॥ हरि ॐ ॥
सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा. ‘ॐ मंत्राय नम: ।’ गुरुक्षेत्रम्मंत्र अभ्यासताना आपण आता अंकुर मंत्रातलं चौथं पद बघतोय. ‘तो’ एकच आहे - एक त्रिविक्रम तो एकच फक्त एकच आहे. ह्या त्रिविक्रमाचे तीन विक्रम काय आहेत हे आपल्याला भरपूर बघायचेत.
प्रत्येकवेळी असं करत ९ व्या आकड्यांपर्यंत येतो. हा एकच आकडा गुणाकार पद्धतीने ही एकच........................हा जो त्रिविक्रम काम कसा करतो. त्याची काम करण्याची पद्धत म्हणजे गुणाकार. तो वजाबाकी करत नाही. त्याच्याकडे वजाबाकी नाही हे कळतं पण पटत नाही. हा वजाबाकी, बेरजा करत बसत नाही. एक पाप, एक पाप असं तो मोजत नाही. आम्हाला पुण्याची बेरीज हवी असते, आणि पापाची वजाबाकी हवी असते. बेरीज हवी असेल तर आम्हाला वजाबाकी स्वीकारायला हवी. दिवस हवा असेल तर रात्र स्वीकारायला हवी. नॉर्थ पोल हवा असेल तर साऊथ पोल स्वीकारायला हवा. जिथे त्रासाची गोष्ट असते तिथे आम्हाला वजाबाकी हवी असते. फायद्याच्या गोष्टीमध्ये बेरीज हवी असते. गुणाकाराबरोबर भागाकार येतोच. हा भागाकार करतो का? जर वजाबाकी बरोबर बेरीज आहे. तर गुणाकाराबरोबर भागाकार असणारच. पण ह्याच्या गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये साम्य आहे. १०/५ = १०X१/५ हे बेसिक कॉन्सेप्ट कळण्यासाठी आहे. १० ला एक पंचमांशने गुणलं असं आपण इथे म्हणणार. ह्याची बेरीज हीच वजाबाकी आहे आणि वजाबाकी हीच बेरीज आहे. १+१=२ आणि १+१=१, १+ दीडशे लाख = एकशे पन्नास लाख एक आणि एक + दीडशे लाख = एक - एक बाळ. स्त्रीच्या गर्भाशयात गर्भबीज एकच असतं आणि स्पर्म्स दीडशे लाख असतात. तर बाळ किती एकच हे त्या त्रिविक्रमाचं गणित आहे.
आपण नाकातून आतमध्ये बेसिकली ऑक्सिजन घेतो. तो शरीरात वापरला गेला तर त्याची वजाबाकी व्हायला हवी. बाहेर O2 ऐवजी नुसता O(ओ) किंवा 0 (झिरो) पडायला पाहिजे. पण बाहेर पडताना कार्बन-डाय-ऑक्साईड बाहेर पडतो. ही बेरीज पण आहे आणि ही वजाबाकी पण आहे. बेरीज आणि वजाबाकीवर हा त्रिविक्रम आहे.
आपण प्रत्येक जण जेवतो-खातो. जेवताना दाताने चावतो, जिभेने चव घेतो. जीभ सगळ्यात महत्त्वाचं काम करते. जीभ घास आत फिरवायचं काम करते. घास एक, दात किती ३२ आणि जीभ एक. भाताच्या घासात शंभर शीतं आहेत तर प्रत्येक दाताखाली तीन शीतं आली पाहिजेत. प्रत्येक दात तीन शीतं चावतो का? आठ चणे तोंडात टाकेल तर ८ X ४ = ३२. एक दात चार वेळा चावतो का? सगळे दात मिळून एकत्र काम करतात. जीभ घासाला ३२ वेळा चावते आणि ३२ दातांना साफही करते. जिभेचा एखादा शब्द चुकीचा उच्चारला तर वजाबाकी होते. इथे भागाकार करून चालेल का? होतोय का? होत नाही.
दोन हात आणि दोन पाय एकत्रच काम करतात. कोणाचे जास्त तर कोणाचे कमी करतात. एक हात एक आणि दुसरा हात दुसरं काम करत नाही. एक पाय एका दिशेला आणि दुसरा पाय दुसर्या दिशेला चालत नाही. एक कान एक आणि दुसरा कान दुसरं ऐकत नाही. एक डोळा एकीकडे आणि दुसरा डोळा दुसरीकडे बघत नाही. त्रिविक्रमाने मनुष्य निर्माण केला तो वजाबाकी, बेरीज, भागाकार पद्धतीने नाही तर गुणाकार पद्धतीने. प्रत्येकाच्या प्रत्येक घासाला चार चणे X ३२ असंच आहे.
एवढं सगळं झाल्यावर बापू आम्हाला भागाकार किंवा वजाबाकी दिसतात. लग्न झालेल्या नवर्याबद्दल दोघींना कळायला हवं की तो तिचा नवरा आहे आणि तोच तिचा मुलगा आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. इथे प्रेम भागलं गेलं. आमच्या प्रेमात भागीदार आहे.
एका आईला तीन मुलगे आहेत. आईचं प्रेम तिघांमध्ये डिव्हाईड होतं का? नाही होत. जर आईचं प्रेम तिघांमध्ये डिव्हाईड होत असेल, मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करत असेल तर ती आई नाही. म्हणजे तीचं प्रेम इथे मल्टिपल झालं. तिची वेळही तशीच मल्टिपल होते. ती एकाच वेळी एकाला मांडीवर घेऊन बसते. त्याचवेळी दुसर्याचा कान पिळवटत असते, त्याच वेळी तिसर्यासाठी जेवणाला फोडणी देत असते. तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण मातृत्व एकच आहे.
हा नियम आहे प्रेमाबाबत. द्वेषाची बाजू आपण बघतो. द्वेषातही आपण मल्टिप्लिकेशन होताना बघतो. नवरा ऑफिसला निघालाय, ब्रेकफास्ट हवाय, पण बायको फोनवर तिच्या आईशी बोलतेय. तो तसाच ऑफिसला निघून जातो. मनात बोलत जातो - ‘म्हातारीचं तोंड बंद होईल तर बरं आहे.’ ऑफिसला जातो, काहीतरी विसरलं म्हणून बायकोला फोन करतो, फोन एन्गेज्ड येतो. थोड्यावेळाने फोन करतो, बायको सांगते आईशी बोलत होते. तो मनात म्हणतो, ‘म्हातारीचं तोंड कायमचं बंद झालं तर बरं होईल.’ इथे निगेटिव्ह गोष्टींमुळे राग मल्टिप्लाय झाला.
भांडण झालं असेल तरीही भांडण विसरता आलं पाहिजे. आपण देवाला विसरतो, पण माणसाने केलेली चूक विसरत नाही. त्या व्यक्तीने चांगलं काय केलं ही गोष्ट विसरतो आणि फक्त वाईट गोष्टच लक्षात ठेवतो. हा मार्ग त्रिविक्रमाचा नाहीए. तो चुकीच्या गोष्टींची बेरीज करत नाही. तो गुणाकार करतो. ह्याचा गुणाकार एकाचा आहे. ह्या एकमधून प्रत्येक आकडा बनतो. ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक ह्या एकातूनच बनते.
ह्या गुणाकारातूनच १,२,३........ आकडे वाढत जातात तसेच ते कमीही होत जातात १,२,३,४,५,६,७,८,९,८,७,६,५,४,३,२,१,लास्ट संख्या वाढत गेली आणि मग कमी झाली तरी मार्ग गुणाकाराचाच आहे.
आपण किती तास जगलोत ह्याचा विचार करा आणि आपण किती तास जगणार आहोत ह्याचा विचार करा. वृद्धापकाळातसुद्धा आयुष्याचा गुणाकार करता येतो. साठी नंतरचा वाढदिवस कोणालाही साजरा करायला आवडत नाही. ९९% लोकांच्या मनात भीती असते कारण मनात असतं, आता बेरीज नाही आता फक्त वजाबाकीच होणार.
वय जरी ६०, ८० वर्ष असलं तरी गणित गुणाकाराचंच आहे. कारण ह्या वयात अनुभव समृद्ध झालेला असतो. पहिला ११,............................असा वाढत वाढत जातो. तुमच्याकडे कितीही कमी वेळ असला तरी तुमचा अनुभव समृद्ध असतो. अचूक गोष्ट करण्यासाठी १३ वर्ष लागली असतील तर तिथे वयाच्या ७० व्या वर्षी १३ तास लागतील.
हा एकांक अल्गोरिदम आहे. अनुभवातून दिवसाचं काम एक सेकंदात करू शकता. प्रत्येक दिवसाबरोबर अनुभवसमृद्धी वाढते. वय वाढलं की गुणाकार अधिक समृद्ध होतो. अनुभव त्रिविक्रमाने वाढत्या वयानुसार तरुण वयात नव्हता इतका दिलेला आहे. हे सगळं समजणं आवश्यक आहे, त्यामुळे मृत्युची भीती वाटणार नाही.
हा त्रिविक्रमाचा नियम आहे, अल्गोरिदम आहे. मनुष्य प्रत्येक एका सेकंदात एकने अधिक मॅच्युअर्ड होत जातो आणि वर्षाबरोबर ३६५ पटीने मॅच्युअर्ड होतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची कपॅसिटी वाढत जाते त्यामुळे त्याच्याकडे वेळेची मर्यादा नसते.
मानवाचं वय X मानवाचा अनुभव ह्याने त्याची खरी कपॅसिटी वाढते. आम्ही स्वत:ला अनुभवसमृद्ध बनवलं पाहिजे. आम्ही नवीन जगाला सामोरं जातो का? आम्ही नवीन काही ऐकतो का? एवढ्या गोष्टी आजूबाजूला असतात, आम्ही नवीन काही शिकतो का? एन्जॉय करतो का? एन्जॉय तरी नवीन पद्धतीने करतो का?
दिवाळी आनंदाचा उत्सव आनंदाने साजरा करतो का? नवीन प्रकारे काय केलं? आम्ही त्याच-त्याच पद्धतीने तेच-तेच करत असतो. कपड्यातला बदल हा बाहेरचा आहे. माझ्यात काय नवीन बदल घडला? मी कुठल्या प्रकारे कोणाला आनंद दिला? कोणाचे दु:ख कमी केले? हे महत्वाचं आहे.
आमच्या जीवनात आम्ही जीवनाचा अर्थ जाणून घेतला नाही म्हणून आम्हाला आनंद करता येत नाही. हा एकच आहे आणि हा एकच गोष्ट कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे मांडतो. हा तोच तो एक आहे आणि पर्याय बघा किती आहेत. हे सगळं तो आमच्यासाठी करतोय. ह्या सगळ्या निरनिराळ्या गोष्टी आमच्यासाठी त्याने केल्यात. जगातल्या विविध गोष्टींमध्ये आम्हाला आनंद मिळावा म्हणून हा हे सगळं करतो.
त्या एकाचा जो विलास आहे, जे सौंदर्य आहे ते आम्ही अनुभवत नाही. आम्ही एक तरी गोष्ट नवीन करतो का? नाही. असं त्रिविक्रमाने केलं तर? त्याने नियम सेट केलेत आणि म्हणाला आता मी काही करणार नाही. त्या नियमानुसार तुम्ही पापं भोगा, मार खा असं चालेलं का?
तुमच्या शरीरामधल्या पेशी किती वेळा बदलतात? आपल्या स्टमकमध्ये आपल्या चुकीच्या पद्धतीने खाण्यामुळे जखमा होत असतात. ह्या स्टमकमधल्या लहेर तो बदलत असतो. हे तो आमच्यासाठी नवीन-नवीन करत राहतो म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो. आम्हाला एक तरी चांगली गोष्ट वर्षातून एकदा तरी करता आली पाहिजे. तर हा त्रिविक्रमाचा अल्गोरिदम आमच्या जीवनामध्ये काम करेल. त्रिविक्रम काम करतोच, पण आम्हाला हा अल्गोरिदम वापरता आला पाहिजे. नवीन प्रकारे आनंद करता आला पाहिजे. आनंद देता आला पाहिजे. कोणाला तरी आनंद देणं हे कोणाचं तरी दु:ख कमी करण्यासारखचं आहे. ह्या गेल्या वर्षात मी एका तरी व्यक्तीचं दु:ख कमी केलं का? त्याला निर्भेळ आनंद दिला का? तुमची मनापासून सहानभूती असली तरी खूप काम होतं पण ती तरी असते का?
आम्ही आमच्या आईच्या मांडीवर बसून तिच्या गाऊनबरोबर खेळत तिच्याशी कधी गप्पा मारल्यात का? आई ९० वर्षाची असेल सो व्हॉट !, आईला कधी प्रेमाने मिठी मारली का? बाबांना कधी प्रेमाने विचारलं का, बाबा तुमचे पाय चेपून देऊ का?, आपण कधी मुलांना सांगतो का, आज तू खूप अभ्यास केलास चल आपण सगळे मिळून फिरायला जाऊ कुठेतरी. नवरा बायकोला सांगतो का, आज आपण शांतपणे फक्त एकमेकांविषयी बोलायचं. पती-पत्नीच्या नात्याला इतकी वर्ष झालीत म्हणून त्याला सुगंध नाही का? एकमेकांच्या आयुष्यातला सुगंध मल्टीप्लाय व्हायला पाहिजे. आतापर्यंत गोळा केलेला आनंद एकमेकांच्या पदरात ओता. एकमेकांकडे नुसतं बघत बसा - तो एक क्षण महत्त्वाचा आहे. बहीण लग्न करून गेल्यावर आपण कितीवेळा चौकशी करतो तिची. भाऊ कर्तव्य म्हणून भाऊबीजेला येतो आणि बहीणसुद्धा कर्तव्य म्हणून बर्फीचा तुकडा आणते. मानपान येतात नात्यांमध्ये. एक क्षण सुद्ध प्रेमाने देत नाही.
दरवर्षी ३१ डिसेंबरला आढावा घ्या - ह्या वर्षी मी कितीवेळा आनंद दिला? किती जणांचं दु:ख कमी केलं? मी माझ्या मुलांचे किती लाड केलेत? मुलांनी चांगलं काय केलं हे आठवा. आम्हाला गुणाकार जमणार नाही, आम्ही त्रिविक्रम नाही, सामान्य आहोत. ३१ डिसेंबरला आठवा आयुष्यात काय चांगलं झालं ते मग हा अल्गोरिदम काम करेल.
समुद्र आहे, पाणी आहे, बाष्पीभवनाने पाणी वर जातं आणि तेच परत पृथ्वीवर येतं. पृथ्वीवरच्या पाण्याची quantity एकच आहे. तेच पाणी आहे जे पहिल्यांदा निर्माण झालं. आज जे पाणी मी पितोय ते किती जुनं आहे? ते पाणी करोडो वर्ष जुनं आहे. मी जे पाणी आज पितोय, तेच माझ्या पूर्वजांनींही प्यायलेलं आहे. ते पाणी जेव्हा बाष्प बनून वर जातं तेव्हा, त्रिविक्रमच सूर्याच्या रूपाने वर घेतो, शुद्ध करतो आणि परत देतो. पाण्याच्या quantity आणि quality मध्ये बदल झालेला नाही. हेच पाणी कितीवेळा मंत्रमय झालेल असेल, ह्याच पाण्याने कितीवेळा समुद्रात अर्घ्य दिलं गेलं असेल. ह्या पाण्याकडे पाणी म्हणून बघू नका. हे संपूर्ण जीवनाचा एकमेव साक्षीदार आहे. कारण जीवन आलं की पाणी येतंच. नवीन पाणी बनवण्याची कुठलीही सिस्टिम अजून आलेली नाही. माझ्याकडे आता जे पाणी आहे ते अब्जकोटी वर्षापूर्वीचं आहे. ह्या पाण्यात समुद्र आहे, गंगाजल आहे. ह्या त्रिविक्रमाचं मोठं साधन म्हणजे जल-आप-नार. मूळ पाण्याला काय नावं आहेत - जल, आप, पाणी, उदक, नीर, नार, वदि. पाणी constant आहे. ते तेच आहे जे दरवर्षी नवीन होत जात. ही नारायणी आहे. नारायणी नमोस्तुते ! शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते !
नारायणी म्हणजे जल - त्रिविक्रमाने त्या आदिमातेच्या चरणांवर केलेला अभिषेक आहे. उपनिषदामध्ये १८ केंद्रांमधलं जल मंदिर आठवत. भिंती, पायर्या जलाच्या आहेत. हे ते नार आहे. ती नारायणी आहे. पाणी पिताना तुम्ही ह्या पृथ्वीच्या प्रत्येक जलाशयाचं जल प्राशन करता. पाणी पिताना हे पाणी तीर्थ आहे म्हणून प्यायचं, हे जल तो जो वैश्वानर आहे त्याने उत्पन्न केलेलं आहे, हे एकमेव वैश्विक पालक ह्या भावाने प्यायचं. वैश्वानर म्हणजे जठराग्नी. जो देहाचा कारभार चालवतो तो. वैश्वानर शरीरातील जलात राहतो. त्रिविक्रमाचा एकमेव प्रतिनिधी म्हणजे आपण पितो ते पाणी. म्हणजे आमच्यातल्या परमात्म्याचा एजन्ट पाण्यातील अग्नी आहे. पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील जुनं पाणी निघून जातं आणि नवीन पाणी तिथे replace होतं. आमच्या जीवनातला प्राणाग्नी प्रज्वलित राहण्यासाठी आगीची नाही तर जलाची आवश्यकता आहे. अब्ज वर्षापूर्वीपासून पाणी तेच आहे. आम्ही पाणी पितो ते त्रिविक्रमाचं प्रतीक आहे. म्हणून त्याचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आचमन घेतो. तीन आचमनं मिळून एक आचमन होतं. असं आचमन प्रत्येक धर्मकार्यात तीन वेळ घ्यावं लागतं. पद्धत तीच आहे, नावंही तीच आहेत. आचमन ही आपल्या हिंदू, वैदिक, भारतीय संस्कृतीतील आदरणीय गोष्ट आहे. जे काम एक ग्लास पाण्याने होतं ते काम एका आचमनाने होतं. आचमनामुळे आपले मसल्स, सगळ्या नसा ओल्या होतात. पाणी कसं प्यायचं तर आपण जेवतो तसं एक-एक घोट घेत. पाणी एक-एक घास खातो तसं पाणी पिण्यामध्ये मोठी ताकद आहे. त्रिविक्रमाची स्पंदनं पिण्याच्या प्रत्येक पाण्यात असतात. मदिरेमध्ये पण पाणी असतं पण त्यात त्रिविक्रमाची स्पंदनं नसतात. पाणी पिण्याची क्रिया आचमनाप्रमाणे केली तर त्रिविक्रमाच्या अल्गोरिदमची व्हायब्रेशन मिळतात.
बापूंनी सांगितलं म्हणून आम्ही जेवायच्या आधी ‘अन्नग्रहणसमये..........’ म्हणतो. पण त्या श्लोकात दिलेलं आहे की प्रत्येक घास घेताना देवाचं नाव घ्या. प्रत्येक घासावेळी आम्हाला जमणार नाही. पण श्लोक म्हटल्यानंतर ‘राम’ म्हणून एक तरी घास खातो का आम्ही? नुसतं श्लोक म्हणण्याचं आम्ही कर्तव्य केलं म्हणजे काही सगळं होत नाही. फक्त कर्तव्यच जीवन आहे का? आम्ही कर्तव्यात चुकलो नाही म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. प्रेम पण असावं लागतं. तोंडात पहिला घास घेताना देवाचं नाव घ्या. दिवसभर पाणी प्या. त्रिविक्रम स्थूल पातळीवर पाण्याच्या रुपाने कार्य करतो. जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा सुद्धा भाव पाहिजे की - ‘हे तेच सनातन पाणी आहे.’ ‘ॐ ग्लौं अनिरुद्धाय नम:’ हे नाव घ्या ‘ॐ ग्लौं .........’ तुम्ही तुमच्या सद्गुरुचं नाव घ्या. त्या जलाच्या रूपात त्रिविक्रम तुमच्या पेशींवर कार्य करतो. इथेही काम गुणाकारानेचं होईल.
हा त्रिविक्रम आमच्या जीवनात क्रमबद्धतेने काम करत असतो. क्रमबद्धता चुकली की ट्युमर तयार होतो, वेगवेगळ्या बाधा तयार होतात.
पाणी पिताना ‘हे त्रिविक्रमाचं जल आहे’ ह्या भावनेने प्या. आंघोळ करताना, नाम घेताना ही जाणीव हवी. ही जाणीवच आमच्या शरीराला स्वच्छ, शुद्ध करते.
हा अल्गोरिदम मंत्र -जलाशी - जीवनाशी बांधलेला आहे. ज्यांना लिहिता येईल त्यांनी लिहून घ्या
ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्र्म् ।
ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥
हा मन्त्र म्हणजे त्रिविक्रमाचा अल्गोरिदम आहे. पाणी पिताना, घास घेताना, पाण्यात पोहताना, जीवनात ह्या मंत्राचा आपल्याला अभ्यास करत जायचं आहे. हा अल्गोरिदम आमच्या जीवनात आणला पाहिजे.
पुढच्या वेळेस येताना, एका बाटलीतून काचेच्या, पितळेच्या किंवा प्लास्टिकच्या ३० एम.एल. पाणी उदी घालून आणायचं. ३० एम.एल. पेक्षा जास्त पाणी आणू नका. हे जल ह्या मंत्राने अभिमंत्रित करायचं आहे. पुढच्या गुरुवारी महाशिवरात्री आहे, त्याच्या पुढच्या गुरुवारी पाणी आणायचं आहे. पाणी कोणीही कोणाकडून मागायचं नाही. प्रत्येकाने आपलं स्वत:चं आणायचं आहे.
॥ हरि ॐ ॥