॥हरि ॐ॥
आपण महासरस्वतीचा Algorithm बघितला. आज सरस्वतीचा बघायचा आहे, ही आकृती दादांच्या ब्लॉगवरून पण सर्वांना मिळाली. आपण जे सगळे Algorithm बघितले की मनात एक प्रश्न निर्माण होतो, हे सगळे कशासाठी? सांकेतिक चिन्ह जपण्यासाठी ? नक्कीच नाही. Knowledge preserve करण्यासाठी, ज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी.
तुमच्यातले सगळे TV बघता पण इथे किती जण TV mechanic आहेत? आपण remote ने TV लावतो पण तो remote ने कसा चालू होतो याचे ज्ञान आपल्याला आहे का? नाही. एखादे यंत्र वापरायचे कसे हे आपल्याला कोणीतरी समजावून सांगितले की आपण वापरू शकतो त्यासाठी त्या यंत्राची technical माहिती असण्याची गरज नसते. बायका mixer वापरतात. त्याचं mechanism माहित नसतं तरीही वापरता येतो.
जगामध्ये जी प्रगती होत असते ती शास्त्रज्ञ घडवून आणत असतात. ह्या सुविधा सामान्य माणसांना मिळाव्यात ही इच्छा असते. त्यानुसार त्यांना माहिती पुरवली जाते.
हे जसं science आहे जे अजिबात माहित नसतानाही सामान्य माणसाला सहज वापरता येते तसेच जे ब्रह्मर्षी, महर्षी, तपस्वी होते त्यांनी त्यांच्या तपश्चर्येतून ज्या दैवी गोष्टी शोधून काढल्या ज्या सामान्य माणसाला शोधणे अशक्य आहे, त्या गोष्टी माणसापर्यंत सहज पोहोचविण्यासाठी त्या ऋषींनी ही algorithms (सांकेतिक चिन्हं) शोधून काढली. त्यांनी त्यांच्या तपश्चर्येने जे काही देवाला ओळखलं ते त्यांनी आपल्याला सहज सोपं करून दिलं.
कर्मस्वातंत्र्य म्हणजे जे मिळालंय त्यातून निवड करण्याचे स्वातंत्र्य. आज जे सरस्वतीचे चिन्ह आपण काढणार आहोत ते आपल्याला बघायचे आहे. π ची माहिती बघितली ते details नाही कळले तरी त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह आदराने धारण केले की त्याचे फायदे मिळणारच. प्रेम आणि विश्वास महत्वाचा.
माणसाने आपल्या limitations ओळखल्या पाहिजेत. कितीही मन strong असले तरी anesthesia दिला की तो माणूस झोपतोच. माणसाच्या मनाच्या शक्तीला, ताकदीला खूप limitations आहेत.
माणसाच्या limitations ओळखूनच ऋषींनी ही Algorithms शोधून काढली आहेत. ही सर्व सूत्रं जी आपल्यासाठी अतिशय छान remote आहेत. (remote म्हणजे दूरचे अंतर), आपल्याला माहिती आहे आपण दैवी ज्ञानापासून खूपच दूर आहोत. आपण साधीसुधी माणसं आहोत. आपल्याला साध्यासुध्या मार्गाने, साध्यासुध्या ज्ञानाने पुढे जायचे आहे. आम्ही १७०० वेळा पडलो तरी आपल्याला पुढेच जायचे आहे आणि पुढेच जाणार. मागच्या चुका उगाळत बसू नका. डोक्यावर जास्त ओझी घेऊन फिरू नका. तुम्ही स्वत:वर खटले चालवू नका. कायदेशास्त्रानुसार न्याय देण्याचा अधिकार न्यायाधीशाला असतो. तुम्ही न्यायाधीश आहात का? त्यापेक्षा आपली चूक प्रेमाने मोठ्या आईसमोर, गुरुसमोर उभे राहून सांगा आई चुकलो क्षमा करा. प्रेमाने माफी मागा. बाकी जबाबदारी त्याची.
जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस तरुणच असतो. डोळे बंद करून विचार करा आपण किती बदललो? आपण तसेच असतो. हेच basic आपल्याला चांगल्याप्रकारे बदलायचे आहे. बदल जरूर स्विकारा.
स्वत:वर खटले भरू नका. आम्हांला कोणीही न्यायाधीश बनवलेले नाही आणि जो न्यायाधीश आहे ना तो खूप कृपाळू प्रेमळ आहे. १०० किलोची चूक झाली तरी १ मिलीग्रॅम शिक्षा देतो तेही सुधारण्यासाठी, आपले जीवन हे अधिकाधिक सुंदर आणि समर्थ करण्यासाठी.

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवः सदा पूजिता
सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥१॥
सरस्वतीची प्रार्थना आपण शाळेत का घेतो तर तिच्या कृपेमध्ये एकच अडथळा असतो ते म्हणजे जाड्य म्हणजे नैराश्य व आळस.
सरस्वतीच्या आड ही एकच गोष्ट येते - आळस आणि नैराश्य. ह्यामुळेच सरस्वतीची कृपा प्राप्त होत नाही. त्यामुळेच ते प्रार्थना करतात आमच्यात थोडासाही आळस ठेऊ नकोस. माता सरस्वतीला ब्रम्हादि देखील वंदन करतात. ही माता ज्ञान सतेज करण्यासाठी आहे. ज्ञान अनंत आहे.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत ज्ञान भरलंय आणि बहुतेक ज्ञान हे अनुभवातून येते. सरस्वतीच्या कृपेने हे ज्ञान प्राप्त होते. साध्या गोट्या खेळणं, भोवरा फिरवणं अशा सगळ्या खेळांमध्ये देखील ज्ञान असते. घरात जेवण कसे बनवायचे, जेवण कसे वाढायचे, स्वयंपाकघर कसे स्वच्छ ठेवायचे हेदेखील ज्ञानच आहे. जेवणात व्यंजन (लिंबू, मीठ, लोणचे, पापड, कोशिंबीर) कुठे कसे वाढायचे हे सुध्दा ज्ञान आहे. भाजीत गुळ का घालावा? भाज्यांचा हरवसपणा जाण्यासाठी. कढीपत्ता का खावा? बापूंनी सांगितले म्हणून काही दिवस खाल्ले आता विसरलो. शताक्षी प्रसादम् पण आपण विसरलो. जगात कसे वागावे, कसे वागू नये हे पण ज्ञानच आहे. काही ज्ञान आपोआप मानवाला बघून येते. काही genes मधून येते.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही चूकीची म्हण आहे. दुसर्याला ठेच लागल्यावर नाही तर स्वत:ला ठेच लागल्यावरच माणूस शहाणा होतो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण खरी सरस्वतीच्या कृपेने होते. मातृवात्सल्यविंदानम् मध्ये सरस्वती कुठे येते माहीत आहे? नाही? very Bad. रक्तदंतिकेच्या चरित्रामध्ये.
नैराश्य आणि आळस आपल्याला पदोपदी येतो. आपण किती आळशी आहोत हे प्रत्येकाला माहीत आहे. ssc ला fail झाला म्हणून आत्महत्या केली हे आपण वाचतो. एखादी परीक्षा नापास झालो तर झालो पण जीवन हे कोणत्याही परीक्षेपेक्षा खूप मोठे आहे. सगळ्या प्रकारचं ज्ञान हे आपल्याला शिकवतं.
आलस्य मनुताना महता... आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सरस्वतीची ही आकृती आळस आणि नैराश्य दूर करण्यासाठी आहे. ही प्रज्ञारूपाने प्रत्येक भक्ताच्या मस्तिष्कामध्ये राहते. ही आकृती १ आकड्यातून तयार होते १ सात वेळा व आत आत येते इथे हा १ आकडा म्हणजे काय ? हे आपल्याला बघायचे आहे. एकच गोष्ट जी सात प्रकारची आहे आणि त्या सात गोष्टी एकच आहेत व त्याचवेळी त्या वेगळ्या पण आहेत.
इथे आपण सात गोष्टी काढूया. ह्या वेगळ्या असल्या तरी एकच आहेत.
तुम्ही स्त्रिया रुखवत बनवतात त्यात साखरेच्या गोष्टी असतात (ताट, वाटी, नारळ) ह्यात पदार्थ वेगवेगळे असतात पण Basically त्यात साखरच असते म्हणजेच मूळ पदार्थ साखर व हे सारं रुखवत म्हणून ते एकच आहे.
इथे आपण सात गोष्टी वेगळ्या काढल्या ते जोडल्यावर देऊळ तयार झाले. आतमध्ये दगडापासून बनलेली देवाची मूर्ती आहे. देऊळ पण दगडाचे बनलेले आहे, जमीन पण दगडाची आहे. हे वेगवेगळे असूनही देऊळ एकच आहे.
शाळेत वेगवेगळे विषय असले तरी इयत्ता एकच आहे, अभ्यासक्रम एकच आहे. आपण टक्केवारी सांगताना सगळ्या विषयांचे मिळून मार्क्स सांगतो.
४ थीतला प्रत्येक मुलगा / मुलगी या शाळेचे विद्यार्थी आहेत पण शाळेचे सगळे विद्यार्थी ४थीत आहे असे म्हटले तर एकच आहे का? नाही.
ज्ञान म्हणजे निवड करणं, ग्रहण करणं. जे वेगवेगळं वाटतं तरीही एकच आहे हे जाणणं म्हणजे ज्ञान. प्रत्येक विषयाचं ज्ञान सात पातळ्यांवर असतं.
ऋषींनी ज्ञानाच्या सात भूमिका मांडल्या आहेत. साधं उदाहरण घेऊया घरातले जेवण बनवायचे आहे इथे
१. भाजी खाल्लेली, केलेली असली पाहीजे. क्रियेची भूमिका महत्त्वाची कितीजणांसाठी करायची हे क्रियात्मक ज्ञान.
२. आवश्यकता. कधी करायची? किती जणांसाठी करायची?
३. जे खाणारे आहेत, त्याना काही जणांना तिखट आवडते काही जणांना नाही . ही क्रियेमधील विभिन्नता ही तिसरी पातळी
४. ही भाजी कितीवेळ टिकते, त्याचा शरीरावरचा परिणाम (गरम / थंड) हे सर्व गुणज्ञान हि चौथी पातळी
५. ह्या भाजीत किती Proteins, Minerals आहेत हे scientific ज्ञान पाचव्या पातळीवरचे.
६. ही भाजी जर मी दररोज केली तर ह्या भाजीबरोबर दुसरी कोणती गोष्ट चालेल? नुसती भाजी जेवायला दिली तर चालेल का? कोणाला किती वाढावी? तुमच्या क्रियेमागचा हेतू, कारणपरंपरा. ती भाजी मुलाने खाणे आवश्यक आहे आणि जर तो खात नसेल तर दोन धपाटे घालणे गरजेचं असतं. क्रियेमागचा हेतू महत्वाचा ह्ल्लीच्या मुलांना खाण्याबाबतीत चुकीचे लाड होतात म्हणून योग्य जीवनसत्त्वे मिळत नाही ही सहावी पातळी झाली.
७. मन अन्नमय: - अन्नाच्या अतिसूक्ष्म भागापासून मन बनते ही ७ वी पातळी.
अश्या हा सर्व ठिकाणी ज्ञानाच्या ७ भूमिका आहेत. ह्या सातही भूमिका समानपणे महत्त्वाच्या. मनुष्य ७ ही भूमिका घेऊन पहिली ते दहावी शिकतो. ह्या ७ ही गोष्टीमध्ये एकाचवेळी मनुष्याला mature व्हावे लागते. जीवनाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये ज्ञान महत्त्वाचे. ह्या ७ ही भूमिकांचे ज्ञान एकाच वेळी समानपणे देणारी ही देवी सरस्वती. सगळ्या भूमिका Balance करण्याचे, त्यात Harmony आणण्याचे काम ही करते.
आपल्याला माहीत असते पण वापरता येत नाही. अनेकवेळा आपल्याला वाक्याचा अर्थ कळत नाही बर्याच वर्षानंतर कळतो हे माझ्या भल्यासाठी होतं मलाच कळलं नाही.
ही आकृती मोठ्यापासून लहान लहान होत जाते. म्हणजेच स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत. मानवाला सर्वात सोपं ज्ञान स्थूलाचे. हा दगड, हे झाड, हा हात. स्थूल गोष्टी लगेच कळतात. ज्ञानाची पहिली पातळी मोठी स्थूलापासून लहान लहान होत अतिशय सूक्ष्म होत जाते. अतिशय सूक्ष्म ज्ञान देखील तुमच्या कक्षेमध्ये आणून ठेवते ती ही सरस्वती. हे चित्र आपण दसर्याला काढतो. मुलांच्या अभ्यासाच्या कपाटामध्ये हे चित्र लावा ते कार्य करणारच. आपणही जीवनभर विद्यार्थीच आहोत. आपल्यालाही तिची आवश्यकता आहे नैराश्य आणि आळस दूर करण्यासाठी. हा आळस ही कशी दूर करते? आपले शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र ह्या सात धातूंनी बनलेले आहे. ह्या सात धातूंमध्ये आळस पसरलेला असतो कारण तो मनात असतो.
पुराणात आपण वाचतो गंगा, यमुना व सरस्वती ह्या तीन नद्या होत्या. सरस्वती गुप्त झाली. आपल्या शरीरातही ह्या इडा, पिंगला व गुप्त सरस्वती म्हणजे सुषुम्ना नाडी.
थकतो, कंटाळतो तो प्राण. आजारी पडतो तो प्राण. सोडून जातो तोदेखील प्राणच. शरीरातील हे पंचप्राणांचे प्रवाह हे सात धातूंच्या स्त्रोतांमधून ज्या प्रकारे कार्य करीत असतात, ते योग्य, सुरळीत असेल तर आम्हाला आळस, नैराश्य येऊ शकत नाही.
आळस, नैराश्य neuro-chemicals मुळे बनतात. ती chemicals अतिशय कमी प्रमाणात तयार करण्याचे काम ही प्रतिमा करते.
जेव्हा आपण ही प्रतिमा बघतो तेव्हा मेंदूमध्ये तिची नोंद होते. हीच प्रतिमा जर Computer ला ओळखायला दिली तर त्याला 10 Angles ने त्याची ओळख करून द्यावी लागते.
मानवाच्या मेंदूत Vision Center मध्ये जे चित्र आपण बघतो, त्या चित्राची माहिती मेंदू बाकीच्या Centers ना देतो.
हे सरस्वतीचे चिन्ह जेव्हा आपण बघतो तेव्हा ज्ञानार्जनासाठी आवश्यक सर्व केंद्रे जागृत होतात. म्हणून ही प्रतिमा अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याबरोबर ती भावना पाहीजे ही सरस्वतीमाता आहे. त्या एका बघण्याने ध्यानार्जनाची सातही केंद्र जागृत होतात. म्हणजे आळस आणि नैराश्य आपोआप नाहीश्या होतात.
आपोआप उत्साहाचे केंद्रही जागृत होते. उत्साह म्हणजे मन्यु, नैराश्य-आळसाची समान treatment म्हणजे मन्यु (उत्साह).
म्हणून हे चित्र प्रेमाने आपल्या घरात असू द्या. दोन्ही सरस्वती व महासरस्वतीची चिन्ह असतील तर किती सुंदर होईल. रोज सकाळी आम्ही ही चिन्ह बघितली तर किती फरक होईल. आपोआप आळस - नैराश्य जाईल.
वसिष्ठाची पत्नी अरूंधतीने एकदा विचारले, हे चित्र बघूनही किती जणांच्या मनात आळस राहतो. तेव्हा अनसूयामाता सांगते, हे चित्र कागदावर बघावे पण डोळे बंद करून मनाच्या पटलावर बघावे तेव्हा आपल्या शरीरातला आळस आपोआप नाहीसा होत जातो.
॥हरि ॐ॥