॥ हरि ॐ ॥
॥ ॐ मंत्राय नम:॥ विष्णूसहस्त्रनामातील एक नाम. श्री गुरुक्षेत्रम् मंत्राचा विचार करत आपण चाललो आहोत. मंत्र म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? उपयोग, मंत्राचा विनियोग कसा करायचा, बीजमंत्र म्हणजे काय? ते आपण बघितले. गैरसमज दूर केले. आता आदिमातेची algorithms समीकरणे आपण बघत चाललो आहोत. ही समिकरणे मोठी आई आपल्यासाठी कशी वापरते ते आपण पाहतोय. ह्या गोष्टी तुमच्या उपयोगात आल्या पाहिजेत. जी भाषा तुम्हाला येत नाही, त्यातला उत्कृष्ट चित्रपट जरी तुम्हाला दाखवला तरी तुम्हाला कळणार का?
प्रत्येक गोष्टीसाठी एक method लागते. बरोबर? गणित सोडविण्याची सोपी पध्दत म्हणजे algorithm. आज आपल्याला अतिशय साधी, सोपी गोष्ट बघायची आहे. आम्ही ती सहजतेने करतो. कुठली अशी गोष्ट? नमस्कार.
नमस्कार म्हणजे नक्की काय? हा एक algorithm आहे. ह्यात महत्वाची गोष्ट, दोन हातांची बोटे एकमेकांना जोडून आपण नमस्कार करायचा असतो. बोटं पसरवून नमस्कार करत नाहीत.
आम्ही नमस्कार करतो म्हणजे काय? नमस्कार आम्ही प्रत्येकाला करतो. पण सगळ्यांच्या आधी ती. त्यामुळे पहिला नमस्कार तिलाच असला पाहिजे. प्रसन्नोत्सवामध्ये तीन मूर्ती होत्या,
महिषासुरमर्दिनी
महासरस्वती महालक्ष्मी महाकाली
१० हात १८ हात ८ हात
१० + ८ = १८
ही महिषासुरमर्दिनी १८ हातांची आहे.
महाकाली ही दैवी तमोगुणाची आहे.
दैवी तमोगुण व दैवी रजोगुण ह्यांचे नियंत्रण महाकाली करते.
महासरस्वती - दैवी सत्त्व व दैवी तमोगुणाचे नियंत्रण करते.
महालक्ष्मी - दैवी सत्त्व व दैवी रजोगुणाचे नियंत्रण करते.
जी मूळ महिषासुरमर्दिनी आहे तिची तिन्ही गुणांवर सत्ता समानपणे आहे.
दैवी सत्त्व, रज व तम गुण म्हणजे काय?
ह्या विश्वाच्या नियंत्रणासाठी जिथे विकास आवश्यक आहे, तिथे विकास पुरविणारा गुणधर्म म्हणजे दैवी सत्त्व गुण. तर नवनिर्मितीची गरज आहे तेथे नवनिर्मिती पुरवणारा गुणधर्म म्हणजे दैवी रजोगुण. विकासाच्या कार्यात नवनिर्मिती करताना अनावश्यक / चुकीच्या गोष्टी काढून टाकणं, त्यागणं, म्हणजेच अनुचित ते दूर करणारा व prevent करणारा तो दैवी तमोगुण.
सत्त्वगुण - विकास गुण
रजोगुण - नवनिर्मिती गुण
तमोगुण - पुनर्रचना किंवा पुनर्घटन (transformation) लय नाही, नाहीसं नाही तर रूपांतरीत करते
ह्या विश्वाचा मूळ गुण matter व energy आधीच्या रचनेमधून पुनर्रचना होत असते.
Transformation म्हणजे एका स्थितीतून ते पूर्णपणे नाहिसे करून तशीच्या तशी पुन्हा रचना करणे, नविन रचना तयार करणे.
आपण घटना शब्द नेहमी वापरतो. घटना म्हणजे एखादा प्रसंग, क्रिया, Event. घडतं ती घटना. जसं असलं पाहीजे / जसं घडलं पाहीजे ती घटना
देशाचीसुद्धा एक घटना असते.
१) घटना
२) विघटन
३) पुनर्घटन
४) संघटन
५) घट
किती जणांनी Vitamin D ची Test केली. minimum level 30 पाहिजे. सगळ्यांचे कमी Vitamin D आले. म्हणजे फुकट सूर्यप्रकाश मिळतो तो पण आम्हाला घ्यायचा नसतो. कितीजणांनी Vitamin D चे महत्त्व वाचले.
आपण आज महाकालीच्या under काय येते, ते बघतोय. तिचे प्रभाव कुठल्या गुणांवर पुनर्रचना, पुनर्घटनांवर महासरस्वतीच्या प्रभाव सत्त्व गुणांसोबत पुनर्रचना, पुनर्घटन आहेच.
विश्वात जे काही transformation घडते, त्या मागे महाकाली असते. प्रत्येक विकासाच्या मागे महासरस्वती असते तर प्रत्येक नवनिर्मितीच्या मागे महालक्ष्मी असते.
अनसूया कशी आहे? तर ही तिन्ही गुणांचे कार्य एकाच वेळी घडवून आणते. अशी कुठली गोष्ट आहे, ज्यात एकाच गोष्टीमध्ये ह्या तीन्ही गोष्टी आहेत. (विकास, नवनिर्मिती व पुनर्रचना)
आपण रोज सूर्याचा प्रवास बघतो. सूर्योदयाच्या घटनेमध्ये काय आहे? ह्यात नवनिर्मिती आहे, काळोख दूर करतो. प्रत्येक क्षणाला तो विकास करतो. प्रत्येक क्षणाला त्याच्या गुणांची तीव्रता वाढत जाते. म्हणजे गुणात्मक विकासही आहे.
वनस्पती प्रकाशापासून अन्न बनवतात. CO2 व H2O च्या सहाय्याने वनस्पती अन्न बनवतात. इथे नवनिर्मिती आहे. त्याचवेळेस CO2घेऊन O2 बाहेर टाकतात. ह्यातच त्यांचा विकास व जगाचा विकासदेखील आहे. पाने म्हणाजे इथे पुर्नघटन पण आहे. एकाच वेळेस तिन्ही प्रक्रिया चालूच आहेत, म्हणून आपण अन्नाला पूर्णब्रह्म म्हणतो.
हे कार्य त्या महिषासुरमर्दिनीचे कार्य आहे. आधी अन्न तयार होते मग त्या अन्नावर जगणारा प्राणी (अन्नदा) हि रचना म्हणजे त्या आदिमातेचे अकारण कारुण्य.
ह्या घटनेमधला ’घट’ म्हणजे नक्की काय? ते आज बघायचे आहे? घट म्हणजे कुंभ, मातीचा घडा. एक पात्र. घटाचा एक shape आहे त्याला एक neck आहे, त्याला गोलाकार आकार आहे. त्यामध्ये हवा भरलेली आहे. ह्या घटातील हवा बाहेरच्या हवेशी connected आहे.
त्याचप्रमाणे तुमच्यातला परमात्माच्या अंश विश्वातल्या परमात्म्याशी connected असतो. जोपर्यंत आम्ही त्या घटावर अभक्तीचे झाकण ठेवत नाही तोपर्यंत.
घट म्हणजे तुमचा भौतिक देह. घटातील हवा म्हणजे आपल्या देहातला महाप्राण.
करवलीकडे करा असतो. त्या घटात जेव्हा आपण पाणी भरतो तेव्हा ते नारळाचा स्पर्श होईपर्यंत, त्या level पर्यंत भरावे.
घटात ७०% पाणी असते. आपल्या देहात पण ७०% पाणी आहे. जेव्हा घटावर श्रीफळ ठेवतो. तेव्हा कलश म्हणतो. मंगल कलश.
घट / करा : देह, शरीर : भौतिक
हवा : पंचप्राण, महाप्राणाचं अस्तित्त्व, हनुमंताचा संचार
पाणी भरलं : प्राणमय देह ( हवा , पाणी : जीवन )
श्रीफळ : मनोमय देह
कलश हा त्रिविध देहाचं, भौतिक, प्राणमय व मनोमय देहाचे प्रतीक आहे.
म्हणून आपण प्रत्येक जण हा परमात्म्याच्या प्रतिमेतूनच तयार झालेलो आहोत. ज्याक्षणी ह्या घटाला आपण पूजा करून देवाचे मंगल प्रतीक मानतो. तेव्हा ते त्याप्रमाणे झालेले असते.
इथे पाणीच आहे कारण पाणी हे जीवन आहे. तर वायू हा जीवनासाठी आवश्यक आहे. घटाचा हा कुंभाचा shape म्हणजेच आमचा मानेपासून कमरेपर्यंतचा भाग. घटावरील आंब्याची पाने ठेवतो ते म्हणजे दोन हात दोन पाय व एक शेपूट (माकडहाड) ह्या माकडहाडापासूनच आपल्या सर्व चक्राचा प्रवास सुरू होतो. ह्यातील श्रीफळ म्हणजे डोक्याचा मागचा भाग.
प्रत्येक मनुष्य जन्माला येतो म्हणजे त्या आदिमातेचा त्या बाळाच्या आई वडिलांना मिळालेला महाप्रसाद असतो. त्या प्रसादाचे आपण स्वागत करायचे असते. प्रत्येक मनुष्याचा जन्म म्हणजे त्याला नवनिर्मिती करण्याची, विकास करण्याची संधी आहे. तुम्ही अधिक सशक्त व्हावेत म्हणून तुम्हाला ह्या शाळेत पाठवले जाते.
देवीच्या पूजनात घट बसतात म्हणजे काय? जिथे वासरू आहे तिथे गाय आहेच. आईच्यासमोर आम्ही जसे आहोत तसे मांडतो. त्या घटाबरोबर आई आहेच.
सकाळी उठताना हाताकडे बघून मंत्र म्हणायला सांगितले आहे.
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
करमूले तू गोविन्दं प्रभाते करदर्शनम्
आपल्या पाचही बोटांची टोके ह्यात रजोगुणांची केंद्रे आहेत. हाताचा तळवा दैवी तमोगुणाचे केंद्रे आहेत. करमूले इथे ३ केंद्रे आहेत.
५+५=१० + २ + ३+३
दोन्ही हाताची बोटे palm (दोन्ही हाताची करमूले) सत्त्वगुण
(नवनिर्मिती) (पुनर्रचना) विकास
ही केंद्रे एकत्र हातामध्ये आहेत. ही सर्व केंद्र एकत्र आणून जेव्हा मन:पूर्वक नमस्कार करतो, देवाचे नाव घेतो तेव्हा आपले दोन्ही मेंदूवरील महत्वाच्या अठरा केंद्रांवर आदिमाता कार्य करते. ह्या १८ केंद्रांच्या माध्यमातून direct आदिमातेशी contact होतो. ही मेंदूतील १८ महत्त्वाची केंद्रे balance करण्याचे कार्य ह्या नमस्काराच्या कृतीतून होते. सगळ्यात महत्त्वाचे साधन नमस्कार मानले जाते.
प्रत्येक धर्मात दोन्ही हात जुळवून त्याच्याकडे बघायची action आहेच.
नमस्कार करताना तिचे direct connection या १८ केंद्रांद्वारे घडते. नमस्कार करताना दोन्ही हात व बोटे पूर्णपणे जुळवून करणे आवश्यक आहे. हात हृदयाशी धरावा.
नमस्कार हा किती महत्त्वाचा algorithm आहे हे आज बघितले. जिथे नमस्कार करायचा नसेल तिथे पुढची बोटे मिळवायची नाहीत. म्हणजे तो नमस्कार ठरत नाही. जेव्हा तुम्ही वाईटाला नमस्कार करता तेव्हा तुमची ही केंद्रे शक्तिहीन होतात. कुणाचे प्रेत जाते तेव्हा आम्ही नमस्कार करतो. का? तर तू देवाकडे जातोस, तेव्हा देवाला माझा नमस्कार सांग.
आधी मुलं प्रार्थना करायची...
"शुभं करोती कल्याणं....."
हा अतिशय सुंदर मंत्र आहे. ह्या एका मंत्रात तीन उपनिषदे आहेत.
आईने मारले तरी मुलाला आईच हवी असते. तसा भाव आपला सद्गुरुकडे आदिमातेकडे असायला हवा.
करवलीचा मंगल कलश आपण का करतो. मंगल कलश म्हणजे तुमच्यातल्या शुभाची आकृती. पती-पत्नीकडून जे जे काही शुभ आहे, त्याचं आदान प्रदान केलं जातं. ही त्यामागे कल्पना असते. आई आणि बालक हे नाते सांभाळण्यासाठी आपण नवरात्रीत घट बसवतो.
मला बरं वाटते five star hotel मध्येसुद्धा "अन्नग्रहण समये' म्हणताना तुम्ही हात जोडून प्रेमाने म्हणता.
Accupressure मध्ये सुद्धा ही १८ केंद्रे तुमच्या मेंदूतला disturbed balance, normal ला आणून ठेवु शक्तात. एक प्रेमाने केलेला नमस्कार सगळे बदल घडवून आणू शकतो.
॥ हरि ॐ ॥