॥ हरि ॐ ॥
सूचना :- आपल्या भारतीय समाजाला उत्सवाची आवड असते. आपल्या संस्थेमध्ये काही
नियम आहेत. केंद्रावर येऊन कुठल्याही कार्यकर्त्यांचा २५वा, ६०वा वाढदिवस साजरा
करू नका. ज्याचा वाढदिवस आहे त्याने जरूर बोलवावे घरी गिफ्ट घेऊ नका. तुम्ही
लोकांकडून गिफ्ट घेता ते जर तुम्हाला परत नाही करता आले तर ऋण राहते. ऋण,
वैर, हत्या कुणाला चुकत नाही. कुणाच्या फुकट गाड्या वापरायच्या नाहीत. आपण
जेव्हा फुकटे बनतो तेव्हा कर्जबाजारी होतो.
ॐ रामवरदायिनी ह्या आदिमातेचे algorithms आपण बघत आहोत. आज आपल्याला अतिशय सुंदर algorithm बघायचे आहे. आपण बर्याच जणांनी ही आकृती बघितली आहे.
जे चिन्ह वाढत जाते ते महासरस्वतीचे देवमातेचे चिन्ह.


किती जणांनी शाळा सुटल्यावर दसर्याला पाटीवर सरस्वतीचे पूजन केले? ह्याला सरस्वती का म्हणायचं? दसर्याच्या दिवशी खरोखरच असं चित्र काढून पूजन करणं छान असतं. हे चिन्ह दगडी पाटीवरच का काढावे ? कारण पहिले जे वाङमय लिहिले गेले / कोरले गेले ते दगडावर.... जी गायत्रीमातेची त्याच्या आईची पहिली प्रतिमा परशुरामाने काढली ती पाषाणावर. म्हणून तो मार्ग श्रेष्ठ. जी गायत्री तीच महिषासुरमर्दिनी तीच महासरस्वती.
ह्यात १ते ७ आकडे का ? ह्या आकृतीत अनेक त्रिकोण, डमरू, diamonds तयार होतात. ह्या आकृतीत अनेक त्रिकोण डमरू तयार होत आहेत. ह्या आकृतीचे रहस्य काय? १ म्हणजे काय? १ हा मूळ आकडा आहे. प्रत्येक आकडा हा १ मधूनच बनतो. प्रत्येक आकड्याला १ ने भाग जातोच जातो. ह्या आकड्याने किती मोठ्या आकड्याला गुणले तरी तो तेवढाच राहतो. म्हणजेच हा प्रसरणशील नाही. पण १ आकडा बेरजेने बघितले तर हा आकडा सगळे आकडे उत्पन्न करतो.
१ पेक्षा वेगळा आकडा शून्य ०. पण जर १ नसेल तर शून्य कळणार कसे? म्हणजेच शून्य कळायला आधी एक असायला हवा. रात्र आणि काळोख ह्यामध्ये फरक आहे. रात्र म्हणजे अंधकार नव्हे. सूर्य अस्ताला गेल्यापासून सूर्योदय होईपर्यंतचा काळ म्हणजे रात्र. काळोख म्हणजे काळाकुट्ट अंधकार. म्हणून ह्या आदिमातेची ३ नावे आहेत. कालरात्री, महारात्री, मोहरात्री.
शून्य आहे पण कळेल कधी? एकातून एक वजा केल्यावरच ना.
समजा मी १०० रुपये दिले व ह्यातून शून्य रुपये वाटायला सांगितले. तर तुम्ही कितीही जणांना वाटू शकता ना. तेच तुम्हाला शून्य रुपये दिले शून्य लोकांना वाटायला सांगितले तरीही तेच कितीही जणांना वाटू शकाल. शून्याला तुम्ही शोधू शकत नाही. शून्य ही अवस्था = काही नाही. ह्या अर्थाने वापरतो.
१ च्या आधी कितीही शून्य वाढवली तरी १चाच उच्चार होणार.
जसे ०१, ००१, ०००१, ००००१
तेच जर .०१, .००१, .०००१ असा बिंदू दिला तर तो आकडा बदलत जातो. हा बिंदू जो आहे तो अपूर्णांक दाखवतो.
हा १ म्हणजे आदिमाता जेव्हा ती स्वत:ला प्रलयात ओढून घेते तेव्हा शून्य. शून्यापुढचा बिंदू म्हणजे मूळ बिंदू दत्तगुरु.
आदिमातेचे प्रगट स्वरूप म्हणजे एक शून्य म्हणजे शून्यसाक्षिणी.
विश्व सगळे गणितानेच बनले आहे. बिंदू अपूर्णांक दाखवतो. जो एक नाही तो अपूर्णांक म्हणजेच हा बिंदू पूर्णत्वाची सीमा आहे. पूर्णत्वातून ही स्वत:च सर्व विश्व प्रगट करते. म्हणजे अदितीची गायत्री बनते.
बिंदू स्वरूपात अदिती शून्यस्वरूपात गायत्री बनते. १ रूपात महिषासुरमर्दिनी बनते. त्यानंतर अनसूया बनते म्हणजे काय? (.०१) बिंदू शून्य व एक ही तिन्ही एकाच वेळेस असणारं स्वरूप म्हणजे अनसूया. ही अनसूया एकमात्र अशी आहे की जी बिंदूला सरकवू शकते. कुठलीही आकृती अपूर्णच आहे, पण अनसूयारूपाने. जो निर्गुण निराकार त्यालाच आपला पुत्र म्हणून जन्माला घातला म्हणजे अपूर्णाला .०१ ला पूर्णांक १.० केला. दत्तगुरू = संपूर्ण पूर्णत्व. जो माणसाला कधी दिसूच शकणार नाही असा दत्तगुरू दाखवून दिला. हा खेळ दाखवून देणारी ती एकच. त्या प्रेमळ आईने तो दत्तगुरु केला आहे, हे संपूर्ण विश्वाला दाखवून दिले. त्या आदिमातेने बघितले मानवाला सूक्ष्मातल्या गोष्टी कळत नाही. सर्व जगाला स्थूलातील गोष्टीच कळतात म्हणून तिने त्या निर्गुण निराकार दत्तगुरुस दत्तात्रेय म्हणून आपल्याच उदरातून जन्मास घातले.
आपण सर्व अपूर्ण आहोत आपल्याला पूर्ण तीच बनवू शकते कारण तीच अपूर्णांकाला पूर्णत्व देणारी आहे.
सरस्वती चिन्हात १ चे ७ आकडे काय दाखवतात. अनसूया मातेचा जन्म आठवा. सप्तस्वरातून हा जन्म होतो.
आम्ही जेव्हा मातृवात्सल्यविंदानम् व उपनिषद प्रेमाने वाचतो तेव्हा तिचा हस्तक्षेप आमच्या जीवनात होतोच. त्या कथा आमच्या जीवनात शिरून तुमच्या aura वर, तुमच्या जीवनातील व्यक्तीमत्वावर परिणाम होतोच. तुमच्या जीवनातील संकटे दूर होणारच.
ही ७ वेळा १ म्हणजे सप्त स्वर आहेत. ७ सूर कुठले. सा रे ग म प ध नी सा (मराठीतील) इंग्लिशमध्ये डो रे मी पा सो ला मी हे देखिल सप्त सूरच आहेत. म्हणजेच संगीताचा मूळ गाभाच सप्त स्वरांशी जोडला गेला आहे. सृष्टीचे सर्जन होताना गायत्री ते मानवाच्या उत्पत्तीपर्यंतचे हे सात टप्पे आहेत. परमेश्वराने आपल्या पुत्राला ज्या ऑर्डर दिल्या त्यानुसार परमात्म्याने त्याच्या रूपानुसार मानवाची आकृती बनवली. परमात्म्याची सर्वोच्च निर्मिती म्हणजे मानव त्याच्या रूपरंगानुसार डोळे, नाक, कान, हात-पाय सगळे जसेच्या तसे. जशी लक्ष्मी, पार्वती, रुक्मिणी तशीच प्रत्येक स्त्री आहे. तसेच राम, कृष्ण ह्या प्रमाणेच प्रत्येक पुरुष आहे. म्हणजेच त्या आल्हादिनीने, परमात्म्याने आपलीच छोटी प्रतिमा, आपलाच छोटा अंश तयार केला म्हणजे मानव.
सप्त स्वर म्हणजे तिच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक वेळेला उमटलेला ध्वनी आहे. ॐ म्हणताना आपण मागे बघितले तोंडातून हवा बाहेर टाकली जात नाही. ॐ हा एकमेव ध्वनी असा आहे. ॐ कारात तिघांची प्रतिमा आहे. ह्या ॐ कारापासुन पुढची प्रक्रिया म्हणजे सा. तिचे ३ पुत्र व त्यापासून मानव म्हणजे परत सां.
ह्याच्यामधल्या प्रक्रिया म्हणजे रे ग म प ध नी. म्हणुन संगीत मानवाला शांती देते. हे वनस्पतींना देखील उल्हासित करते. गोशाळेत चांगले संगीत लावले तर त्याचे त्यांच्या गर्भावर चांगले परिणाम होतात. चांगलं ऐकलं की त्याचा चांगला परिणाम होतोच होतो.
१ चे ७ आकडे म्हणजे आदिमाते़च्या आमच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे पूजन आहे. म्हणजे इथे तुमचा संबध सगळे जन्म पार करून जो पहिला मानव होता सत्ययुगातला, ज्याची एकही चूक नव्हती, पाप नव्हते, कलंक नाही, दोष नाही अशा तुमच्या त्या स्वरूपाशी तुम्ही जोडले जाता. जेव्हा तुम्ही या चिन्हांचं पूजन करता तेव्हा सत्ययुगातल्या पुरुषाबरोबर पूजन करता जो निष्कलंक आहे.
१० + ६ = १६
१६/२ = ८ येथे ८ > ६ (आठ हा सहापेक्षा मोठा आहे.)
तुम्ही सुरुवातीचे १००० + आताचे १० / २ = ५०५. इथे तुमची ताकद १० वरून ५०५ पर्यंत वाढते.
म्हणजेच सप्त सूरांचे पूजन करताना मी, माझ्या पहिल्या जन्मासहीत ह्यांचे पूजन करणे किती चांगली गोष्ट आहे. त्या आईने सगळे देऊन ठेवले आहे. मग आम्ही आळस का करायचे. आम्हाला फक्त वापरायचं आहे.
हे महासरस्वतीचे चिन्ह देखील परशुरामानेच बनवले आहे. परशुराम विवाहित होता व त्याच्या पत्नीचे नाव धारिणी. ही भूदेवी. परशुराम ब्रम्हचारी नाही. सहावा अवतार म्हणजे परशुराम. ही धारिणी कन्या कोणाची? ही वरुणाची कन्या आहे. आपण जो कलश बसवतो त्याची पूजा करताना वरुणाचा उल्लेख येतो. पाऊस पडला की ती फळते फुलते. वरूण साक्षात ऋषी बनून प्रगटला. त्या ऋषीचं नाव अगस्त्य. अगस्त्य हा साक्षात वरुण आहे. अगस्त्य व लोपामुद्राची कन्या धारिणी.
रेणुकेच्या विरहात परशुराम असताना अत्रि अनसूया भेटायला येतात धारिणी तिथेच असते. तिच्या मनात तेच सप्त स्वर झंकारत राहतात, ती धुळीत त्याप्रमाणे बोटं फिरवत राहते. धारिणी (आल्हादिनी) खूप कमी बोलते, मौनातच बोलते. तिच्या ह्या हालचाली परशुराम पाहतो आणि धुळीत धारिणीने बोटं फिरवल्याने जी प्रतिमा तयार झालेली असते ती प्रतिमा परशुराम चित्रांकित करतो. सरस्वतीचे चिन्ह परशुरामाने काढले व तिला प्रतिमेचे रूप दिले धारिणीने.
सप्तस्वरांचं / सुरांचं नियंत्रण सरस्वतीकडे. महासरस्वती व सरस्वती ह्यांच्याकडे वीणा आहे ज्यात सात सूर नियंत्रित करण्याची ताकद आहे. हे नाद, सप्तसूर, प्रेम, परशुरामाचं आईच्या विरहाचं प्रेम आहे.
ज्ञान जर प्रेमाशिवाय असेल तर फुकट जाते. प्रेमाच्या ज्ञानातुन अणुशक्ती निर्माण होते. त्यातून उर्जा निर्माण होते. ज्ञान नेहमी मधुर प्रेमळ असावे लागते. रूक्ष ज्ञानातून atom bomb तयार होतो तर प्रेमाने वीज तयार होते. ही निर्मिती आहे. निर्मितीची प्रक्रीया - ज्ञान + प्रेम.
ही दोन्ही चित्रं बाजूला काढायची असतात. तुमच्या जीवनाचे भाग्य तुम्ही घडवता. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून मिळते. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा एकत्र म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा. मानवाच्या हातून घडलेल्या निर्मितीची पूजा. म्हणून शिक्षणाची देवता आपण सरस्वतीला मानतो. सरस्वतीच्या प्रतिमेत एक शिवत्रिकोण daigram आहे
(उलटा त्रिकोण Daigram शक्ती त्रिकोण)
जे विश्वात अफाट ज्ञान आहे ते मी कसं शिकणार? माझ्या जीवनासाठी आवश्यक तेवढे ज्ञान मला ग्रहण करता यावे ह्यासाठी हे सरस्वतीचे पूजन आहे. संपूर्ण सृष्टीतले ज्ञान आम्ही नाही पेलू शकत त्यामुळे ह्यापुढे दसर्याला आम्ही दोन्ही प्रतिमा पूजायला हव्यात.
हे दोन algorithm फार शांतपणे बघायचे आहेत १ आणि शून्य आमच्या जीवनातील अभिवाज्य भाग बनत चालले आहेत computer ची Binary भाषा १ आणि ० मध्येच आहे. शून्य व एक हे आकडे जीवनात सगळीकडे पसरलेले आहेत. ज्ञान म्हणजे degree नव्हे. वर्षातुन एकदा करायचे पूजन प्रेमाने करा. आपण आज प्रार्थना करायची आई, जे ज्ञान माझ्यासाठी आवश्यक आहे ते मला प्रेमासहीत दे.
॥ हरि ॐ ॥