॥ हरि ॐ ॥
चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीम् ॥
हे जातवेदा आमच्यासाठी आवाहन करून घेऊन ये. लोपामुद्रा जातवेदाला आवाहन करते. ‘जातवेदो’ हे नाव त्रिविक्रमाच आहे. ती आवाहन करते ‘हे जातवेदा, तू महालक्ष्मीला आणि लक्ष्मीला घेऊन ये.’ लोपामुद्रा जातवेदालाच का आवाहन करते, त्रिविक्रमालाच का आवाहन करते. तिने शिवाला, विष्णूला, किरातरुद्राला, शिवगंगागौरीला का आवाहन केल नाही. ह्यासाठी ‘जातवेदो’ चा अर्थ बघायला हवा. ‘जातवेदो’ चा सरळ अर्थ, जो वेदांना पहिल्यापासून समग्रपणे, पूरेपूर, सर्व स्तरावर, सर्व प्रकाराने जाणतो. त्याच्यापासून वेद उत्पन्न झाले आणि वेदांमुळे तो आला. चारही वेदांमध्ये ऋषींच प्रमुख ध्येय सामान्य मनुष्य आहे. मोठ-मोठ्या मोक्षाची त्यांनी गोष्ट कधीही वेदांनी केलेली नाही. वेदकर्ते ऋषी द्रष्टे ऋषी होते, त्यांनी सामान्य मनुष्याचा अभुदय कसा होईल हे बघितलं. अभुदय म्हणजे प्रापंचिक, शैक्षणिक, आर्थिक ते पारमार्थिक प्रत्येक प्रकारची प्रगती. हे महर्षी, ब्रह्मर्षी होते. तरीही त्यांचं ध्येय सामान्य मनुष्य होता. ऋषीनीं जे काही त्यांना दिसल, ब्रह्म पद प्राप्त झाल्यावर अखिल विश्वासाठी चिंतन करीत असताना गायत्रीमातेने त्यांना जे ज्ञान दिल. ते वापरण्याची क्षमता दिली. ज्ञान म्हणजे नुसते शब्द नव्हे. ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसच्या तसं जाणनं ते जसं आहे तसं परमेश्वराच्या इच्छेनुसार उपयोग करून घेण्याची क्षमता प्राप्त करून घेणं म्हणजे ज्ञान. नृत्याचे प्रकार तोंडपाठ असले तरी, ते करता येत नसतील तर काय उपयोग? ज्ञान म्हणजे, जो काही विषय आहे, परमेश्वरानं जे काही निर्माण केलयं कला, नदीच पाणी हे सगळ परमेश्वराने का निर्मिलं? कशासाठी निर्मिलं? जसं आहे त्यानुसार परमेश्वराने निर्मिलेलं आहे, हे जाणून घेऊन त्याचा उचित वापर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी कसा करता येईल, हे शिकणं म्हणजे ज्ञान. त्याचा उचित वापर मानवांसाठी कसा करायचा हे शिकणं, तस ते वापरण म्हणजे ज्ञान.
प्रत्येक देवाच्या प्रार्थनेला अर्थ असतो. प्रार्थना म्हणजे मनुष्याला आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते अधिक देणं. ऋचेतला प्रत्येक शब्द मानव कल्याणाच्या भावाने भरलेला आहे. त्यात अगस्त आणि लोपामुद्रा अग्रक्रमावर आहेत. एकदा लोपामुद्रा रस्त्याने चालली होती. तिथून मुंगळ्यांची रांग चालली होती. मध्यान्हीची वेळ होती. त्या उन्हातही ती मुंगळ्यांच निरिक्षण करत होती. उन्हात चालताना मुंगळ्यांच्या पायांना चटके लागतात की नाही हे ती शोधत होती. चटके बसत नसतील तर ते का बसत नाहीत. ह्याचा तिने अभ्यास केला. अभ्यास करता करता ती एवढी तल्लीन झाली की तिच्या पायालाही चटके बसायचे थांबलेत. लोपामुद्रा ब्रह्मवादिनी असूनही मुंगळ्यांचा अभ्याससुद्धा केला. मग आपण सामान्य मानवांनी शिकण्यासाठी कायम तयार असलं पाहिजे.
तो एकच असा आहे जो वेदांना जाणतो. ऋषींच्या चिंतनातून वेद प्रकटले. गायत्रीने शेकडो ऋषींच्या मनात ते ज्ञान प्रकट केलं. ऋषींनीं ते सर्व ज्ञान मानवांना वापरण्यासाठी दिल. ज्ञान हे तीन पातळीवर आवश्यक असते. बुद्धी - बुद्धीने ज्ञान जमा करतो. मन - ज्ञान झालं तरी ते पटलं पाहिजे, मनाला त्याची आवड लागण आवश्यक असतं. बापू सांगताहेत चालायच हे बुद्धीला पटतं पण मनाला ते पटत नाही. क्रिया - बुद्धीला, मनाला पटतं पण शरीराला श्रमाची सवय नसते. कधी मान दुखते, तर कधी हात दुखत असतो. ह्या तीनही पातळीवर ज्ञान एकाच वेळेस एकत्र करण्याच काम त्रिविक्रम करतो. तीनही गोष्टी एकाच पातळीवर एकाच वेळेस आणणारा त्रिविक्रम आहे. त्रिविक्रम गायत्रीमाते कडून ऋषींकडे वेद येत असताना त्यांच्या बुद्धीतली गोष्ट मनात परिवर्तीत करत होता आणि कृतीत उतरवत होता. ह्या तीनही गोष्टी तो एकाच वेळेस करतो. वेद असतानाच तो वेदांना जाणत होता. आदिमातेने हे वेद प्रथम त्रिविक्रमाकडे सोपवले. मग त्रिविक्रम एकाच वेळेस तीन पावल टाकतो.
लोपामुद्रा हे जाणते, ती ब्रह्मवादिनी आहे. ब्रह्मवादिनी म्हणजे जीने ब्रह्म म्हणजे काय हे अनुभवले आहे आणि त्यानुसार तिची क्रिया आहे. जिच्या आयुष्यात पवित्रता आहे. जी कधीही स्वप्नातसुद्धा असत्य बोलली नाही. जे स्वप्नातसुद्धा कन्ट्रोल ठेवतात तेच ब्रह्मर्षी व ब्रह्मवादिनी बनतात. अशा ब्रह्मवादिनी लोपामुद्राला माहित आहे की हे वेद त्रिविक्रमानेच दिलेले आहेत. त्याच्याकडे ही गोष्ट आली आणि त्याने त्याच्या अकारण कारुण्याने ऋषींना दिली. लोपामुद्रा ज्याने वेदांच ज्ञान ब्रह्मर्षींना ह्या तीनही पातळ्यांवर दिल अशा त्रिविक्रमाला आवाहन करते.
त्रिविक्रमाशिवाय जीवनामध्ये कुठलही सौंदर्य प्राप्त होऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट सुंदर, मधुर आणि अत्यंत उपयुक्त बनायची असेल तर त्यासाठी जीवनात त्रिविक्रम असण आवश्यक आहे. एखादे फूल खूप सुंदर आहे पण विषारी असेल तर उपयोगाचे आहे का? जीवनात माणूस कल्पनेच्या मागे लागतो. सगळं त्याला परफेक्ट लागतं. परफेक्शन ही गोष्ट फक्त कल्पनेतली आहे. फक्त त्रिविक्रम आणि त्याची आईच परफेक्ट आहेत. आपल्याला परफेक्शनकडे प्रवास करायचा आहे. परफेक्ट म्हणजे क्षितिज. क्षितिज दिसत पण हातात येत नाही. ते बर्याचदा दिसत म्हणून चालायच कसं ते कळत, दिशा कळते. परफेक्शन-परफेक्ट म्हणजे सर्व दृष्टीने अचूक; असं असूच शकत नाही. आम्हाला सगळ परफेक्ट हव असत. बरेचदा आम्ही इथेच मार खातो. अशी गोष्ट मिळू शकत नाही. सगळ्याच गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. आम्ही बोटीत बसलोत की बोट हलता कामा नये, बोट हलली तर आम्हाला लागता कामा नये, लाटा अजिबात नको. आम्हाला पाहिज्या त्या स्पीडने चालणारी बोट हवी. पाऊस फक्त रात्री अकरा ते सहा ह्या वेळेतच पडायला हवा. त्यानंतर दोन तासात सगळी जमीन कोरडी व्हायला हवी. परफेक्शन इज इम्पॉसिबल. हे लबाड बुद्धीवान लोकांनी सामान्य माणसांच्या न्यूनगंड देण्यासाठी केलेली कल्पना आहे. जो आदिमातेचा आहे तो आज आहे त्याच्यापेक्षा उद्या चांगला बनायला हवा, तो प्रत्येकजण प्रत्येक दिवशी अधिक प्रगत व्हायला पाहिजे अशा प्रकारे त्रिविक्रम प्रत्येकाच्या जीवनात मन-बुद्धी-प्राण म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि तरल देहात पाऊल टाकत असतो. म्हणून दररोज तो लक्ष्मीला आवाहन करत असतो. कारण सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मी आहे. लोपामुद्रा जाणते की ‘मी मानव आहे म्हणून माझ्याकडे प्रार्थना करण्याची कपॅसिटी आहे. ‘प्रार्थना’ म्हणजे अत्यंत मनाने, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने देवाला हाक मारणं. आपल्याला माहित पाहिजे की आपल्याकडे प्रार्थना करण्याची मोठी शक्ती आहे.
त्रिविक्रम आणि त्याची माता प्रत्येक लहान मुंगी पासून मानवापर्यंत प्रत्येकाचं ऐकत असतातच. त्यानंतर ते ऍक्शन पण घेतातच. ती ऍक्शन आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी पाईपलाईन लागते ते कनेक्शन आपल्याच उभ कराव लागत ते म्हणजे - विश्वास. आपला विश्वास ३०% असला तर तो ३०० पट देतो, ७०% असला तर ७०० पट, १००% असले सहस्त्र पट देतो. जी गोष्ट प्रार्थना करून आपण मागतो, ते अनुचित नसेल, अहित करणार नसेल तर ते प्रचंड वेगाने आपल्याकडे पाठवलेलं असत.
आम्हाला स्वत:च्या शब्दांमध्ये प्रार्थना करता आली पाहिजे, ते आईच्या कानांना गोड लागतं. प्रार्थना म्हणजे नुसतं मागणं नाही. आरतीच्या अल्गोरिदमच्या वेळी सांगितलं होतं की, पहिल्यांदा त्या देवतेवरचा विश्वास आहे. तो विश्वास पहिला उच्चारायचा मग मागणं मागायच ह्याला ‘स्तुती-प्रार्थना’ म्हणतात. आपण त्याच्या गुणाचं वर्णन करायचं असत; त्याच्या गुणांवर विश्वास व्यक्त करण्यासाठी आणि त्याची आपल्या मनाला जाणीव होण्यासाठी.
‘दुर्गे दुर्घट भारी। तुजवीण संसारी।’ - तुझ्याशिवाय प्रत्येक गोष्ट कठीण आणि दु:खदायक होते.
देव म्हणजे कम्पलेन्ट बॉक्स नाही. त्याच्यावर आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे.
‘अनाथनाथे अंबे’ - जो अनाथ आहे त्यांना सनाथ करणारी. एकदा मनुष्य श्रद्धावान झाला की तो अनाथ उरत नाही.
‘अंबे’ - ‘अंबा’ म्हणजे ‘माझी प्रिय आई’ हे तीनही शब्द एकत्र म्हणजे ‘अंबा’ लहानपणीची ‘माझी आई’ ही भावना इथे यायला पाहिजे. मी अनाथ नाही कारण तू माझी आई आहेस. ‘अंबे’ हे ‘अंबा’ शब्दाचं संबोधन म्हणजे हाक मारण्याचं रुप आहे.
‘करुणा विस्तारी’ - हे आदिमाते तुझी करुणा अपंरपार आहे मी तुझ्या पासून किती लांब आहे, माझ्यात क्षमता नसेल तरी तुझ्याकडे क्षमता आहे. तुझ्या करुणेचा विस्तार कर जिथे मी उभा आहे तिथपर्यंत.
आपण मागायलासुद्धा शिकलं पाहिजे. प्रार्थना करण्याची परमेश्वराने उपजतच दिलेली आहे आपल्याला. मानव जगात आल्यावर पहिली हाक आईलाच मारतो. पहिली प्रार्थना आईलाच करतो. पोट दुखलं तरी आईलाच हाक मारतो. बालकाची हाक आईला कळतेच. तिला कळतं की आता बाळाला भूक लागली आहे, आता त्याला झोप आली आहे, आता त्याच्या पोटात दुखतयं हे सामान्य आईला कळतं, कुत्रीला, गाईलाही कळत. तर जगदंबेला ह्या विश्वाच्या आईला का नाही कळणार तिच्या बालकाला काय हवयं ते!
एकदा कधी तरी शांतपणे बसा आणि आठवा लहानपणापासून आतापर्यंत देवाने काय-काय दिलयं. जे चूकीचं मागितलं तरी ते मिळालं नाही म्हणून बरं झाल. आमचं जीवन आई बघतच असते. आपण किती चांगले वागलो, किती खोटे वागलो, कामचुकारपणा, आळसपणा केला तरी तिने दिलं. ह्याचा अर्थ आई माझी प्रत्येक कृती बघतेच आहे. तिचा पुत्र मला सहाय्य करतोच आहे.
तिसरी गोष्ट दररोज रात्री दहा मिनिटं शांतपणे बसा. डोळे बंद करून शांती अनुभवायची. मनात विचार आला तरी विरोध करायचा नाही. हा विचार माझा नाही, तो विचार आला आहे असं म्हणायचं. नवीन विचार करू नका. समोर तिचा आणि तिच्या पुत्राचा फोटो ठेवा पण डोळे बंद हवेत. हळूहळू तुमच्या मनाला शांतता मिळेल. फक्त शांत बसा. ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळत नव्हती ती ह्या दहा मिनिटात मिळतील. आदिमाता आणि तिचा पुत्र तुमच्या बडबडीचा नाही तर तुमच्या शांततेचा आवाज ऐकतात. ते तुमच्या शांततेचा आवाज ऐकू शकतात मग तुमच्या बोलण्याचा आवाज ऐकणार नाहीत का? दोन सेकंद जरी शांततेची मिळतील ती सुद्धा त्रिविक्रमाकडून आईकडे डायरेक्टली तुम्हाला जोडतील हेच ते आवाहन. ‘जातवेदो महावह’ त्रिविक्रमाल आवाहन करण्यासाठी रात्री दहा मिनिटं शांत बसा. शरीर स्थिर ठेवा, मन शांत करा. मन शांत करण आम्हाला जमलं नाही तरी कमीत कमी शरीर स्थिर करा. मनात मुद्दाम विचार करायचा नाही. कितीही वाईट विचार आला, कुठलाही विचार आला तरी त्याची काळजी त्रिविक्रम घेईल. दहा मिनिटं शांत बसायच्या आधी ‘हरि ॐ। श्रीराम । अंबज्ञ।’ म्हणायचं आणि नंतर ‘जग जगदंब जय दुर्गे।’ म्हणायचं. ज्याक्षणी तुम्ही मन शांत करण्यासाठी शरीर स्थिर करता, त्या दहा मिनिटात म्हणजे सहाशे सेकंदातील कमीत कमी तीन सेकंद तो तुमच शरीर स्थिर करुन मन शांत करतो. तुम्ही काही केलं नाही तरी तो तीन सेकंद तुमचं कनेक्शन आईशी जोडतोच आणि एकदा ही सवय झाली की हा वेळ वाढत जातो. तुमच्या सगळया प्रश्नांची उत्तर ह्या दहा मिनिटांत मिळतात. त्यासाठी लागणारं सामर्थ्य गुह्यसूक्तम् मधून मिळत. कुठलंही नावं घेऊ नका फक्त शांत बसा. गुह्यसूक्तम वेगळं शांत बसून ऐका त्यावेळी ऐकू नका. मी नाशिकला गेलो होतो तेव्हा तिथे प्रत्येकजण गुह्यसूक्तम् म्हणत होता. त्या प्रत्येकाला ते म्हणाताना उर्जा मिळत होती.
रात्री दहा मिनिटं शांत बसा तो त्रिविक्रम जे तुम्हाला जाणणं आवश्यक ते जाणून देईल, जे आणायच आहे ते आणून देईल आणी जे घालवायचं आहे ते घालवेल.
सर्व प्रकारचं सौंदर्य, संपन्नता पुरवणारी लक्ष्मी आहे. अशा लक्ष्मीला आणण्यासाठी लोपामुद्रा त्रिविक्रमाला आवाहन करते. त्रिविक्रमाचं आवडणारं नाव - ‘अंबज्ञ’ आहे. जेव्हा आम्ही ‘हरि ॐ। श्रीराम । अंबज्ञ ।’ म्हणतो तेव्हा त्रिविक्रमाचं स्मरण करत असतो. ह्या दहा मिनिटात मनाची शांती आणि शरीराला स्थिरता ही तुमच्याकडे लक्ष्मीच्या येणा-जाण्याचा मार्ग आमचं शरीर, बुद्धी प्रशस्त होण्यासाठीचा मार्ग आहे.
तेलियाची भिंती...
दररोज रात्री ‘हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ।’ म्हणून दहा मिनिट शांत बसा. ह्या दहा मिनिटात कुठलाही प्रयास, प्रयत्न करू नका. कुठलाही विचार आला की म्हणायच ‘तो माझा नव्हता’. मग ‘जय जगदंब जय दुर्गे’ म्हणायचं. मात्र झोपा काढू नका. झोपताना रामरक्षा म्हणा, स्तोत्र म्हणा, नामस्मरण करा. तुमचं स्तोत्र अर्धवट राहिलं तर ते तुमचा बाप पूर्ण करील आणि बापाने पूर्ण केल्यावर आपल्यावर उपकार राहत नाही. कारण बाप-आई जे करतात ते उपकार नसतात.
‘जातवेदो’ हा शब्द लोपामुद्राने वापरला कारण सगळ्या उपासनेची, प्रार्थनांची, प्रार्थनांच्या फळाची सुरुवात त्रिविक्रमापासून होते. म्हणून ती सांगते ‘हे त्रिविक्रमा, त्या लक्ष्मीला माझ्या जीवनात आवाहन कर, घेऊन ये’ मुलगी आपल्या बापाकडेच हट्ट करते. बापूने सांगितलं म्हणून दहा मिनिटं शांत बसू तरी तुम्हाला तीन सेकंद शांततेची मिळणारच. ह्या विश्वाची पहिली जाणकारी, प्राकट्य म्हणजे वेद. प्रत्येक शुभ कार्याचा प्रारंभ म्हणजे वेद. त्रिविक्रम म्हणजे जगात जे जे शुभ, मंगलमय, कल्याणकारी निर्माण करतो तो त्रिविक्रम आहे.
जो कोणी कुठल्याही महिन्याच्या अठरा तारखेला ‘ॐ श्रीजातवेदाय नम:’ पाच वेळा म्हणेल त्याच कनेक्शन जोडल जाईल.
लक्ष्मीपूजन करू त्यादिवशी श्रीसूक्तम् म्हणा, त्याबरोबर वरील मंत्र म्हणून त्रिविक्रमाला सांगा ‘हे त्रिविक्रमा, महालक्ष्मीला आणि लक्ष्मीला माझ्याकडे घेऊन ये.’
॥ हरि ॐ ॥