॥ हरि ॐ॥
माझ्याशी देव बोलतो, देव अंगात येतो असं म्हणणारी माणसं खोटी असतात. कोणाच्याही अंगात देव येत नाही. जनाबाई, मुक्ताबाई, संत सखू, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर एवढ्या पवित्र व्यक्तींच्या अंगात का आला नाही? अंगात येणारा एक तर खोटा असतो किंवा तो आजारी असतो. अंगात आली तर भूतंच येतात? ही अंगात येणारी मंडळी माणसाचा चेहरा बघून बोलत असतात. ह्यांना एकतर पोलिसांच्या ...