॥ हरि ॐ॥
गोविद्यापिठम्मध्ये AIGV मध्ये अनेक सुंदर projects जसे Organic शेती, बागायती, पशुपालन सुरू आहेत ज्यामुळे गरीब शेतकर्यांना विनामूल्य शिक्षण मिळेल. कामाचा व्याप वाढला आहे, मजबूत काम आहे. त्यामुळे तिथे कोणाला continuously दोन-तीन दिवस राहून सेवा करायला मिळत असेल तर जरूर जा. गोविद्यापिठम्मध्ये सेवा करणं म्हणजे गोविद्यापिठम्ची सेवा करणं, त्या गोमातेची सेवा करणं, द्वारकामाईची सेवा, तिच्या लेकाची सेवा करणं आहे. तिथे शेतीचे जे नवनवीन उपक्रम सुरू झाले आहेत त्यामुळे हजारो गरीब शेतकर्यांना, अश्राप जीवांना आपली सेवा उपयोगी पडणार आहे. त्यांना मदत करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ज्यांना नावं द्यायची असतील त्यांनी ३ नंबर गेटच्या समोर जे AIGV चं काऊन्टर आहे तिथे जाऊन आपली नावं द्या.
आपण ३३ कोटी देव ऐकलेत पण आपल्या बँकेत रामनाम जप ३३ अब्ज ८६ कोटी १८ लाख २९ हजार ५३६ एवढा झालेला आहे. ३३ अब्ज हा आकडा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा होता. रामनाम बँकेची एकूण जपसंख्या ५१ अब्ज, १४ कोटी इतकी आहे. आपली बँक समृद्ध होत चालली आहे.
ही बँक कशी आहे इकडे सगळ्यांना समान न्याय आहे. इतर बँकेत तुम्ही १०० रुपये भरलेत आणि बँकेत कोटी रुपये असले तरी त्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. ह्या बँकेत जो शेअर तुमच्यासाठी आवश्यक आहे तो तुम्हाला मिळतोच. समजा ‘ए’ ने २० वह्या लिहिल्या पण वह्या लिहिणारा श्रद्धावान असला पाहिजे, नुसती वही लिहून चालणार नाही, आणि ‘बी’ ने २०० लिहिल्या आहेत. २०० वह्या लिहिणार्याजवळ जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य २ वह्या लिहिणार्याला आवश्यक असेल तर ते त्याला मिळू शकतं आणि २०० वह्या लिहिणार्याचंही पुण्य कमी होत नाही. ते कर्ज कसं फेडून घ्यायचं, तेवढ्या वह्या त्याच्याकडून कशा लिहवून घ्यायच्या हे सगळं तो बघेल त्याची रिकव्हरी करायला तुमच्या दारावर कोणीही येणार नाही. पण ते कर्ज जर ह्याच जन्मात फेडलं तर किती चांगलं होईल, तहान लागल्यानंतर विहीर खणायला गेलात तर, विहीर खणता-खणता प्राण जाईल. त्यापेक्षा तहान लागायच्या आधीच विहीर खणायला पाहिजे. कारण काय होईल आणि काय नाही होणार ह्याची आपल्याला कल्पना नसते. कर्ज फेडण्यापेक्षा कर्जच घ्याव लागलं नाही तर किती छान होईल. जेव्हा आम्ही मनापासून आपल्या कामात वेळ काढून वह्या लिहितो तेव्हा कर्ज कसं फेडायचं हे तो जाणतो. वेळातून वेळ काढून वह्या लिहित रहा. इथे कुठेही कर्ज फेडण्याचे नियम ठरलेले नाहीत. इथे प्रत्येकाला नियम वेगवेगळे असतात. बाप श्रीमंत आहे आणि पोराने भीक मागितली तर बापाला लाज नाही वाटणार काय? बापाला मान खाली घालायला लागणार का? नाही. कर्ज कसं फेडून घ्यायचं हे तो जाणतो, सगळ्यात मोठा गुंड आपला बाप आहे आणि ‘हा गुंड असला तरी हा माझा बाप आहे’ ही खात्री असू दे. रागवला, फटके मारले तरी तो बापच आहे.
आपण ह्या त्रिविक्रमाचे अल्गोरिदम पाहतोय गणिताच्या आधाराने. हे सगळं जादू नाहीये. हे संपूर्ण विश्वच गणिताने भरलेलं आहे. आता सेमिनारमध्ये आपल्या मंडळींनी मला एका मोठ्या Scientist ची ओळख करून दिली. मी त्याचं नावही कधी ऐकलं नव्हतं. ह्यांनी मला सांगितलं की, ह्याला सायन्सचा गॉड म्हणतात. हा आईनस्टाईनच्याही कमीत-कमी २००० पट मोठा आहे. ह्याचं नाव आहे - Nikola Tesla. ह्याच्याएवढा महान शास्रज्ञ अजूनपर्यंत झालेला नाही आणि पुढे होणारही नाही. हा ईश्वराचा परमभक्त होता. ह्याचा जन्म १८५६ सालचा आहे. ह्या माणसाने १८९४ साली पहिल्यांदा आवाज एकीकडून दुसरीकडे नेला. १८९६-९७ साली ह्याची सगळी प्रयोगशाळा त्याच्या शत्रूंनी जाळली. तरीही त्यानंतर त्याने एका वर्षात १८९८ साली यु.एस.च्या प्रयोगशाळेत २ लाख दिवे ११ तास continue पेटवून दाखवले. ह्याचे सगळे प्रयोग mindblowing आहेत. अचाट आहेत. त्याने सगळे प्रयोग प्रूव्ह करून दाखवलेत. पहिला रोबोट त्याने तयार करून दाखवला. ह्याचं नाव कोणाला माहीत नाही हे आमचं दुर्दैव आहे. शोध म्हणजे काय हे ह्याने दाखवून दिलं. हे पृथ्वी ते गुरु ग्रह हे अंतर अवकशात अंतराळयानाने जायला काही दिवस लागतील. अवकाश म्हणजे काळ आणि वेळ. टाईम आणि स्पेस. काळ आणि आकाश. इथून-इथे जायचं ही स्पेस आहे आणि वेळ आहे पण समजा हे अवकाशाचं अंतर कमी केलं तर! समजा पृथ्वी आणि गुरुग्रहामध्ये करोडो मैल अंतर आहे, हे कमी होऊ शकतं हे विज्ञानाने prove केलं आहे. हा स्पेस आणि टाईम त्याने bend करून दाखवला. अवकाश म्हणजे टाईम आणि स्पेस एकत्र म्हणजे अवकाशालाही- काळालाही व स्पेसलाही bend केलं तर पृथ्वीवरून चंद्रा इतक्या अंतरापर्यंत हे अंतर आणून ठेवलं. टाईम आणि स्पेसला bend करणं शक्य आहे. काळ आणि स्पेसला वाकवता येतं हे ह्या शास्त्रज्ञाने सिद्ध केलं आहे.
टाईम आणि स्पेस दोन्ही गोष्टी वाकवू शकतो मग तिसरी गोष्ट कोणती? हा त्रिविक्रम आहे मग तिसरी गोष्ट पण काहीतरी असली पाहिजे. तिसरी गोष्ट - दिशा. टाईम आणि स्पेस ह्यांच्या जोडीने दिशा म्हणजेच direction सुद्धा वाकवता येते. त्रिविक्रम एकाच वेळेस काळ, अवकाश आणि दिशा ह्या तिघांना वाकवू शकतो. त्रिविक्रमाचं काळ(Time), अवकाश(Space) आणि दिशा(Direction) ह्या तिघांवरही एकाच वेळेस नियंत्रण / राज्य चालतं हे अंतर दाखवणारं एक समीकरण आहे ते आपल्याला पाहायचंय.
आपण साईसच्चरित्रमध्ये बघतो, साईबाबा मशिदीत बसलेले आहेत आणि धुनीत हात खुपसतात आणि लांब अंतरावर असणार्या भट्टीत पडलेल्या लोहारणीच्या मुलीला वाचवतात. बाबांच्या ठिकाणावरून त्या ठिकाणापर्यंत जाण्याचं अंतर बाबा कमी करतात. इथे बाबा काळ, स्पेस आणि दिशेला एकाच वेळी वाकवतात.
नानासाहेब चांदोरकर जमिनीवरची माती उचलून आपल्या पत्नीच्या कपाळाला लावतात आणि लांब कोकणातल्या गावी असणार्या आजारी मुलीला आराम पडतो. ती उदी ही नसते माती असते. ती लागते कोणाच्या कपाळाला तर नानासाहेब चांदोरकरांच्या पत्नीच्या कपाळाला. इथे अंतर वाकलं, दिशा वाकली, काळही वाकला. हे कसं घडलं? हेच ते तत्व. माती म्हणून उदी एका व्यक्तीच्या कपाळाला लावली जाते आणि फायदा तिसर्या व्यक्तीलाच होतो. उदी म्हणून माती लावलेली व्यक्ती एका दिशेला आहे, बाबा एका दिशेला आहेत, बाबांनी इथे दिशा वाकवली. नानासाहेब चांदोरकरांनी उदीही लावलेली नाहीये, माती लावली पण त्याचक्षणाला दूर गावात असणार्या आजारी मुलीला आराम पडला. नानासाहेब चांदोरकरांची पत्नी त्यावेळी ती आजारी मुलगी होती. नानासाहेब चांदोरकर किंवा त्यांची पत्नी तिथे गेलेले नाहीयेत. नानासाहेबांनी ठाण्यावरून बाबांना गार्हाणे घालून बायकोला उदी म्हणून रस्त्यावरची माती लावली. बाबांनी हे सगळं बेन्ड केलं. पहिला बेन्ड ती आजारी मुलगी आणि नानासाहेब चांदोरकरांची पत्नी इथे मारला आणि दुसरा बेन्ड चांदोरकरांची पत्नी आणि बाबा इथे मारला.
आजारी मुलगी_____________मिसेस चांदोरकर (पहिला बेन्ड)
मिसेस चांदोरकर__________________बाबा (दुसरा बेन्ड)
हे काळ, अंतर (स्पेस), दिशा एकदा नाही तर एकाच वेळेस दोनदा वाकवल्या म्हणजे आम्हाला कळेल की सद्गुरु काय करू शकतो.!
ह्या शास्त्रज्ञाच्या नावावर ७०० Patents आहेत. अनेक लोकांनी त्याचे अनेक पेटंट चोरलीत. तरीही त्याने अख्खी बोट समुद्राच्या एका किनार्यावरून अदृश्य करून दुसर्या किनार्यावर आणली. हे जादूने नव्हे तर पूर्णपणे सायन्सच्या आधाराने त्याने केले. १९४४ साली ते वारले पण त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत active होते.
त्रिविक्रम जगाच्या आधीही active होता, आजही तेवढाच active आहे आणि पुढेही तेवढाच असणार आहे. तो सायन्सच्या मागून धावत नाही आणि पुढेही धावत नाही. सायन्स ह्या त्रिविक्रमाच्या मागून धावत असतं. म्हणून तो त्रिविक्रम आहे.
ह्या त्रिविक्रमाचा जगाला बेन्ड करणारा अल्गोरिदम आपल्याला बघायचा आहे.
1 X 9 + 2 = 11
12 X 9 + 3 = 111
123 X 9 + 4 = 1111
1234 X 9 + 5 = 11111
12345 X 9 + 6 = 111111
123456 X 9 + 7 = 1111111
1234567 X 9 + 8 = 11111111
12345678 X 9 + 9 = 111111111
123456789 X 9 + 10 = 1111111111
हा ‘९’ नंबर म्हणजे काय? हा त्याचा नंबर आहे. क्रम तोच आहे. Main गुणण्याची संख्या ‘९’ आहे. उत्तर मात्र एकच आहे. ‘९’ चा गुणधर्म म्हणजे एकच आहे. हे addition म्हणजे मनुष्य त्याच्या कतृत्वाने त्याच्या जीवनात जे काही add करतो ते additonal (१,२,३,४,५,६,७,८,९,१०) आहेत. ‘९’ हा पूर्णांक आहे. हा त्याचा आकडा आहे. श्रद्धावानाच्या ‘नऊ समान निष्ठा’, ‘नवनिर्धार’, आणि अमक्या-अमक्याची ‘नऊ वचनं’. हा ‘९’ चा गुणाकार तो करतो. तुम्ही आधीही जे केलेलं आहे त्याला तो ‘९’ ने गुणतो. १२ X ९=१०८. तो फक्त पुण्य गुणतो. कारण पाप आलं तर division आलं. तुम्हाला जे काही चांगलं मिळू शकतं त्याला तो ‘९’ ने गुणतो. १२ X ९ हे जीवन तुमचं यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फक्त ‘३’ add करण्याची गरज असते (१२X९=१०८+३=१११) ‘१०८’ तो देतो. तुम्हाला फक्त ‘३’ मार्क हवेत. हे ‘३’ मार्क मिळाले तर त्याने जो तुमच्या जीवनासाठी plan केला आहे, तुमचं जीवन पूर्णपणे सुखाने भरून टाकण्यासाठी जो plan केला आहे त्यासाठी ‘३’ आकड्याची आवश्यकता आहे. थोडा है, थोडे की जरूरत है। ह्या एकाचा जो plan आहे तुमच्या जीवनासठी, तुमचं जीवन अधिक सुंदर करण्यासाठी. असा व्यवहार बघितलाय कधी? अधिक प्रगतीसाठी प्रत्येकाला (४,५,६,७,८,९) ह्या मार्कांची गरज आहे. आणि अधिक प्रगतीसाठी फक्त ‘१०’ च Add करायचे आहेत. पण हे कोणासाठी फक्त श्रद्धावानांसाठी आहे. पण आम्ही आमचे ‘१०’ मार्क टाकणार नाही पण आम्हाला उत्तर हे हवंय. तर कसं होईल?
हे तुमचे मार्क म्हणजे तुमचे प्रयास, तुमचा faith - विश्वास. हे तुमच्या भक्तीला, जपाला दिलेले मार्क नाहीत. हे मार्क तुमच्या विश्वासाचे आहेत. आमचा विश्वास लहानशा गोष्टींनी हलतो का? आम्ही विचार केला पाहिजे. जेव्हा naturally abortion होतं तेव्हा ते उचितच असतं कारण होणारं बाळ Normal नसतं, पण तसं झालं तर आम्ही देवाला शिव्या घालतो. इथे विश्वास पाहिजे. पर्स हरवली की विश्वास उडाला. गुरुक्षेत्रम्मध्ये आलो आणि पर्स गेली. अरे जीव जायचा होता तिथे पर्स गेली. कुणीतरी काहीतरी सांगतो, आम्ही हलतो. आमच्या श्रद्धा कमकुवत असतात. हे मार्क विश्वासाला आहेत.
एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ॥
उपनिषदामध्ये दिलेल आहे - ‘सगळंकाही फक्त विश्वासातच आहे’ Yes सगळं विश्वासातच आहे.
ह्याच Scientist च्या विरोधात सगळे उद्योगपती, राजकारणी, सायन्स area मधली माणसे उभी होती पण ह्याचं काही वाकडं झालं का? एक बिल्डिंग जळली तरीही हा खरोखर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिला. देवा मला मार्ग दाखव. त्याने देवाला कधीच कोसलं नाही, त्याने देवाला विचारलं नाही की, ‘शत्रुने बिल्डिंग जाळली तू ती जळू का दिलीस?’ अकरा महिन्यात तीन बिल्डिंग्ज् उभ्या राहिल्यात. त्याने दिवे लावून सगळया राजकारण्यांना, उद्योगपतींना शरण आणलं. लोकं sympathy द्यायची तेव्हा तो म्हणायचा - “God is There!! God is Great !! Mother will take care.”
हा विश्वास ११ ते १११ ला तुम्हाला ‘३’ ची गरज असते. पण ११ पासून ११११११११११ पर्यंतसाठी फक्त ‘१०’ चीच गरज आहे.
हा विश्वास एकमेव गोष्ट आहे. हा विश्वासच काम करतो ज्यामुळे मातीची पण उदी होते. नानासाहेब चांदोरकरांचा बाबांवरचा विश्वास, त्या मुलीच्या आप्ताचा चांदोरकरांवरचा विश्वास की चांदोरकरांकडे उदी असणारच आणि बाबांची उदी काम करणारच. बाबा द्वारकामाईत आहेत, नानासाहेब ठाण्याला आहेत, आणि मुलगी कोकणात गावी आहे. चांदोरकरांची व त्या व्यक्तीची श्रद्धा - श्रद्धेपेक्षा विश्वास महत्वाचा आहे.
आमची श्रद्धा असते पण आमचा विश्वास नसतो. विश्वास असायलाच हवा. टाईम, स्पेस आणि डायरेक्शन ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येणं म्हणजेच विश्वास. आज आपल्याकडे जे-जे चांगलं आहे ते त्याने दिलेलं आहे. तसंच माझ्यासमोर कितीही संकटं असतील, चारी बाजूला अंधार आहे - हा माझ्या देवाचा रंग = विश्वास, हा अंधारसुद्धा विठ्ठलाचाच रंग आहे हा विश्वास पाहिजे. संकट कधी संपेल ह्याची वाट बघत नाही, त्याला खात्री असते हे संपणारच हा विश्वास हवा.
गाडीतून प्रवास करताना जर पत्ता माहीत असेल, सोबत गप्पा मारायला चांगली व्यक्ती असेल तर अंतर कमी वेळात संपते आणि तुम्ही गाडीतून जात आहात, सोबत कोणी नाहीये, पत्तासुद्धा माहीत नाहीये तेव्हा थोडं अंतरही जास्त वाटतं.
विश्वास म्हणजे काय तर दिशा, अंतर कापण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची वेळ कधी चुकणार नाही ह्यालाच विश्वास म्हणतात. चांदोरकरांचा विश्वास असाच होता. त्यांची मुलगी pregnancy ने अडलेली होती, ती जामनेरला आहे. बापूगीरना आणखी पुढे जायचे होते, त्याच्याजवळ पुरेसे पैसेही नव्हते. बाबा शिरडीत होते. तरीही बापूगीर उदी घेऊन जातात तेव्हा नाना त्यांना म्हणतात, “तुम्ही वेळेवर आलात.” बापूगीर त्यांना सांगतात तुम्हीच तर टांगा पाठवला होता नं?” नाना सांगतात, “मी कुठून टांगा पाठवणार मला कुठे माहीत होते की तुम्ही येणार आहात!”
कुठला टांगा कुठला शिपाई । नटनाटकी ही साई माऊली ॥
जे चांदोरकर पायाखालची माती उदी म्हणून लावतात. तेच घरातली उदी संपल्यावर बाबांना हाका मारताहेत. मुलीच्या डोक्याला संपलेल्या उदीची डबी लावतात आणि तिला सांगतात की, “कळ येत असेल तर ‘आई-आई-आई’ ऐवजी ‘बाबा-बाबा-बाबा’ म्हण बाबा नक्की येणारच!!’
बाबांनी जादू करून दाखवली नाही. त्यांनी बापूगीरद्वारे उदी पोहचवली. इथे बाबांचे वेळ, अंतर, दिशा चुकले का? नाही. आमचा विश्वास असाच असायला पाहिजे की तो आमच्यासाठी विश्वसुद्धा वाकवू शकतो. हा त्रिविकम केवळ आमच्यासाठी Universe देखील वाकवतो. आता आपल्याला दोनपासून दहापर्यंत संख्या कशी वाढवायची आहे हे पहायचयं. पुढच्या वेळेस येताना हा अल्गोरिदम लिहून आणला तरी चालेल कारण मग तुम्हाला समोर ठेवून नीट बघता येईल.
॥हरि ॐ॥