिजे. आपल्यामधल्या लहान मुलाला जगवा, त्याला मोकळेपणने वाढवा. बालिश चेष्टा करा असं नाही तर आपल्यातल्या बालकाला मोकळीक द्या.
आपल्यातलं हे बालक आम्ही ओळखायचं कसं? त्याला शोधायचं कसं?
बाळपणीची प्रत्येक चांगली गोष्ट आठवायची. अधूनमधून आपल्या लहान असतानाच्या वेळच्या प्रत्येक चांगल्या गोष्टी आठवायच्यात. आईने भरवणं, नवीन कपड्यांचा आनंद, नवीन खेळणी घेतल्याचा आनंद, बाबांचं रागे भरणं, बाबांचे फटके आठवायचे, आईचा ओरडा आठवायचा, शाळेत केलेली मस्ती आठवायची. हे सगळं आठवताना आनंद करता आला पाहिजे. कॉलेजला कसे जायचो? कशी मजा करायचो? 13 to 19 is the Teen Age. Thirteen, Fourteen, Fifteen, Sixteen....... ह्या Teen Age मध्ये आपण कसे होतो हे आठवलं की आपल्यातलं बालक आनंदी राहतं. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद करता आला पाहिजे.
हे सगळं आठवत राहिलं की त्या बालकाला काय आवडायचं हे मोठ्याला कळतं. लहानपणी लहानातल्या लहान गोष्टीतही आनंद वाटायचा. मोठं झाल्यावर लहान-सहान गोष्टीत आनंद वाटत नाही. लहानपणी आईने आणलेलं टिकलचं पॅकेट पाहूनही आनंद व्हायचा, पण आता नवर्याने आणलेली सोन्याची माळही कमीच वाटते.
आता लहान-सहान गोष्टीत आम्हाला आनंद करता येत नाही, आणि आनंद Express ही करता येत नाही. रिझल्ट लागल्यावर मुलाला मिठी मारता यायला पाहिजे. मुलाने आणलेल्या सुनेला पाहून तिला मिठीत घेता आलं पाहिजे. सुनेने आनंदाची बातमी सांगितल्यावर, वडिलांना मुलाला मिठी मारता आली पाहिजे. पण आमच्या मनात पहिला विचार येतो. डॉक्टर कुठला बघायचा याचा. अरे आधी आनंद Enjoy करा. पण तिथेही भीती असते की, सुनेचे लाड केलेत आणि सून डोक्यावर बसली तर. भीती आम्हाला समूळ काढून टाकता आली पाहिजे. आम्हाला भीती असते, आम्हाला तसाच response मिळाला नाही तर?
मुंबईबाहेर गावात चालताना साप येणारच हे मनात ठेऊन चाललोत, तर गावभर सापच दिसतील. अशा भिणार्या माणसालाच साप दिसतात. भित्यापाठी ब्रह्मराक्षस.
मनाला सतत injury होण्याची भीती असते. कोणी बोललेल्या गोष्टी माझ्या मनाला लागतात. किती लागतं तुमच्या मनाला? मनाला भोकं का पडतात? आई, वडील, शिक्षक ओरडलेत तर ओरडू देत. त्याने तुमच्या मनाला भोकं का पडतात? लोकांनी एक comment पास केली तर आमच्या मनाला भोकं पडतात. सूनेला सासू बोलली तर भोकं का पडतात. आपलं मन एवढं पातळ, दुबळं झालंय की जरा कुणी काही बोललं की भोकं पडतात. लहानपणी मित्रांशी किती भांडायचो? पण पुन्हा एकत्र यायचो ना? ह्याचा अर्थ आमची सहनशक्ती, सहिष्णुता कमी झाली आहे. आमच्या मनाला प्रत्येकाची गोष्ट लागतेच का? कारण आमच्या मनाला भीती असते की, मला कोणाकडून injured व्ह्यायचं नाही. ज्यांच्या मनात भीती असते तेच injured होतात.
एकदा दादांकडे आई आपल्या मुलीला घेऊन आली होती. त्या मुलीच्या घरी नणंदा आणि सासू मिळून सहा जणी होता. त्या तिला टोमणे मारून त्रास द्यायच्यात. बापूंनी तिला सांगितलं की, “त्यांनी टोमणे मारलेत की हसायला सुरुवात कर. त्यांना जो तुला टोमणे मारण्यामुळे, दुखावण्यामुळे आनंद होतोय, तो त्यांना देऊ नकोस.” मुलीला ते पटलं. सहा महिन्यांनी ती दादांकडे आली, ती म्हणाली एका नणंदेला वेड लागलंय. काहींना दुसर्यांना त्रास झाल्याचा आनंद होत असतो तो आपल्याला कळला पाहीजे. तुमच्या मनाला भोकं पडल्यामुळे दुसर्यांना आनंद होतो.
आमचं मन इतक भीतीने भरलेलं आहे की कोणी चांगलं म्हटलं तरी ते वाईटच वाटतं.
एक मुलगा गावी काका-काकूंकडे रहायचा. छान चाललं होतं. ते चांगले सांभाळत होते. मुलगाही सद्गुणी होता. काका-काकूंना मदत करायचा. कुणीतरी नातेवाईकाने हे पाहिलं, खुष झाला. त्याच्या आई-वडीलांकडे मुलाचं कोतुक केलं तर आई भांडायला गेली, माझ्या मुलाला राबवून घेताय. आम्ही विचार करतो की, सगळं जग वाईटच आहे. सगळे मला त्रास द्यायलाच बसलेत, सगळं जग तसंच आहे हा विचार काढून टाका. जगात वाईट माणसं असतातच, त्यांच्यापासून लांब राहिलचं पाहिजे. माझा सद्गुरुवर विश्वास असेल तर, तो माझ्या आजूबाजूला चांगली माणसं आणणारच. पण चांगलं झाल्यावरही तेच विचार करायचे नाहीत. समोरच्या प्रत्येक व्यक्तीचा शद्ब मला बोचण्यासाठीच आहे, असं करून चालणार नाही. ही भीती काढण्याचा मार्ग आहे - तो म्हणजे लहान मुलांनांही ‘नाही’ ऐकण्याची सवय लावा.
हल्ली लहान मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवयच नसते. कामावर जाणार्या आईला गिल्ट वाटत असतं की, मुलांना वेळ देता येत नाही. म्हणून त्या मुलांचे फाजिल लाड करतात. पूर्वी घरात सहा-सात मुलं असायची त्यावेळी प्रत्येकाच्या वाटेला आई यायची असं नाही. प्रत्येक मुलाला आई काय कडेवर घेऊन मिरवायची नाही. मुलांमध्ये संख्यात्मक नाही, तर गुणात्मक दृष्ट्या तुम्ही कसे संस्कार करता हे महत्त्वाचे आहे. (Qualitative Time matters) मुलांनी काही मागितलं की तुम्ही लगेच आणतात. हल्लीच्या मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवय राहिलेली नाही. म्हणून ‘नाही’ हा शद्ब वाट्याला आला की ही मुलं पेटून उठतात, अडखळून पडतात.
कितीही संपत्ती असली, आणि मुलाने दहा गोष्टी मागितल्यात तर, तीन ताबडतोब द्या, दोन थोड्या वेळाने द्या बाकीच्या गोष्टी महाग आहेत म्हणून सांगायच्या आणि देणं टाळायचं किंवा आवश्यकता नाही म्हणून नाकारायच्या. मुलांना कळलं की, आपल्या बापाकडे रग्गड पैसा आहे तर ती वाटेल ते मागतात.
अमेरिकेत आई-वडीलांनी मुलांना मारले की, त्यांना तुरुंगात टाकले जाते. ह्याला काय अर्थ आहे? ही काय child psychology झाली. मोठेपणीसुद्धा आईने मारलेली थापडसुद्धा छान वाटली पाहिजे. आपल्याकडे लहान बाळं रडलं की आनंद वाटतो. अमेरिका ही मोकळीक घालवून बसल्यामुळे तिथे कोणीही कोणाचं उरलेलं नाही. सगळी जनावराची नाती तयार होत आहेत. मुलांना अडवणे बंद केल्यामुळे तिथे मोकळ्या sex ला सुरुवात झाली. हा विकृत मनोवृत्तीचा प्रवास सुरु झाला आहे. मोकळ्या सेक्सला सहा राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. ह्या गोष्टीला मान्यता देणं म्हणजे दुष्ट बुद्धींच्या लोकांचा हेतू आहे की, माणसाला जनावर बनवायचं. बहीण-आई-पत्नी ह्यात फरक राहिलाच पाहिजे. माणसाला मोकळीक देऊन आई आणि बाई मधला फरकच कळणार नाही असं माणसाला जनावर बनवायचं. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. हे जनावराचं जीणं भारतीय संस्कृतीत बसत नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे त्याला मोठी-मोठी नावं देऊन ते चांगलं होणार नाही. माझं कर्तव्य आहे की, चुकीच्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. ‘मातृदेवोभव:। पितृदेवोभव:। आचार्यदेवोभव:।’ हीच आमची संस्कृती आहे.
तुम्ही किती चुकीचे वागता ह्याचं calculation मी ठेवत नाही. माझ्याकडे तुमच्या चुकांची वही नाही तर तुमच्यात चांगलं काय आहे ह्याची मी नोंद ठेवतो. माझ्याकडे तुमच्या पापांची वही नाही.
चुकीचं वागणं fear of injury मुळे घडतं. कबड्डी, कुस्तीची practice करताना लागणारच as simple as that ‘अरे संसार, संसार, जसा तवा चुलीवर । आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ त्या चटक्यांमध्ये गोडवा असतो. भजी तळताना कितीवेळा तेल उडतं हातावर, तरी भजी तळताच ना. आजारी असतानाही आई जेवण करतेच ना! ती injury ला घाबरत नाही, ती ह्याचा आनंद करते.
इथे सुचितदादांच्या आईची गोष्ट आठवते. चौघानांही टॉयफाईड झाला होता. चारच्या खाली कोणालाही ताप नाही. एक डॉक्टर घरी तपासायला यायचा. पावसाचे दिवस होते. घर गळतही होतं. त्याही परिस्थितीत सुचितदादांच्या आईने, तिला स्वत:ला अंगात साडेचार ताप असतानासुद्धा तिने उठून सगळं घर कोरडं केलं, गळणार्या जागी बोळा बसवला. हा प्रसंग ही भावंडं रत्नाच्या हारापेक्षा जपतात. तिला injury ची भीती वाटली नाही. हेच जीवन आहे.
आम्हाला लोकांचे शद्ब, कृती लागते. आम्हाला जॉबसुद्धा desk चा जॉब हवा असतो. उन्हात जायचीसुद्धा आम्हाला भीती वाटते त्यामुळे चांगले जॉब गमावून बसतो. कारण साईट वर्क जास्त असतं.
पावसात रेनकोट, छत्री घेऊन जाणं आवश्यक आहे. पण एक दिवस तरी पावसात छत्री न घेता भिजता आलं पाहिजे. जरा भिजलो की मनात भीती वाटते ताप, सर्दी होणार म्हणून. झाली तर झाली सर्दी. पण आम्ही पावसात भिजण्याचा आनंद घेत नाही.
आमचं आयुष्य ह्या एकाच भीतीमध्ये बंद आहे. ह्या fear of injury मधून बाहेर पडायला आपल्या आईने एक छान algorithm दिलायं. आपण श्रीस्वस्तिक्षेमसंवादाच्या सुरुवातीला म्हणतो, आपल्या उपासनेची सुरुवात त्याने होते.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥
त्र्यंबके गौरी, म्हणजे तीन डोळे असणारी. महादेवीच्या सगळ्या स्वरूपांना तीन डोळे असतात. आपण जिथे कपाळावर स्वस्तिक काढतो तिथे हा तिसरा डोळा असतो. तिच्या पुत्रांना दत्तात्रेय, हनुमन्त, ब्रह्मदेव, विष्णू हयांना तिसरा डोळा नाही. किरातरुद्र, शिवगंगागौरी आणि शिवाला तिसरा डोळा असतो.
ब्रह्मदेव सदैव डोळे उघडनूच असतो. विष्णूचे डोळे उघडे किंवा बंद पडलेत ह्याने काही फरक पडत नाही. कारण विष्णू डोळे उघडे असताना जेवढ्या कारवाया करतो त्याच्यापेक्षा जास्त डोळे बंद असताना करतो. शिव भोळा आहे. पण पेटलाच तर मग कोणाला ऐकत नाही.
शिवे सर्वार्थ साधिके, म्हणजे सर्व प्रकारच्या श्रमांसाठी शक्ती, स्कील, कौशल्य, कार्यक्षमता देणारी आहे. तिचा तृतीय नेत्र सदैव तुम्ही बघत असा की नसा, हा सगळ्यांचा balance राखतो, जो balance बिघडला आहे तो पूर्ववत करण्याच काम करतो. तुम्हाला जे जे चांगलं करताना तुम्ही injured होऊ शकता त्यापासून वाचवतो, injured झालात तर ती जखम तो भरून काढतो. तुम्हाला लागू नये आणि लागलंच तर जखम लवकर भरून काढतो.
सर्व: म्हणजे सर्वत्र मंगल करणारी. प्रत्येक अर्थ म्हणजे साधी गोष्टसुद्धा म्हणजे चष्मावरची धूळ साफ करण्यापासून ते Google Glass शोध लागण्यापर्यंत प्रत्येक कृतीतली fear of injury ती काढून टाकते. चहा ते पंचपक्वान्न स्वयंपाकातील प्रत्येक क्रिया करण्यासाठी लागणारी सर्वच्या सर्व क्रियाशक्ती ती देत राहते. जर आम्ही सद्गुरु तत्त्वाशी ऋणी आहोत, तर आम्हाला injury होणार नाही. पण आम्ही माणसं आहोत, injured होऊ शकतो पण त्या जखमा भरून काढण्याची ताकद तिच्यात आहे.
तिचा तृतीय नेत्र रोगहर अक्ष आहे. रोगाचं हरण करणारा आहे, मन, बुद्धी, जीवन, कीर्ती तसंच शरीराच्या जखमा भरणारा आहे. पण बापू आमच्या जखमा भरत नाहीत. त्यासाठी आपण algorithm वापरला पाहिजे. माझ्या आईला तिसरा नेत्र आहेच आणि त्यामुळे ती माझ्या जखमा भरणारच हा विश्वास हवा.
तुमच्या हातून चुका झाल्यात हरकत नाही. ह्याचा अर्थ मी पाप करण्याची मुभा देत नाही. पण पाप केल्यानंतर सुधारण्याची संधी मोकळेपणाने द्यायला ती आणि तिचा पुत्र बसला आहे. माणसं चुका लक्षात ठेवतात. संधी देताना तो मागचं पान परत उलगडून वाचत नाही.
उपनिषदात ते तिघंजण (उत्तम, मध्यम, विगत) विचारतात, ‘सगळं विश्वासावर अवलंबून आहे का?’ त्यावर तो सांगतो, ‘होय, तुमचे मंत्र, उपासना, साधना ही सगळी साधने आहेत तुमचा विश्वास दृढ करण्यासाठी.”ह्या मंत्रातूनच नवार्णव मंत्र तयार झाला - ‘ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’
‘विच्चे’ हे अव्यय आहे. आणि, परंतु, पण हे सुद्धा अव्यय आहे. अव्यय म्हणजे ज्यात कर्ताच्या, कर्माच्या, क्रियापदाच्यानुसार बदल होत नाही. ‘विच्चे’ म्हणजे साध्या दर्शनापासून ते तपश्चर्येपर्यंत जे जे म्हणून आपण करतो. ‘विच्चेयति तृतीय नेत्रम्’ हा algorithm आहे. हा विच्चेकारच तृतीय नेत्र आहे. जिच्यात सगळं, सर्व मंगल करण्याची ताकद आहे ती तुमचं मंगल करणार नाही का? मला किती मोठी जखम झाली हे महत्वाचं नाही. पण तिची परीक्षा पाहण्यासाठी मुद्दाम जखम करून घेऊ नका. ती जखम कशी भरून काढायची हे बघायचं तुमचं काम नाही. जिने केवळ संकल्पातून जग उत्पन्न केलं, ती काय करू शकते ते तुम्हाला माहीत पडणार का? ती काहीही करू शकते, तिचे मार्ग आम्हाला माहीत नाहीत. तिचा पुत्र काहीही करू शकतो, त्याचे मार्ग आम्हाला माहीत नाहीत. आम्हाला वाटत, आम्हाला पाहिजे त्या मार्गावरूनच त्याने यावं आणि आमची जखम आम्हाला हवी तशी भरून काढावी. आम्हाला तिचा तृतीय नेत्र माहीत पाहिजे. तो रोग बरा करणारा आहे. रोग म्हणजे - injury प्राण, मन, शरीर, बुद्धी, आमच्या अर्थकारणाला झालेला रोग. ‘सर्व मंगल मांगल्ये’ म्हणताना तिचा तृतीय नेत्र बघता आला पाहिजे.
गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणताना मी मंत्र म्हणत नव्हतो, तुम्हीच म्हणत होता पण फरक पडला का? नाही. जर आपण ह्या गुरुक्षेत्रम्च्या आश्रयाला असलोत तर कितीही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी घडल्या तरी आपल्या कार्यात काहीही फरक पडत नाही.
॥ हरि ॐ ॥