॥ हरि ॐ॥
आजूबाजूला साप आहे हे कळलं की, त्यापासून लांब राहण्याचे मार्ग काढता येतात. भीती वाटली की आपण डोळे बंद करतो, त्यामुळे समोर असणारी गोष्ट नाही असं होत नाही, म्हणून जगात डोळे उघडे ठेवून वावरायचं. लहानपणापासून आपल्यावर संस्कार केले जातात. आजूबाजूची माणसं, शिक्षक, परिस्थिती आपल्यावर संस्कार करतात पण ९०% वेळा आपणच आपल्या मनावर संस्कार करीत असतो. आपण आपल्या मनाचा, बुद्धीचा वापर करून निर्णय घेतो ते महत्वाचे आहे. मन पकडता येत नाही, हे किती लहान आकाराचं आणि किती मोठ्या आकाराचं आहे हे ठरवता येत नाही. म्हटलं तर मोठ होतं, म्हटलं तर छोटं होतं. आपण जे बोलतो, त्या आवाजाच्या - विचाराच्या लहरी असतात. बर्याचवेळा अनेक प्रश्न पडत असतात मनात, मनाचा अनेकवेळा गोंधळ होतो. हे करू की ते करू - decision घेता येत नाही. सकाळी घेतलेला decision दुपारी बदलतो. कारण आपल्या बुद्धीची क्षमता मोजकीच असते. निर्णय घेणं सोपी गोष्ट नाहीए. मनावर नियंत्रण ठेवता येत नाही. ध्यान करायला बसलो तरी विचार येतातच. त्यासाठी खूप मोठी प्रॅक्टिस लागते, मन शुद्ध असावं लागतं. घरातल भांडसुद्धा शुद्ध करण्याची प्रक्रिया असते. मन शुद्ध, एकाग्रचित्त करता येत नाही. शुद्ध कसं करायचं आणि कशाने करायचं हे माहीत नसतं. बापूंचं प्रवचन सुरू आहे. प्रवचन संपल्यावर वाटतं अरे दहा मिनिटात प्रवचन संपलं पण? घड्याळात बघतो तेव्हा कळतं अरे एक तास झाला. कान ऐकत असतात पण मनाचं लक्ष नसतं. गाडीतून बाहेर फिरायला जातो. बाहेरचं सगळं बघत असतो पण त्या गोष्टींचं मेंदूत registration होत नसतं. आपण पंचज्ञानेंद्रियांच्या वाटेने गोष्टी बघतो, जेव्हा आपलं मन त्या त्या मेंदूतल्या सेन्टरशी जोडलेलं असतं तेव्हा जाणवतं. हे घर निवडायचं की ते घर निवडायचं, मुलीसाठी हा मुलगा निवडायचा की तो मुलगा निवडायचा. आपण जास्तीत जास्त बरोबर गोष्ट करायला बघतो. काहींना over confidence असतो की मी जे करतो तेच बरोबर आहे. ह्या विचारांची मोट कशी बांधायची, ह्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग कसा काढायचा.
अथर्व - मनाचा गोंधळ थांबविणारी. थर्व म्हणजे वैचारिक, मानसिक अशांतता, प्रचंड गोंधळ. मस्तकातला वैचारिक गोंधळ थांबवतं ते अथर्वशीर्ष म्हणून आपण गणपती आणि देवी अथर्वशीर्ष वाचतो. अथर्वशीर्षाचा बेसिक उद्दिष्ट मनुष्याला वैचारिक गोंधळातून बाहेर काढणे आहे. आपल्याकडे बेस्ट गोष्ट available असताना दुसरा मार्ग का निवडायचा? आम्ही मांत्रिक-तांत्रिकाकडे जातो आणि आणखी वैचारिक गोंधळ वाढवून ठेवतो. अथर्वशीर्ष म्हणताना अर्थ किती कळला? - झिरो. आमची श्रद्धा, concentration किती होतं- माहीत नाही. आमचा विश्वास किती होता - माहीत नाही.
साईसच्चरितामध्ये आपण मद्रासी भजन मंडळीची कथा बघतो. त्या भजनी मंडळात मद्रासी माणूस, त्याची बायको, त्याची मेव्हणी असे सगळे असतात. ह्या माणसाचं लक्ष बाबा किती पैसे देताहेत ह्याच्याकडे असतं. त्याला स्वप्न पडतं. त्या स्वप्नाच्या शेवटच्या टप्प्यात हा बाबांना विचारतो, “बाबा, तुमच दर्शन घेऊनसुद्धा एवढा त्रास का मला?” बाबा त्याला म्हणतात, “ह्या जन्मात नाही तर गेल्या जन्मी पाप केलं असशील.” तो बाबांना म्हणतो, “बाबा, पाप असलं तरी ते तुमच्या दर्शनाने नष्ट व्हायला पाहिजे” बघा - ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव।’ बाबा त्याला विचारतात, “एवढा तरी विश्वास आहे का?” आमचा विश्वास आहे का तेवढा? You are not judged by your performance, you are judged only by your faith” माणसांच्या जगात performance वर judge केलं जातं, पण परमेश्वराच्या दरबारात तुमचा विश्वास किती? तुमचा faith किती? ह्यावर सगळं असतं. ज्याचा विश्वास चांगला तो चांगली कामं करतोच. त्याच्या कामाची व्याप्ती किती हे महत्वाचं नाही. आपण देवी अथर्वशीर्षात बघतो, ‘शून्यानां शून्यसाक्षिणी’ ती (मोठी आई) शून्याला बघणारी, शून्याच्याही आधी आहे. मग माझ्या जीवनात काय चाललंय हे तिला कळणार नाही का? आपला विश्वास वाढवा. positive thinking ची पुस्तकं वाचून कोणी positive होत नाहीत. ज्याअर्थी positive thinking ची पुस्तकं मोठ्या प्रमाणात येताहेत ह्याचा अर्थ ही वस्तू घेणारी माणसं जगात आहेत. ही माणसं मूर्ख आहेत. आम्हाला प्रत्येक गोष्ट किंमत फेका आणि वस्तू द्या अशी हवी असते. भगवंताकडे असं अजिबात चालत नाही. अथर्वशीर्ष वाचताना आम्ही दर मिनिटाला बघत असतो मन शांत झालं की नाही?
डॉक्टरकडे गेलात की डॉक्टर ‘पथ्य’ सांगतो. ‘पथ्य’ म्हणजे हितकारक गोष्ट. आपण म्हणतो की ‘ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडली म्हणून’ म्हणजे काय तर ही गोष्ट माझ्या हिताची, फायद्याची ठरली. ‘अपथ्य’ म्हणजे अहितकारक गोष्ट. जेव्हा मोठं संकट येतं तेव्हा दररोजची प्रार्थना केली की आपल्याला वाटतं की, ह्या प्रार्थनेत काही दम नाही. हा problem मोठा आहे ह्यासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. Problem आला आहे म्हणजे आमची प्रार्थना कमी पडते, विश्वास कमी पडतो असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला दिसणारा आणि सहज हाताळू असा उपाय हवा असतो. म्हणून आम्ही मांत्रिक-तांत्रिकांच्या मागे लागतो, त्यांनी दिलेले धागे बांधतो. आम्हाला नीट कळलं पाहिजे माझ्यासाठी मलाच प्रयत्न करायला हवेत. आपल्या धर्माप्रमाणे वागण्यासाठी शरीर हे साधन आहे. शरीर हेच धर्म हा पुरुषार्थ साधण्याचे महत्वाचे साधन आहे. मग त्याची काळजी घ्यायला नको का? उचित तेच आणि उचित तेवढच खाणं, उचित तेच करणं अनुचित ते न करणं म्हणजेच शरीराची काळजी घेणं. आहार, विहार, आचार, विचार म्हणजे रहाणं. माझं वजन मी चुकीचं खातोय आणि व्यायाम करत नाही म्हणून वाढतंय. आम्ही चालायला जायचं ठरवतो, त्यासाठी नवीन शूज घेतो. त्याचे फोटो काढतो. हल्ली काही झालं की फोटो काढतात, आधी त्या वस्तूकडे प्रेमाने बघा. दुसर्या दिवशी सकाळी शूज घालून शिवाजी पार्कला दहा राऊंड मारायचे ठरवतो. चार राऊंडनंतर ज्यूस पितो आणि तरतरी आल्यासारखी वाटते. ज्यूस पोटात गेल्यावर तरतरी यायला चार ते साडेचार तास तरी जावे लागतात. दुसर्या दिवशी अलार्म लावतो, त्याने बाकी सगळे उठतात आम्ही झोपून राहतो. एक तास उशिरा उठतो. तिसर्या दिवशी आणखी एक तास उशिरा उठतो. चौथ्या दिवशी शूज दरवाज्यात असतात आणि आम्ही घरात झोपलेलो असतो.
आम्ही निर्णय चांगला घेतला पण तो टिकला नाही. आमचं मन इतक्या ठिकाणी खेचलं जातं की ते एका ठिकाणी concentrate नाही होत. इथेच त्रिविक्रम मदतीला येतो. तो तुमच्या मनोमय, प्राणमय आणि अन्नमय देहावर एकाच वेळी पाऊल टाकतो म्हणजे तिघांना एकत्र आणतो. म्हणून त्रिविक्रम जो उच्चार मनात रोवतो तो पार पडतोच. ‘रामसत्यसंकल्पप्रभु । सभा कालबस तोरी।’ (सुंदरकाण्ड) रामाचा संकल्पच सत्य असतो, सत्यात उतरतो. तो बोलतो तेच खरं होतं. हा त्रिविक्रम आपल्या शरीराला, प्राणाला आणि मनाला एकत्र आणून कुठलीही चांगली गोष्ट घडवू शकतो आणि कुठलीही वाईट गोष्ट थांबवू शकतो. तुमच्या साध्या नेहमीच्या प्रार्थनेतून, मंत्रातून, नवसातून, देवपूजेतून तो हे करतो. त्याला कुठल्याच मार्गाचा problem नाही. त्यासाठी आपला त्याच्यावर विश्वास हवा. आपला विश्वास वाढविण्यासाठी माणसाला काय करायला पाहिजे हे हा अल्गोरिदम सांगतो. हा अल्गोरिदम त्रिविक्रमाचा सगळ्यात मोठा अल्गोरिदम आहे. पण आपण हा चुकीच्या अर्थाने वापरतो. हा अल्गोरिदम म्हणजे गणित नाहीए. तर काय आहे -
‘मौनम् सर्वार्थ साधनम्’
मौन : कायीक, वाचिक, मानसिक. मौनं : त्रिविक्रम सतत जवळ असतो. शरीराने, वाचेने मौन धरायचं. शरीराने हालचाल करायची नाही, तोंडाने बोलायचं नाही, मनाने विचार करायचा नाही. फक्त त्या त्रिविक्रमाला हाक मारायची, “हे त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे’’ अतिशय शांत चित्ताने डोळे बंद करून हे बोलायचा प्रयत्न करा. डोळे बंद करा, अंगाची हालचाल करू नका. शरीराची, तोंडाची हालचाल करू नका. मानसिक हालचाल करू नका. मनात विचार येऊ नयेत म्हणून प्रयत्न करू नका. मनात फक्त हाच विचार करा की, ‘त्रिविक्रमा, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.’ हे मनातल्या मनात बोलत राहायचं. ओठांची हालचाल अजिबात करायची नाही. मनात एखादा विचार येत असेल तर त्याला घालवायचा प्रयत्न करु नका आणि त्याला वाढवायचाही नाही. मग बघा, हे वाक्य तुमच्या मनाला कसं shape देतं! हे वाक्य तुमच्या मनाला शेप देणारं आहे. हे invitation आहे. जेवढा जास्त वेळ कराल तो तेवढा अधिकाअधिक प्रखर होणार. दररोज सकाळी पाच मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट करा. सकाळी नाही जमलं तरी रात्री नक्की करा. ह्या पाच मिनिटांत तुमचं आख्खं आयुष्य बदलू शकतं. दररोज पाच मिनिटं तुमच्या मनातले विचार आणि त्रिविक्रमाचा तुमच्यासाठीचा प्लॅन आणि तुमची आत्ताची परिस्थिती यातली तफावत ह्यामध्ये जो विचार आवश्यक आहे तो विचार त्रिविक्रम वाढवेल आणि जो अहितकारक आहे तो विचार दूर करेल. Enjoy that peace. त्रिविक्रमासाठी कुठलीच गोष्ट कठीण नाही. आपली त्याच्याबरोबर धावण्याची capacity आहे का? तो मद्रासी बाबांना विचारतो, “बाबा, तुमच आयुर्मान किती?” बाबा त्याला विचारतात, “माझ्याबरोबर धावतोस का?” बाबा धावायला लागतात तेव्हा धूळ उडते आणि बाबा कोसभर दूर धावत जातात. त्रिविक्रम आपल्याबरोबर एकाच वेळेस तीन पावलं टाकतो. आपण एकच पाऊल टाकू शकतो. ह्या पाच मिनिटांतील शांती एन्जॉय करा. ही शांती तुमच्या मनात harmony निर्माण करतो, हा त्रिविक्रम उत्पन्न करतो. ह्या हार्मनीमधूनच सगळे निर्णय उत्पन्न होतात. We are not scared of anything. Let him judge you.
तुम्ही स्वत:ला का फालतू ठरवता? तुम्हाला काय देवाने तुमचा judge म्हणून निवडलयं का? त्याला Judge करु दे. तो त्रिविक्रम क्षमा करायला तयार आहे पण आमचं मनच आम्ही केलेल्या चुका उगाळत राहतं. कुठलाही निर्णय नीट घेण्यासाठी मन शांत असावं लागतं की परमेश्वराशी अनुसंधान जमतं आणि मग कुठलीही वाईट शक्ती, विचार छळूच शकत नाहीत.
Arizona इथे महिषासुराचं देऊळ बांधलं जातंय, आणि आपली ही आई कोण आहे तर ‘महिषासुरमर्दिनी’. जी धार्मिक चर्च आहेत ती पवित्रच आहेत. पण ह्यांनी ‘बायबल’ वर official बंदी आणलीय. पवित्र, धार्मिक ग्रंथांच्या पठणावर, वाचनावर बंदी घातली आहे. हे फॅड इंडियात यायला वेळ लागणार नाही. ह्या गोष्टी रोगासारख्या पसरत असतात. नवीन कायदा आणून इथल्या गव्हर्नरने कुठल्याही प्रकारचं धार्मिक पठण, मनन करण्यावर बंदी आणली त्यासाठी त्यांनी त्यांचं constitution पण बदललय. अंधश्रद्धा, अंधश्रद्धा म्हणून त्यांनी श्रद्धेच्याच मुळावर घाला घातलाय.
आपल्याला माहीत पाहिजे की इथे घाण आहे आणि जिथे उकिरडा आहे तिथे जा कशाला? ह्याचा अर्थ ज्यांची मुलं अमेरिकेत आहेत त्यांनी घाबरू नका. सैतानाच्या ताकदीपेक्षा आपल्या मोठ्या आईची ताकद मोठी आहे.
मुंगी हा अतिशय जुना प्राणी आहे. Swarm Intelligence हे शास्त्र develop होतंय. मधमाश्यांचा, पक्ष्यांचा ही थवा असतो. Swarm Intelligence मुळे सायन्सची जोरदार प्रगती होत चाललीय. मुंग्या घर बांधतात, सुरळीतपणे बांधतात. एका शास्त्रज्ञाने लिक्विड सिमेंट वारुळात टाकलं. त्याला दहा टन सिमेंट लागलं, तेव्हा त्याला वारुळाचं स्ट्रक्चर मिळालं. मुंग्या अन्न गोळा करताना एकमेकांना गाईड करतात, नवीन घर शोधतात, काही मुंग्या शेती करतात काही प्रकारचे फंगस वाढवून, त्याचे ताफे तयार करतात. काही मुंग्या पशुपालन करतात. किटक गोळा करतात, त्यांच्याकडून त्या मध गोळा करतात. एका वारुळातल्या मुंग्या दुसर्या वारुळावर हल्लादेखील करतात आणि त्यांना गुलाम बनवतात. ही कळपाची बुद्धीमत्ता आहे. मुंगी सारखा प्राणीसुद्धा मोठं कृत्य करू शकतो. मग माणसाला काय अवघड आहे? मुंग्यांचा एक ताफा त्यांचं घर गेल्यावर कळपाचाच तराफा करून अनेक संकटांवर मात करून amazon नदी क्रॉस करतानाचा व्हिडिओ बापूंनी दाखवला. वाटेत त्रास देणारे मासे, बोटीने उडणारं पाणी ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करत, आपल्या राणी माशीला, अंड्यांना संभाळात त्या दुसर्या किनार्यावर पोहचात. मासे, पाणी, बोटी सारखे सैतान मध्ये येऊनही नेटाने पुढे गेल्यात ह्या मुंग्या. आपण पण असं रोजचं पाच मिनिटं नेटाने पुढे जायचं. आता कधीच मी स्वत:ला कमी ताकदीचा म्हणणार नाही. र्दुदैवी समजणार नाही. माझ्याकडे काही साधन नाही असं म्हणायचं नाही. एक मुंगी करू शकते मग मी का नाही?
॥ हरि ॐ॥