॥ हरि ॐ॥
माझ्याशी देव बोलतो, देव अंगात येतो असं म्हणणारी माणसं खोटी असतात. कोणाच्याही अंगात देव येत नाही. जनाबाई, मुक्ताबाई, संत सखू, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर एवढ्या पवित्र व्यक्तींच्या अंगात का आला नाही? अंगात येणारा एक तर खोटा असतो किंवा तो आजारी असतो. अंगात आली तर भूतंच येतात? ही अंगात येणारी मंडळी माणसाचा चेहरा बघून बोलत असतात. ह्यांना एकतर पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं किंवा psychiatrist treatment करणं आवश्यक असतं. ज्योतिषशास्त्र पण पवित्र शास्त्र आहे, पण ते पवित्र मार्गाने केलं तर. तो ज्योतिषी सेवा म्हणून करत असेल तर ते पवित्र आहे.
आज मला ज्या विषयाबद्दल बोलायचं होतं तेच घडलं. आवाज! मंदिरात बघा आपण देवाच्यासमोर पैसे देतानाही किती वेळा ओवाळतो. देवा, नीट बघ मी तुला चार आणे देतोय! प्रश्न, दु:ख, अडचणी कोणाला नसतात? जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतातच.
आपण किती आवाज करतो लहान-सहान गोष्टींचा? नवरा-बायको म्हटल्यावर एक गोष्ट आलीच, ते म्हणजे भांडण. जे नवरा-बायको एकमेकांशी भांडत नाहीत ते नवरा-बायकोच नाहीत. दोन मित्रांमध्ये, भांवडांमध्ये, सासु-सुनेमध्ये भाडंणं होतातच. भांडताना अंतर दोन फुटाचं असतं पण आवाज १०० फूट ऐकू जाईल एवढा मोठा असतो. पण तेच जर नवरा-बायको प्रेमाने बोलत असतील तर ते पाच फुटावर जरी उभे असले आणि हळूहळू बोलले तरी ऐकू येत असतं. प्रेमाने बोलताना कोणीही मोठ्या आवाजात बोलत नाही. भांडणात अंतर दोन फूट असतं आणि आवाज दसपट असतो. हे असं का घडतं? ह्याचा कोणी विचार केलाय का कधी? प्रेमात बोलताना अंतर जास्त असतं आणि आवाज एकदम छोटा असतो. माणसासाठी अंतर म्हणजे दोन हृदयामधलं अंतर असतं. भांडताना हृदयं हजार फुटावर गेलेली असतात आणि प्रेमात हृदयं जवळ आलेली असतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या माणसांशी भांडताना, आवाज छोटा असला पाहिजे. त्याचप्रमाणे आपला जो देव आहे, त्याच्याशी बोलतानाही आवाज छोटा असायला हवा, मधुर असायला हवा. भांडायचं तर प्रेमाने भांडा मग चुकून आवाज वाढला तर गोष्ट वेगळी आहे. प्रपंचात नवरा-बायकोमध्ये, भावंडांमध्ये, मुलांशी भांडताना आवाज काढायचा असेल तेव्हा आवाज काढणं वेगळं पण ते लिमिटमध्ये असलं पाहिजे. आवाज दूरपर्यंत न पोहचणं म्हणजेच सकाळी नऊ वाजता भांडलो ते रात्री नऊ वाजता निवळायला पाहिजे. लोकांचा राग तीन-चार दिवस राहतो. आवाज मोठा आहे म्हणजे हृदयं लांब गेलेली आहेत. चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ राग राहिला तर something is chemically wrong. मनातला राग जास्त काळ टिकला म्हणजे आवाज मोठा आहे.
आप्त म्हणजे जिच्याशी दोन मिनिटं बोलल्यावर problem solve होतो. नातेवाईक जे नाहीत ते, नसलेले ते नातेवाईक. आप्त रक्ताचे असतीलच असे नाही. आप्ताशी भांडण होणं म्हणजे आपल्या प्रेमाच्या माणसापासून लांब जाणं ही सगळ्यात मोठी चूक असते. ही चूक भरून काढताना अनेकांची दमछाक होते. आपलं कोण हे एकदा माहीत झालं की, आपल्याची आपुलकी काळजीपूर्वक जपायची असते. ती आपुलकी तो त्रिविक्रम जपत असतो.
ह्या त्रिविक्रमाचं गणित गुणाकाराचं आहे. ह्या गुणाकारात कुठेही शून्य नाहीये. एकाच्याच गुणाकारात शून्य नाही, म्हणूनच काही नाही अशी परिस्थिती तो कधी आणत नाही.
अन्न घेणं आणि मल विसर्जन करणं ही दोन ठिकाणं वेगवेगळी आहेत. तरी क्रिया तीच असते. जशी क्रिया घडली तसंच तो करतो. अन्न तोंडाने घेतो तेव्हा पहिली क्रिया आपण कुठली करतो तर ओठ बंद करतो. शेवटची क्रिया म्हणजे मलविसर्जन गुदद्वाराद्वारे करतो तेव्हा घाण बाहेर टाकली की गुद्दद्वार बंद होत. दोन्ही क्रिया सेमच आहेत. शरीर क्रियेमधील इतक्या गोष्टी इतक्या सुंदरपणे तो हाताळतो. जेव्हा आम्ही त्याचा अल्गोरिदम वापरायला नकार देतो तेव्हा आजार होतो. सगळ्या क्रिया क्रमाने घडवण ही त्याची खासियत आहे. आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढायचं तर तो सगळया गोष्टी क्रमानेच करतो. आमचा problem आता सोडवण्याने सुद्धा काय problem होणार हे त्याला माहित असतं. काही काही problems त्याच वेळी सुटण्यानेही घोटाळे होण्याची शक्यता असते. हे करताना तो आवाज करत नाही. तो आम्हाला कधीच सांगत नाही की “मी हे केलंय” आईनस्टाईनचं एक वाक्य आहे - “Co-incidences are nothing but Gods way of remaining anonymous” हे आईनस्टाईनचं वाक्य आहे लक्षात ठेवा. योगायोग म्हणजे देवाला स्वत:ला त्या क्रेडिटपासून अलिप्त ठेवायचं असतं. त्याला स्वत:ला क्रेडिट घ्यायचं नसतं. देव इथे सांगत नाही की, “तुम्हाला रिक्षा हवी होती ती रिक्षा पाठवणारा मी आहे.” तो आवाज करतच नाही. आकाशवाणी द्वापारयुगात ऐकू यायची, सत्ययुगात देव प्रत्यक्ष भेटायचा, त्रातार युगात आवाहन केल्यानंतर देव भेटायचा, पण कलियुगात देव असा भेटत नाही.
बापू, ‘आम्हाला प्रूफ पाहिजे की, देवाला आमचं ऐकू येतंच.’ लक्षात ठेवा त्याचा प्रभाव नाही अशी कुठलीच जागा सापडत नाही. तुम्ही जे काही करता ते सगळंच्या सगळं त्याला कळतंच. त्याची तुमच्याकडे बघण्याची वृत्ती बाळाची आहे. आपल्या बाळाची शी-शू काढताना आईवडिलांना काही घाण वाटते का? तो कानाडोळा करतोय म्हणजे तो तुमचं वागणं approve करत नाही. तो ह्या दृष्टिकोनातून बघतो की, हे बाळ आहे, हे चुकणारच. लहान मुलावर कोणी ओरडेल का? इथे तुम्ही सगळी त्याची बाळं आहात. लहान मुलं तोंडात चुकीच्या गोष्टी घालू नये म्हणून चुकीच्या वस्तू तो बाजूला काढतो. आपण कसं लहान मुलाला घाबरवतो की गरम आहे चटका लागेल. आणि तरीही त्याने ऐकले नाही तर त्याला चापटी मारतो.
एक वर्षापर्यंत आईबापाचं जे नातं मुलाशी असतं तेच नातं त्याचं तुमच्याशी असतं. जो त्रिविक्रमाला मानत नाही त्याला तो त्याच्या वयाप्रमाणे वागवतो. एका वर्षापर्यंत मुलाची जबाबदारी आईवडिलांची असते. पण जसं जसं मूल मोठं होत जातं तसतशी आईवडिलांची जबाबदारी उरत नाही. म्हणूनच श्रद्धावानांनी आपली श्रद्धा मधुर करायला हवी. त्याच्याबरोबर कायम एक वर्षाच्या बाळाच्या रूपातच रहायला हवं. तुम्ही सत्तर वर्षाचे झालात, ऐंशी वर्षाचे झालात तरी तुमच्या वयाप्रमाणेच वागायचं तरीही तुम्ही त्याचे बाळच आहात. मग तो तुमचा मित्र होईल, तुमच्या वयाचाही होईल, तो आमच्यासाठी काहीही बनू शकतो.
हा सगुण-साकार पण आहे आणि निर्गुण-निराकारही आहे. सगुण-साकार आणि निर्गुण-निराकार ह्यांचं नातं अभ्यासणं म्हणजेच मन आणि कृती ह्यांचं नातं पाहायचं आहे. तो निराकार-निरावयवही आहे आणि सगुण-साकारही आहे. निर्गुण-निराकाराच्या जवळ असणारी गोष्ट म्हणजे ‘मन’.
१,२,३,४,५,६,७,८,९,८,७,६,५,४,३,२,१,
निर्गुण-निराकार म्हणजे काय ह्या त्रिविक्रमाची आई- आपली आई किंवा त्याचे आजोबा - दत्तगुरु किंवा तो स्वत: त्रिविक्रम मधोमध उभा आहे ‘नवव्या’ पॉईंटवर, नवव्या मजल्यावर आहे. बाकीचे हे आजूबाजूचे मजले आहेत. एकाला चांगलं देण्यासाठी, दुसर्याचं वाईट निवारण्यासाठी. हे तिघांचं बेसिक स्वरूप आहे - निर्गुण-निराकार आहे.
आई उभी आहे आणि बाळ खाली आहे. बाळाला भूक लागलीय म्हणून आई बाळाला वाकून उचलून घेते - हे तिचं आपल्या बाळासाठी वाकणं म्हणजेच सगुण-साकार रूप. आणि ती जी उभी आहे अलिप्तपणे ते तिचं उभं राहाणं म्हणजे निर्गुण-निराकार रूप. समजलं, नक्की समजलं? निर्गुण-निराकार आणि सगुण-साकार ह्यात काथ्याकूट करत बसायची आवश्यकता नाही. आई आतल्या खोलीत आहे आणि मूल बाहेर खेळतंय. आई मूलाला जेवण्यासाठी हाक मारतेय ते निर्गुण-निराकार रूप. आणि खेळात रमलेल्या बाळाने लक्ष दिले नाही तर त्याला दामटून बोलावून जेवण भरवते ते सगुण-साकार रूप.
देव आमच्यासाठी वाकतो हे लक्षात ठेवा. प्रत्येक धर्मात गुडघ्यावर देवासमोर वाकायला सांगतात. हे वाकायचं का? कारण तो आमच्यासाठी वाकतो म्हणून. ती आदिमाता, ते चण्डिकापुत्र आमच्यासाठी वाकतच असतात. म्हणून आम्हाला त्यांच्यासमोर झुकायलाच पाहिजे. काय गरज पडलीय त्यांना आमच्यासमोर वाकायची? फक्त प्रेमापोटी ते वाकतात. फक्त प्रेम म्हणून आम्हाला त्यांच्यासमोर प्रेमाने वाकता यायला पाहिजे. तो देव आहे, boss आहे, शासक आहे म्हणून नाही तर तो आमच्यासाठी आयुष्यभर सतत वाकत असतोच म्हणून.
गुडघ्याने त्याच्यासमोर वाकता येत नसेल तर मनाने त्याच्यासमोर वाका. मनाने वाका म्हणजे त्याच्यासाठी थोडा तरी बदल मनात घडवून आणा. कुठलीतरी आपली एक वाईट सवय कमी करणं, चुकीची गोष्ट थांबवणं म्हणजेच मनाने वाकणं. त्यांच्यासमोर वाकताना, ‘देवा, तू किती गोड आहेस, आई तू किती छान दिसतेस तुझ्यासारखं ह्या जगात कोणीही सुंदर नाही. तुझ्यापेक्षा बेस्ट काहीच नाही म्हणजेच बाकी सगळं तिच्यापेक्षा कमी दर्जाचं आहे’ असं वाटणं म्हणजे मनाने वाकणं. हे प्रेमाने झालं पाहिजे तिच्या हातातल्या शस्त्राकडे बघून नाही, तर तिच्या चेहर्याकडे बघून वाटायला हवं.
आमचा त्रिविक्रमावर विश्वास असेल तर आमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट झिरो असणार नाही. कारण तो एकच खूप समर्थ आहे म्हणून त्या एकाच्याच बळावर अठरा भुवनांची तीर्थयात्रा व्यवस्थितपणे उत्तम, मध्यम आणि विगतही पार पाडतात. आदिमातेचं वचन आहे की, ‘जो कोणी हे उपनिषद् वाचतो तो कितीही पापी, विगत असला तरीही त्याला तीर्थयात्रेचे सगळे फायदे मिळणारच.’
त्याच्यासमोर वाकणं म्हणजे त्याला प्रेमाने साद घालणं.
आपल्या आप्तांशी भांडण झालं असेल तर एवढ्याशा चुकीचा राईचा पर्वत केला जातो. त्यामुळे अंतर आणखी वाढत जातं. वर्षानुवर्षे एकत्र राहूनसुद्धा हृदयं दर वर्षाला दूर जात राहतात.
त्रिविक्रमाची खासियत काय तर, तो एकाच वेळी तीन पावलं टाकतो. जेव्हा दोन आप्तांमध्ये भांडणं उत्पन्न होतात, तेव्हा त्रिविक्रम त्यांचा पाठीराखा असेल तर, तो एक पाऊल एकाच्या मनात टाकतो, दुसरं पाऊल दुसर्याच्या मनात टाकतो आणि तिसरं पाऊल त्यांच्या वाईट स्मृतीवर टाकतो. आणि त्याचं पाऊल जिथे पडतं तिथे सगळंच मधुर असतं. त्यांच्या बेबनावाच्या, चुकीच्या स्मृतीवर हा तिसरं पाऊल टाकतो. त्यामुळे त्या नष्ट होतात. भांडण नुसतं मिटतच नाही तर ज्यामुळे भांडण झालेलं असतं ती वाईट स्मृतीही नाहीशी होते. चुकीच्या स्मृतीवर पाऊल ठेवण्याची ताकद त्या एकाचीच आहे. कुठलीही वाईट स्मृती घालवून टाकायचं काम तो एकटा त्रिविक्रम करतो. जुन्या, नकोशा असणार्या आठवणींना नष्ट करण्याचं काम त्रिविक्रम करतो.
मनुष्याचं शरीर नऊ द्वारांचं असतं. नऊ द्वारांची अयोध्या. अयोध्या म्हणजे जिथे युद्ध नाहीये. अयोध्या कुठपर्यंत - राम आहे तिथपर्यंत. नऊ चक्रांमध्ये प्रत्येक पातळीवर सातही ज्ञानाच्या भूमीत स्मृती उत्पन्न होते. ज्ञान आहे म्हणून स्मृती आहे. बुद्धीने मंद असणार्याला काहीही लक्षात राहत नाही, पण इतरांना १०० वर्षापूर्वी मारलेली गोष्ट ही लक्षात राहते. आपल्या प्राणमय, मनोमय, भौतिक शरीराला तो जे देतो ते क्रमानेच देतो, त्याच्या देण्यात क्रम आहे. प्रत्येक स्मृती ही चक्राशी, ज्ञानाच्या प्रत्येक स्तराशी निगडित आहे. शरीर स्मृतीसहित त्या एकट्याच्या ताब्यात आहे. दु:खद आठवणी येतील अशी गोष्ट घडता कामा नये, ज्याने दु:ख वाटते ती गोष्ट येणारच नाही म्हणजे सुख.
१२१ ह्या अंकाचं mathematically काय महत्व आहे. ११ X ११ = १२१.
३३ देवांमध्ये ११ रुद्र आहेत,
दहा इंद्रियं आहेत आणि अकरावं इंद्रिय मन आहे.
दिशा दहा आहेत आणि अकरावी दिशा मनाची आहे.
अकरा इंद्रियं आणि अकरा दिशा आणि अकरा रुद्र ह्या तिन्हींना अलाईन करण्याचं काम हा त्रिविक्रम करतो. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर ह्या चक्रापर्यंतच सामान्य माणसांची झेप असते. ह्या तीन चक्रांशी सामान्य माणसाचा संबंध असतो. आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा मणिपूर चक्रातून जात असते. (१+२+३+२+१=९) ह्या तीनही चक्रांतून एकटा त्रिविक्रमच तीन पावलं ठेवतो. ह्या तीन चक्रात तीन पावलं ठेवून उभा आहे तो त्रिविक्रम.
हे त्रिविक्रम जल जेव्हा आम्ही अंगावर घेतो, तेव्हा त्याची तीन पावलं ह्या ठिकाणी पडत असतातच. मात्र ज्याला त्रिविक्रमाचं interfere करणं नकोसं वाटतं, त्याने त्रिविक्रम जलाचा वापर करायचा नाही. तुम्ही माना की मानू नका तुमच्या इंद्रियांना शक्ती कशी द्यायची हे तो एकटा ठरवतो.
॥ हरि ॐ॥