॥हरि ॐ॥
आपण महासरस्वती व सरस्वतीचा algorithm बघितला. त्याचे उपयोग, महती पाहिली. किती जणांनी घरी जाऊन काढून बघितले? आईला आई म्हणण्यासाठी मुहूर्त लागतो का?
आज आपल्याला असाच एक हजारो वर्षापासून चालत आलेला algorithm बघायचा आहे.
What is pascal triangle? ह्यात विशिष्ट प्रकारे आकड्यांची रचना एका त्रिकोणात केली जाते. असाच एक त्रिकोण वैदिक संस्कृतीत आहे. ह्याला ’श्री गंगा त्रिवेणी’ म्हणतात. ह्याची रचना खूप सुंदर आहे.
"श्री गंगा त्रिवेणी"
१
१ ३ २
२ ४ ३
३ ५ ४
४ ६ ५
५ ७ ६
६ ८ ७
७ ९ ८
८ ० ९
आवडत्या देवाचे नाव
ह्या त्रिकोणात प्रत्येक relation maintained आहे. गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचा जेथे संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. सरस्वती गुप्त आहे. ही गंगा त्रिवेणी इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांच्या रूपात आपल्या देहामध्ये असतात.
इडा नाडी - ऊष्ण - सूर्य,
पिंगला नाडी - शीत - चंद्र
मनुष्याच्या कपाळावर भ्रूमध्य ठिकाणी हा त्रिवेणी संगम होतो. सुषुम्ना (गुप्त सरस्वती) मध्ये हनुमंताचा संचार असतो, तिच्यात महाप्राणाचे साम्राज्य असते.
आपल्या तिनही देहांवर (स्थूल देह + प्राणमय देह + मनोमय देह) राज्य चालतं ते या नाड्यांचं. ह्या नाड्यांचे हे सूत्र आपल्या शरीरातले आहे.
जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी
जे ब्रह्मांडात आहे ते देहात असतंच. ते आपण मिळवायचं कसं?
सृष्टीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. प्रत्येक स्थूल, सूक्ष्म पदार्थाला एक मन असते. उदाहरण घ्यायचं झालं तर पेनालाही मन असतंच. computer मध्ये एक solitare नावाचा पत्त्याचा game असतो. ह्या खेळात सुरुवातीला सोपे games येतात. मग कठीण येतात. म्हणजेच मशिनला कळते कोण खेळते आहे. ह्यालाच artificial intelligence म्हणतात. आपण पिक्चरमध्ये robot बघतो. हे मनाचे खेळ नाहीत. आज प्रत्यक्षरूपात हे robotics मोठमोठ्या कारखान्यात काम करत आहेत. हा artificial intelligence कसा बनतो? आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना ह्याची जाणीव होती. खर्याखुर्या शास्त्रज्ञांनी हे जे काही science आहे ते algorithm च्या स्वरूपात आणले.
पुढच्या काळात असणारा अतिशय परवलीचा शब्द म्हणजे nano technology.
आपल्या भारतीयांचा problem म्हणजे प्रचंड आळस. आपल्याला वाटते अभ्यास फक्त शाळा- कॉलेज पुरताच असतो, ज्ञानार्जनासाठी अभ्यास नाही. आपल्याला atom - सूक्ष्म हे माहीत आहे. carbon particle हे विश्वातील अत्यंत महत्वाचे आहे. सर्व प्रकारचं अन्न carbon पासून बनवलं जातं. मूळ मूलद्रव्य जरी carbon असले तरी ह्यापासूनच कोळसा आणि हिरा बनतो, दोघांच्या nano chemistry मध्ये प्रचंड फरक आहे. ह्या carbon च्या सूक्ष्म पातळीवरचे गुणधर्म अगदी वेगळे आहेत.
मग ह्या शास्त्रज्ञांना carbon च्या Atom पासून C60 हा carbon molecule सापडला. (म्हणजे एका मोठ्या Dome सारखी) रचना ज्याला fullerene म्हणतात.

ह्या आधुनिक Science मुळे लक्षात आले की, पदार्थ जेव्हा सूक्ष्म होत जातो तेव्हा त्याचे गुणधर्म पूर्णपणे बदलत जातात. ह्यातुन nano technology चा अभ्यास सुरू झाला. ह्यातून त्यांनी एक पिशवी बनवली 1cm x 1cm या आकाराची जिच्यात १५० किलोची भाजी सहज मावू शकते.
समजा आपल्या मुलाला दमा झाला तर ICU मध्ये admit करून O2 द्यावा लागतो. आता nano technology द्वारे दिले असता O2 पुरवण्याचे काम respirocytes करतात. असेच robotic surgery आपण ऎकले असेल. आता nano surgeons केले आहेत जे RBC पेक्षाही छोटे आहेत. हे रक्तपेशींमध्ये, brain मध्ये सोडून आवश्यक ते surgery चे काम रिमोटच्या सहाय्याने करतात.
हे नवीन बदल आपल्याला स्वीकारता आले पाहिजे. जर हे आम्ही स्वीकारले नाही तर १५ वर्षानंतर आम्ही गावठी मनुष्य म्हटले जाऊ.
मी सांगलीला गेलो होतो. तेव्हा परत येताना विटा नावाच्या गावी एक म्हातारी स्त्री एका हाताने सारवत होती तर दुसर्या हाताने मोबाईलवरुन बोलत होती, मला बरे वाटले.
ऋषींनी सूक्ष्माचे महत्त्व जाणले. स्थूल शास्त्र शाश्वत नाही. क्षणभंगूर! Quantum Theory हेच सांगतं. आपलं शरीर दर सेकंदाच्या १०० व्या भागामध्ये पूर्णत: बदलत जाते. म्हणजेच आपले शरीर प्रत्येक क्षणी बदलत आहे हे ब्रह्म सत्य आहे.
सामान्य मनुष्य हा बौध्दिक स्त्रोत कसा समजणार ह्यासाठी ऋषींनी नाना प्रयोग करून, तपश्चर्या करून हे algorithm निर्माण केले.
आपण तीर्थ देतो, पूजेनंतर हे तीर्थ म्हणजे अभिषेक जेव्हा पाण्याचे स्फटिक विशिष्ट मंत्राद्वारे म्हणून घेतले जातात. त्यानुसार ते बदलतात. ज्या भावाने तीर्थ बनवले जाते. त्यानुसार त्या स्फटिकांचे गुणधर्म बनतात. ज्या भावाने आपण ते तीर्थ ग्रहण करू त्या प्रमाणात स्फटिकांमधली ऊर्जा आपल्यावर काम करते.
गुरुक्षेत्रम्मध्ये शनिवारी कैवल्ययाग व सोमवारी रुद्र असते. नुसते ऎकले तरी ते किती सुंदर वाटते. जेव्हा तुळस (विष्णूस) किंवा बेल (शिवलिंगास) अर्पण करून अभिषेक करतो तेव्हा त्या बेलाचे-तुळशीचे गुणधर्मही nano particles त्यात येतात. आम्ही पाणी पित नाही तर अतिशय पवित्र गोष्ट ग्रहण करतो. एक थेंबसुद्धा पुरेसा आहे.
आम्ही रोजसुध्दा घरी देवास अभिषेक करू शकतो गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणून. अनेक algorithms पैकी एक algorithm "श्री गंगा त्रिवेणी"
गंगा त्रिवेणी म्हणजे तीन नाड्यांचा प्रवास आहे. ह्या तीन नाड्या वरच्या १ मध्ये एकरूप होतात. आपल्या आज्ञा चक्राचा स्वामी हनुमंत त्याच्या चरणाशी देहातील इडा, पिंगला, सुषुम्ना एकरुप होतात. हनुमंत हा कुंडलिनीचा अंजनामातेचा पुत्र आहे. हा जन्मत:च सूर्याला गिळायला निघाला. त्यालाच हठयोग म्हणतात. ह - सूर्य, ठ - चंद्र (balance - समतोल). ही कुंडलिनी साडेतीन वेटोळे घालून निद्रावस्थेत असते म्हणजेच सुप्तावस्थेत असते. म्हणजेच ती कार्यशील नाही कारण ते आपल्याला झेपणारे नाही.
सामान्य आई नुसती घरात नसली की मुलं धिंगाणा घालतात पण ती घरात असली आणि झोपलेली जरी असली तरी तिचा मुलांवर धाक असतो. मग ह्या देहातील ह्या कुंडलिनीचा धाक असणारच.
आपण मागे circle of willis बघितले. आज्ञाचक्राचे ठिकाणी आपण नाम काढतो. हा त्रिवेणीसंगम पण आज्ञाचक्रामध्येच आहे.
आमच्या मनातील गंगा, यमुना सरस्वतीचा संगम आम्हांला माहिती असणे आवश्यक आहे. त्रिवेणी संगमात आंघोळ केली की सगळ्या पापांचं क्षालन होतं. मनातल्या गंगा, यमुना सरस्वतीच्या संगमात स्नान करण्याची संधी प्रत्येकाला शक्य आहे.
"श्री गंगा त्रिवेणी"
१
१ ३ २
२ ४ ३
गंगा ३ ५ ४ यमुना
( इडा) ४ ६ ५ (पिंगला)
५ ७ ६
६ ८ ७
७ ९ ८
८ ० ९
सरस्वती (सुषुम्ना)
आवडत्या देवाचे नाव
ह्या रेषेवरील संख्या exactly इडा, पिंगलाचे कार्य दाखवतात.
आपण रेडिओ लावला की तो वेगवेगळ्या frequency वर लागतो. त्याचप्रमाणे ह्या दोन नाड्यांची (गंगा यमुना) frequency वेगवेगळी असते. आपल्याला AC ( Alternate Current) / DC ( Direct Current) माहीत आहेत. लहरी असतात. प्रत्येक प्रकारच्या लहरी पाठवण्यासाठी frequency लागते.
फक्त सुषुम्ना नाडीवर आपल्याला शून्य दिसते. ही शून्यावस्था म्हणजेच शांत तृप्त अवस्था. प्रेमाने अन्न खाऊन जी तृप्ती होते. पोट भरलं, मजा आली ही शून्यावस्था. जेव्हा बर्याच वर्षांनी आवडीची व्यक्ती दिसते, ती शून्यावस्था. लग्न झालेली लेक जेव्हा पहिल्यांदाच माहेरी येते तेव्हा आई बाबांना, घरच्या मंडळींना भेटताना जे वाटतं ते शून्यावस्था, ही पूर्णावस्था. फक्त प्रेम, निखळ प्रेम. हनुमंत हा महाप्राण आहे. त्याला एकच राम ठाऊक. हनुमंत हा पूर्ण आहे. त्याच्या कसल्याच demands नाहीत, commands नाहीत.
हा गंगा-त्रिवेणीचा त्रिकोण, यात स्नान कसं करायचं? आमच्या घरात देवघर असते. कोण म्हणते, कांदा कापलेल्या सुरीने फळ कापून देवासमोर ठेवले तर देव कोपेल. हे असं केलं तर देवाचा कोप होतो. कायम लक्षात ठेवा बाळांनो, देव कधीच कोपत नाही. रागावेल, ठोकेल, सणसणीत लाथ घालील पण कधीच कोपणार नाही.
जर ही गंगा-त्रिवेणीचे चिन्ह जिथे आपण ज्या वस्त्रावर देव ठेवतो, त्या वस्त्राखाली ठेवले तर देवपूजेच्या वेळी आपल्या हातून काहीही चुका झाल्या तरी काहीही त्रास / परिणाम नाही.
अभिषेक करताना पण ताम्हणाखाली हा कागद ठेवला तर गंगा-त्रिवेणी संगमाचे पावित्र्य त्या तीर्थात अवतरतं. फळ superb असते. अभिषेक केल्यावर हे तीर्थ घेताना एक अट वसिष्ठ-अरुंधतीने घातली आहे. तीर्थ ३ वेळा आपण ग्रहण करावं गंगा, यमुना, सरस्वतीचे स्मरण करून.
हे गंगा, यमुना, सरस्वतीचे जल आहे. हा भाव ठेवून माझ्यावर जे कोणी खरेखुरे प्रेम करतं त्या प्रत्येकासाठी हे तीर्थ मी प्राशन करत आहे हा भाव ठेवायचा.
देवाच्या प्रतिमेला अत्यंत प्रेमाने पुसावे. तीर्थ घेतल्यावर तो ओला हात दोन्ही डोळे, आज्ञाचक्र व मागे circle of wilis ला लावायचा. हे जर रोज केले तर रोज आपल्याला ह्या त्रिवेणी संगमाचे स्नान घडते. ह्या तीन नाड्या ज्या frequency त काम करतात ती संख्या केवळ संख्या नसून त्यामागे अर्थ असतो. शब्द अर्थ तोच असला तरी भावानुसार ते बदलतात.
ह्या ज्या तीन नाड्या इडा, पिंगला, सुषुम्ना नाकापासून ज्याप्रकारे वाहतात, ह्या बंद कधीच नसतात, ह्यातील एक उष्ण व शीत आहे (इडा, पिंगला) ह्यांचे सतत कार्य चालू असते. ह्या प्रत्येकीची काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
गंगेचा १ आकडा यमुनेच्या २ आकड्याशी जोडलाय तर सरस्वतीच्या ३ आकड्याशी जोडलाय. सुषुम्ना नाडी ही ज्योतिषमती म्हणजेच पुढचं बघु शकणारी नाडी आहे.
"श्री गंगा त्रिवेणी"
१
१ ३ २
२ ४ ३
३ ५ ४
४ ६ ५
५ ७ ६
६ ८ ७
७ ९ ८
८ ० ९
आवडत्या देवाचे नाव
हे चिन्ह काढताना वरती श्री गंगा त्रिवेणी लिहून मध्ये चिन्ह काढून शेवटी आवडत्या देवाचे नाव लिहा. कागदावर, कपड्यावर लिहून देव्हार्याच्या खाली ठेवा.
मी कुठलीही गोष्ट तुम्हाला देतो तेव्हा त्याची जबाबदारी माझी असते. हळद-कुंकू नाही लावले तरी चालेल. गाडीतही ठेवले तरी चालेल. सूर्यकिरणांचा अभिषेक हा अतिशय पवित्र मानला जातो. कारण सूर्यकिरण ही जगाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. सूर्य आपल्या सातही अश्वासह म्हणजेच आपल्या ७ प्रकारच्या औषधी किरणांसह ह्या त्रिवेणी संगमावर स्नानास येतो त्यामुळे त्याच्या किरणांचे तेजही आपल्यापर्यंत पोहोचते.
हा Algorithm आपण definitely रांगोळीमध्ये काढू शकतो. ह्यात कुठलाही रंग वापरा. वरती श्री गंगा-त्रिवेणी लिहून खाली आवडीच्या देवाचे नाव लिहा.
आपल्याकडे अनेकजणांमध्ये Vitamin D चे प्रमाण अतिशय कमी आहे. हे Vitamin D शरीरातील ३०० पेक्षा जास्त reactions मध्ये अत्यंत आवश्यक आहे, Brain पासून Liver पर्यंत.
ज्यांना जमेल त्यांनी Vitamin D ची Blood Test करून घ्या. जर कमी level असेल. जवळच्या डॉक्टरकडे जाऊन treatment घ्या. रोज थोडे ऊन घ्यायला शिका.
Foreign ला दर शनिवार-रविवार sunbath घेतात. आमच्याकडे देवाने फुकट Vitamin D दिलेले आहे, ते आम्ही घेत नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्याने Vitamin D Test सर्व पुरुषांनी व स्त्रियांनी करून घ्या. खरी treatment सकाळी ऊन खाणे.
प्रकाशाच्या अभिषेकाची आवश्यकता देवालासुद्धा आहे मग आम्हाला का नाही?
॥हरि ॐ॥